एक्स्प्लोर

Kishori Pednekar: किशोरी पेडणेकरांना अटकेपासूनचा दिलासा कायम, 11 सप्टेंबरला चौकशीसाठी हजर राहण्याचे निर्देश

किशोरी पेडणेकरांना पुढील चार आठवडे अटकेपासून दिलासा देण्यात आला आहे. अटकेपासून संरक्षण देताना मुंबई पोलिसांना तपासात सहकार्य करण्याचे निर्देश न्यायालयाने दिले आहेत. 

मुंबई : कोरोनाकाळात वैद्यकीय साहित्य खरेदीत भ्रष्टाचार झाल्याप्रकरणी मुंबई महानगरपालिकेच्या माजी महापौर किशोरी पेडणेकरांना (Kishori Pednekar) यांना हायकोर्टानं पुढील चार आठवडे अटकेपासून दिलासा दिला आहे. मात्र या दरम्यान चौकशीला हजेरी लावत त्यांना मुंबई पोलिसांना तपासांत पूर्ण सहकार्य करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार 11, 13 आणि 16 सप्टेंबर रोजी किशोरी पेडणेकरांना मुंबई पोलीस मुख्यालयातील आर्थिक गुन्हे शाखेत चौकशीकरता हजेरी लावावी लागणार आहे. या दरम्यान त्यांना अटक झाल्यास 30 हजारांच्या जामीनावर त्यांची तात्काळ सुटका करण्याचे निर्देशही हायकोर्टानं दिले आहेत.

मुंबई सत्र न्यायालयानं याप्रकरणी अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळल्यानंतर किशोरी पेडणेकर यांनी हायकोर्टात धाव घेतली आहे. त्यांच्या अर्जावर न्यायमूर्ती निझामुद्दीन जमादार यांच्यापुढे सुनावणी झाली. कोरोनाकाळात वैद्यकीय साहित्य खरेदीत मृतदेह ठेवण्यासाठीच्या बॉडीबॅगमध्ये भ्रष्टाचार झाल्याचा ठपका ठेवत मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेनं किरीट सोमय्यांच्या तक्रारीवरून माजी महापौर किशोरी पेडणेकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल केलाय. याप्रकरणी किशोरी पेडणेकरांच्या याचिकेला विरोध करताना पोलिसांनी स्पष्ट केलंय की,अधिकार नसतानाही महापौरांनी आपल्या बंगल्यावर बोलावून समितीला संबंधित कंपनीला कंत्राट देण्यास भाग पाडल्याची माहिती आहे.

काय आहे प्रकरण?

किशोरी पेडणेकरांनी डॉ. हरिदास राठोड (डेप्युटी डीन, केंद्रीय खरेदी विभागाचा अतिरिक्त कार्यभार) यांना व्हीआयपीएलकडून 1200 बॉडी बॅग खरेदी करण्यासाठी 16 मे ते 7 जून 2020 या कालावधीत प्रत्येकी 6 हजार 719 रुपयांना विकत घेण्यास भाग पाडल्याचा तपासयंत्रणेनं आरोप केला आहे. याप्रकरणी मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेनं नुकताच पेडणेकरांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. साल 2020 मध्ये किशोरी पेडणेकर महापौर असताना त्यांच्या आदेशानंच पालिका अधिकाऱ्यांनी या बॉडी बॅगची खरेदी केल्याचा उल्लेख आर्थिक गुन्हे शाखेच्या एफआयआरमध्ये आहे. 

वाढीव भावानं ही खरेदी केल्यानं या व्यवहारातील टक्केवारी आरोपींना मिळाल्याचा संशय असून, त्या अनुषंगानं पोलिसांचा तपास सुरू आहे. याप्रकरणी पेडणेकर यांच्यासह वेदांत इनोटेकचे (व्हीआयपीएल) संचालक आणि कंत्राटदार तसेच वरिष्ठ अतिरिक्त महापालिका आयुक्त (प्रकल्प) यांच्यासह पालिकेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांना आरोपी बनवण्यात आलं आहे.

