(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Mumbai Crime: गळ्याला चाकू लावला, 15 वर्षीय मुलीवर सामूहिक अत्याचार; मुंबई पुन्हा हादरली
Mulund Rape: चाकूचा धाक दाखवून तसेच आईला जिवे मारण्याची धमकी देऊन अल्पवयीन मुलीवर सामुहिक बलात्कार करण्यात आला आहे
मुंबई : देशातील सर्वाधिक सुरक्षित शहरांपैकी एक अशी ओळख असलेले मुंबई (Mumbai News) शहर मुली-महिलांसाठी असुरक्षित बनत चालली आहे का? असे गेल्या काही आठवड्यातील घटना पाहून वाटत आहे. मुंबईतील मुलुंड (Mulund Rape) येथे एक संतापजनक प्रकार समोर आला आहे. 15 वर्षीय मुलीवर सामुहिक बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे. चाकूचा धाक दाखवून तसेच आईला जिवे मारण्याची धमकी देऊन अल्पवयीन मुलीवर सामुहिक बलात्कार करण्यात आला आहे.. या घटनेमुळे मुलुंडमध्ये खळबळ उडाली आहे. या प्रकरणी एका आरोपीला अटक करण्यात आली असून पोलिस अधिक तपास करत आहे.
पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्ह दाखल
मुली, महिलांवर अत्याचारात वाढ होत असताना आता पुन्हा एकदा जवळच्या, ओळखीच्या लोकांकडून अत्याचाराची घटना घडल्याने एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी या प्रकरणी भारतीय दंड विधान संहिता कलम आणि पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या घटनेने खेळण्या बागडण्याच्या वयात मुलं कोणत्या थराला जात आहेत, यावरून आता पालकांच्या चिंतेत भर पडली आहे.
आरोपीच्या शोधात पोलिसांचे पथक परराज्यात रवाना
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुलुंड येथे हा धक्कादायक प्रकार घडला आहे. 15 वर्षीय मुलीवर सामूहिक बलात्कार करण्यात आला आहे. चाकूचा धाक दाखवून तसेच आईला जिवे मारण्याची धमकी देऊन अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार करण्यात आला आहे. मुलुंड पोलिसांनी सामुहिक बलात्कार आणि पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी 21 वर्षीय तरूणाला अटक करण्यात आली आहे. तर दुसऱ्या आरोपीच्या शोधात पोलिसांचे पथक परराज्यात रवाना झाले आहे. गुंगीच औषध देऊन अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याचे एफआयआरमध्ये नमुद करण्यात आले आहे. या प्रकरणी पोलिसांनी वेगवेगळ्या अँगलने तपास सुरू केला असल्याची माहिती सुत्रांनी दिली.
मुंबईत महिलांची सुरक्षा धोक्यात
मुंबईमध्ये गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारांकडून कायदा आणि सुव्यवस्था धाब्यावर बसवली जात आहे. त्यामुळे महिलांची सुरक्षाही धोक्यात आल्याचं चित्र आहे. मुंबई पोलिसांचा गुन्हेगारांवर धाक नसल्याचं दिसून येत आहे. त्याचमुळे या अशा प्रकारच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत आहे.
हे ही वाचा :