Pakistan : बापलेकीच्या नात्याला काळीमा! बापाकडूनच पोटच्या मुलीवर 3 महिने लैंगिक अत्याचार, अल्पवयीन मुलीनं नराधम वडिलांवर झाडली गोळी
Pakistani Daughter Killed Father : धक्कादायक म्हणजे कुटुंबियांनी हा प्रकार पोलिसांपासून लपवून ठेवला. त्यानंतर शेजाऱ्यांनी पोलिसांना या घटनेबाबत माहिती दिली.
लाहोर : लैंगिक अत्याचार (Sexual Assault) करणाऱ्या नराधम बापाची पीडित मुलीने हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. नराधम बाप अल्पवयीन मुलीवर गेल्या तीन महिन्यांपासून लैंगिक अत्याचार (Rape) करत असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. पाकिस्तान (Pakistan) च्या पंजाब प्रांतामधील ही घटना समोर आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अल्पवयीन मुलीने सांगितल्याप्रमाणे वडील तिच्यावर मागील तीन महिन्यांपासून लैंगिक अत्याचार करत होते. यानंतर अल्पवयीन मुलीनेच 23 सप्टेंबर रोजी आरोपी बापाची गोळी झाडून हत्या केली.
बापलेकीच्या नात्याला काळीमा!
पोलिसांनी या संदर्भात दिलेल्या माहितीनुसार, पंजाब प्रांतातील लाहोर शहरामधील गुज्जरपुरा भागातील ही धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. 14 वर्षांच्या अल्पवयीन मुलीन नराधम बापाची गोळी झाडू हत्या केली. पीडित मुलीने पोलिसांना सांगितलं की, तिचे वडील मागील तीन महिन्यांपासून तिच्यावर लैंगिक अत्याचार करत होते. धक्कादायक म्हणजे कुटुंबियांनी हा प्रकार पोलिसांपासून लपवून ठेवला. त्यानंतर शेजाऱ्यांनी पोलिसांना या घटनेबाबत माहिती दिली. पोलीस या संदर्भात अधिक तपास करत आहेत.
बापाकडूनच पोटच्या मुलीवर अत्याचार
या प्रकरणाचा तपास करणारे पोलीस अधिकारी सोहेल काजमी यांनी सांगितलं की, पीडितेने पोलिसांना सांगितलं की, तिची परिस्थिती अत्यंत भयावह होती. त्यामुळे तिने बलात्कारी वडीलांना जीवे मारण्याचं ठरवलं आणि त्यांच्यावर गोळी झाडून त्यांना संपवलं. मुलीने गोळी झाडल्यानंतर आरोपी वडीलांचा जागीच मृत्यू झाला अशी, माहिती काजमी यांनी दिली आहे. या प्रकरणी अधिक तपास सुरु असून आरोपींविरुद्ध कारवाई केली जाईल, असंही पोलिसांनी सांगितलं आहे.
अल्पवयीन मुलीनं नराधम बापावर झाडली गोळी
पोलिसांनी दिलेल्या अहवालात म्हटलं आहे की, सुरुवातील कुटुंबियांनी ही घटना लपवण्याचा प्रयत्न केला आणि पोलिसांना याबाबत कोणतीही माहिती दिली नव्हती. मात्र, त्यांच्या शेजाऱ्यांनी पोलिसांना गुन्ह्याची माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच सिव्हिल लाईन्सचे पोलीस अधीक्षक हसन भट्टी आणि वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. पोलीस घटनास्थळी दाखल झाल्यानंतर हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. या प्रकरणी पोलिसांनी पीडितेची आई, भाऊ आणि एका शेजारच्या व्यक्तीला अटक केली आहे.
महत्त्वाचं म्हणजे एक दिवस आधीच पाकिस्तानी न्यायालयाने दुसऱ्या एका प्रकरणात मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या आरोपीला फाशीची शिक्षा सुनावली होती. लाहोर सत्र न्यायालयाचे न्यायाधीश मियां शाहिद जावेद यांनी शुक्रवारी लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी एम. रफिक याला त्याच्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी फाशीची शिक्षा सुनावली.