बेस्ट बसने शाळेतून घरी जाणाऱ्या 12 वर्षांच्या मुलाला चिरडलं; मुंबईतील धक्कादायक घटना
Mumbai Crime News: अटक केलेल्या आरोपीला आज वांद्रे न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.
Mumbai Crime News मुंबई: मुंबईतील एक धक्कादायक घटना समोर आली आहे. वांद्रे येथील भरधाव बेस्ट बस अपघातात बारा वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला आहे. सदर घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली. खेरवाडी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार तो आपल्या मित्रांसह रस्ता ओलांडत असताना बसने उजव्या बाजूने त्याला धडक दिली. बेस्ट बस वांद्रे रेक्लेमेशन येथील वांद्रे डेपोतून टाटा कॉलनी येथे जात असताना सदर अपघात झाल्याची माहिती पोलिसांनी दिली.
वांद्रे परिसरात सहावीत शिकणारा अरबाज अन्सारी शाळेतून घरी जात असताना भरधाव वेगाने जाणाऱ्या बेस्ट बसने उडवले. याप्रकरणी बेस्ट बस ड्रायव्हर विजय बागल यांच्यावर कलम 106, 281 नुसार गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे. अटक केलेल्या आरोपीला आज वांद्रे न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. अशाप्रकारे भरधाव वेगाने अपघात झाल्यानंतर मुंबईत हळहळ व्यक्त करत बेस्ट बस चालकांवर संताप व्यक्त करण्यात येत आहे. बेस्टच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, बस कंडक्टरने मुलाला वाचवण्याचा सर्वतोपरी प्रयत्न केला आणि अपघातानंतर त्याला रुग्णालयात नेले. परंतु दुर्दैवाने, त्याला रुग्णालयात उपचारादरम्यान प्राण गमवावे लागले. या घटनेबाबत चालकाची चौकशी केली जात आहे.
बीएमसीच्या कचरा उचलणाऱ्या वाहनाने 9 वर्षांच्या मुलाला चिरडले-
मुंबईतील गोवंडी परिसरात बीएमसीच्या कचरा उचलणाऱ्या वाहनाने 9 वर्षांच्या हमीद शेखला चिरडले, या घटनेत हमीद शेखचा मृत्यू झाला. या घटनेमुळे संतप्त जमावाने बीएमसीच्या वाहनाच्या काचा फोडून गोंधळ घातला. चालकाने पळून जाण्याचा प्रयत्न केला मात्र त्याला जमावाने पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. मुंबईतील गोवंडी परिसरात बीएमसीच्या कचरा उचलणाऱ्या वाहनाने 9वर्षांच्या हमीद शेखला चिरडले, या घटनेत हमीद शेखचा मृत्यू झाला. या घटनेमुळे संतप्त जमावाने बीएमसीच्या वाहनाच्या काचा फोडून गोंधळ घातला. चालकाने पळून जाण्याचा प्रयत्न केला मात्र त्याला जमावाने पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. या प्रकरणी पोलिसांनी बीएमसी चालक मतीउर सावंत याला ताब्यात घेतले असून, या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. ही घटना काल बैगनवाडी परिसरात राहणारा शेख हा अभ्यास करून परतत असताना बीएमसीच्या कचरा उचलणाऱ्या वाहनाने त्यांना धडक दिली. या घटनेनंतर तेथील लोकांनी ट्रकची तोडफोड केली आणि वाहतुकीचे नियम न पाळणाऱ्या वाहनांचा निषेध केला.
संबंधित बातमी:
मुंबई हादरली! वांद्र्यात गुंगीचं औषध पाजून तरुणीवर आळीपाळीने अत्याचार