पेडणेकरांचा दावा 

शिवसेनेत फूट पडल्यानंतरच उद्धव ठाकरे गटाशी एकनिष्ठ असल्यामुळेच आपल्याविरुद्ध ही तक्रार करण्यात आली असून हा गुन्हा राजकीयदृष्ट्या प्रेरित होऊन दाखल केल्याचा पेडणेकरांनी याचिकेतून दावा केला आहे. तक्रारदार किरीट सोमय्यांचा विरोधी राजकारण्यांना लक्ष्य करण्याचा इतिहास जुना आहे. आपण एक माजी परिचारिका असल्यानं रुग्णालयातून निकृष्ट दर्जाच्या बॉडी बॅगच्या तक्रारी आपल्यापर्यंत आल्या होत्या. त्या खरेदी विभागाच्या निदर्शनास आणून दिल्या होत्या. व्हीआयपीएलला हे कंत्राट देण्यात आपली कोणतीही भूमिका नसल्याचा दावा पेडणेकर यांनी याचिकेतून केला आहे.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Lamborghini in Mantralaya : मंत्रालयातील 'त्या' लॅम्बोर्गिनीबाबत मंत्री विखे पाटील पहिल्यांदाच बोलले; रोहित पवारांवर जोरदार पलटवार
मंत्रालयातील 'त्या' लॅम्बोर्गिनीबाबत मंत्री विखे पाटील पहिल्यांदाच बोलले; रोहित पवारांवर जोरदार पलटवार
Pankaja Munde: 'बीडचा विकास बारामतीसारखा करणार...', पंकजा मुंडेंकडून अजितदादांचं तोंडभरून कौतुक
'बीडचा विकास बारामतीसारखा करणार...', पंकजा मुंडेंकडून अजितदादांचं तोंडभरून कौतुक
Mutual Fund : एकाचवेळी 500000 गुंतवल्यास दीड कोटींचा कॉर्पस कसा तयार होईल? जाणून घ्या समीकरण
एकाचवेळी 500000 गुंतवल्यास दीड कोटींचा कॉर्पस कसा तयार होईल? जाणून घ्या समीकरण
Saif Ali Khan Attack : हा एक संकेत समजा, सरकारनं पण ध्यानात ठेवावं; सैफवरच्या हल्ल्यानंतर महाराष्ट्र करणी सेनेच्या प्रमुखाचं खळबळजनक वक्तव्य
हा एक संकेत समजा, सरकारनं पण ध्यानात ठेवावं; सैफवरच्या हल्ल्यानंतर महाराष्ट्र करणी सेनेच्या प्रमुखाचं खळबळजनक वक्तव्य
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Bajrang Sonawane Full PC : 'ही' उत्तरं पंकजा मुंडेंकडून अपेक्षित नाही, बीड प्रकरणावरुन हल्लाबोल!Saif Ali Khan Attacked : सैफवरील हल्ल्यानंतरचा पहिला मोठा व्हिडीओ, पाहा EXCLUSIVE CLIPSaif Ali Khan Attacked : सैफवर प्राणघातक हल्ला, मानेवर 10 सेंटीमीटरची जखम,पाठीतही वारABP Majha Marathi News Headlines 9AM TOP Headlines 09 AM 16 January 2025 सकाळी ९ च्या हेडलाईन्स-

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Lamborghini in Mantralaya : मंत्रालयातील 'त्या' लॅम्बोर्गिनीबाबत मंत्री विखे पाटील पहिल्यांदाच बोलले; रोहित पवारांवर जोरदार पलटवार
मंत्रालयातील 'त्या' लॅम्बोर्गिनीबाबत मंत्री विखे पाटील पहिल्यांदाच बोलले; रोहित पवारांवर जोरदार पलटवार
Pankaja Munde: 'बीडचा विकास बारामतीसारखा करणार...', पंकजा मुंडेंकडून अजितदादांचं तोंडभरून कौतुक
'बीडचा विकास बारामतीसारखा करणार...', पंकजा मुंडेंकडून अजितदादांचं तोंडभरून कौतुक
Mutual Fund : एकाचवेळी 500000 गुंतवल्यास दीड कोटींचा कॉर्पस कसा तयार होईल? जाणून घ्या समीकरण
एकाचवेळी 500000 गुंतवल्यास दीड कोटींचा कॉर्पस कसा तयार होईल? जाणून घ्या समीकरण
Saif Ali Khan Attack : हा एक संकेत समजा, सरकारनं पण ध्यानात ठेवावं; सैफवरच्या हल्ल्यानंतर महाराष्ट्र करणी सेनेच्या प्रमुखाचं खळबळजनक वक्तव्य
हा एक संकेत समजा, सरकारनं पण ध्यानात ठेवावं; सैफवरच्या हल्ल्यानंतर महाराष्ट्र करणी सेनेच्या प्रमुखाचं खळबळजनक वक्तव्य
Nashik Politics : शिंदे गटात मोठं इनकमिंग, विकासकामांसाठी निधी देण्याचं आमिष दाखवल्याची चर्चा, नाशिकमध्ये भाजप-शिवसेनेत संघर्ष?
शिंदे गटात मोठं इनकमिंग, विकासकामांसाठी निधी देण्याचं आमिष दाखवल्याची चर्चा, नाशिकमध्ये भाजप-शिवसेनेत संघर्ष?
Saif Ali Khan Attack: मुंबई पोलिसांनी गवताच्या गंजीतून सुई शोधून काढली, अखेर सैफ अली खानच्या घराबाहेरच्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये संशयित दिसलेच
मुंबई पोलिसांनी सैफच्या एरियातील एक-एक सीसीटीव्ही कॅमेरा तपासला अन् गवताच्या गंजीतून सुई शोधून काढली
Saif Ali Khan Attacked: पोलिसांना पहिला क्लू सापडला, चोर कोणत्या मार्गाने सैफ अली खानच्या घरात शिरला, प्रायमरी थिअरीतला अंदाज काय?
सैफ अली खानच्या बिल्डिंगच्या मागे तुटलेली जाळी दिसताच पोलिसांच्या डोक्यातली चक्रं फिरली, पहिला क्लू सापडला?
Nashik News : नाशिकमधील गुरव आत्महत्येचं कोडं उलगडणार, पोलीस तपासाला गती, समोर आली मोठी माहिती
नाशिकमधील गुरव आत्महत्येचं कोडं उलगडणार, पोलीस तपासाला गती, समोर आली मोठी माहिती
Embed widget