मुंबई हादरली! वांद्र्यात गुंगीचं औषध पाजून तरुणीवर आळीपाळीने अत्याचार
मायानगरी मुंबई.. 24 तास डोळे उघडे ठेऊन जागं असलेलं हे शहर.. या शहरातल्या सुरक्षित वातावरणाला, पुरोगामित्वाला तडे जाणाऱ्या काही घटना घडल्या आहेत.
मुंबई : पाण्यातून गुंगीचे औषध टाकून 18 वर्षीय तरुणीवर सामूहिक अत्याचार करण्यात आल्याची धक्कादायक घटना वांद्रेच्या निर्मलनगर परिसरात घडली आहे. दरम्यान याप्रकरणी पोलिसांनी बलात्काराचा गुन्हा दाखल करत तरुणीला गुंगीचं औषध देणाऱ्या
दोन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून एका आरोपीला ताब्यात (Mumbai Crime News) घेण्यात आले असून दुसऱ्या आरोपीचा पोलीस शोध घेत आहेत. त्यामुळे मुंबईत नेमकं चाललंय काय, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
समोर आलेल्या माहितीनुसार,पीडित तरुणीला लिफ्ट देण्यच्या बहाण्याने अत्यचार करण्यात आले आहे. घरी सोडतो असे म्हटल्यानंतर पीडीत तरूणी तरुणांसोबत गेली. लिफ्ट दिल्यानंतर तरुणांनी तरुणीला पिण्यासाठी पाणी दिले. मात्र याच पिण्याच्या पाण्याने घात केला. कारण पाण्यात गुंगीच औषध टाकलं. त्यामुळे बेशुद्ध अवस्थेत असलेल्या तरुणीवर अज्ञातस्थळी आळीपाळीने बलात्कार केला.
तरुणीला जीवे मारण्याची धमकी
पीडित तरुणीला शुद्ध आल्यानंतर आपल्यावर बलात्कार झाल्याचं तिच्या लक्षात आलं. यावेळी आरोपीने तरुणीला जीवे मारण्याची धमकी दिली. घरी सोडल्यानंतर तरूणीने तात्काळ पोलीस स्थानकात धाव घेतली आणि घडलेला प्रकार सांगितला. पोलिसांना माहिती देताच पोलिसांनी तरुणीची वैद्यकीय चाचणी केली. यात या तरुणीवर अत्याचार झाल्याचं निष्पन्न झालं. या प्रकरणी निर्मलनगर पोलीस ठाण्यात दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एका आरोपीला अटक तर दुसरा आरोपी फरार आहे.
मुंबईत महिला सुरक्षित?
काही दिवसापूर्वी मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल परिसरात 29 वर्षीय महिलेवर अत्याचार केल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला होता. सीएसएमटी रेल्वे स्थानकाबाहेरील टॅक्सी स्टॅडच्या पाठीमागे दोघांनी आळीपाळीने महिलेला धमकावून तिच्यावर बलात्कार केल्याचे महिलेने तक्रारीत म्हटले होते. मायानगरी मुंबई.. 24 तास डोळे उघडे ठेऊन जागं असलेलं हे शहर.. या शहरातल्या सुरक्षित वातावरणाला, पुरोगामित्वाला तडे जाणाऱ्या काही घटना घडल्या आणि इथल्या सामान्य स्त्रीच्या सुरक्षिततेचा प्रश्न उभा राहिला. प्रश्न विचारल्यावर प्रशासनानं गस्ती पथक, निर्भया पथक, स्कॅन कोड वगैरे योजनांची जंत्री वाचली... पण प्रत्यक्षात या योजना किती ताकदीनं राबवल्या जातायत? असा सवाल उपस्थित होत आहे.
हे ही वाचा :
बेस्ट बसने शाळेतून घरी जाणाऱ्या 12 वर्षांच्या मुलाला चिरडलं; मुंबईतील धक्कादायक घटना