Mumbai Coronavirus Case: मुंबईत मागील 24 तासात 1,266 रुग्ण, रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी 351 दिवसांवर
Mumbai Coronavirus Case: मुंबईत मागील 24 तासात 1,362 रुग्णांचे निदान झाले आहे. तर 1,021 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. आतापर्यंत मुंबई 6,57,301 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. मुंबईतील रिकव्हरी रेट 94 टक्क्यांवर आला आहे तर रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी 351 दिवसांवर गेला आहे.
मुंबई : मुंबईत मागील 24 तासात 1,362 रुग्णांचे निदान झाले आहे. तर 1,021 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. आतापर्यंत मुंबई 6,57,301 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. मुंबईतील रिकव्हरी रेट 94 टक्क्यांवर आला आहे तर रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी 351 दिवसांवर गेला आहे. मुंबईत सध्या 28,310 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. मुंबईत काल 1,362 रुग्णांचे निदान झाले होते तर 1,021 रुग्ण बरे होऊन घरी गेले होते.
पुणे शहरात दिवसभरात नवे 588 कोरोनाबाधित!
पुणे शहरात आज नव्याने 588 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून पुणे शहरातील एकूण संख्या आता 4 लाख 68 हजार 129 इतकी झाली आहे. शहरातील 921 कोरोनाबाधितांना आज डिस्चार्ज देण्यात आला असून पुणे शहरातील एकूण डिस्चार्ज संख्या 4 लाख 51 हजार 991 झाली आहे. पुणे शहरात आज एकाच दिवसात 8 हजार 193 नमुने घेण्यात आले आहेत. पुणे शहराची एकूण टेस्ट संख्या आता 24 लाख 68 हजार 709 इतकी झाली आहे. पुणे शहरात उपचार घेणाऱ्या 7 हजार 990 रुग्णांपैकी 996 रुग्ण गंभीर तर 1862 रुग्ण ऑक्सिजनद्वारे उपचार घेत आहेत. पुणे महापालिका हद्दीत नव्याने 33 कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे.आजच्या नव्या संख्येसह मृतांची एकूण संख्या 8 हजार 148 इतकी झाली आहे.
काल राज्यात 24,752 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद
राज्यात काल बुधवारी 24,752 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली. तर 23,065 कोरोना बाधित रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. राज्यात कालपर्यंत एकूण 52,41,833 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) 92.76% टक्के एवढे झाले आहे. राज्यात काल 453 कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर 1.62 टक्के एवढा आहे.
काल 'या' शहर आणि जिल्ह्यात एकही मृत्यू नाही
राज्यात काल गडचिरोली, गोंदिया, बुलढाणा, धुळे जिल्हा, लातूर शहर, परभणी शहर, उल्हासनगर शहर, भिवंडी शहर, मीरा भायंदर शहर, कल्याण डोंबिवली शहर, ठाणे शहर, औरंगाबाद शहर, जळगाव शहर, धुळे शहर या ठिकाणी कोरोनामुळं एकाही मृत्यूची नोंद नाही. तर नवी मुंबई, वसई विरार, मालेगाव, अमरावती शहर परिसरात आणि औरंगाबाद, पालघर, चंद्रपूर जिल्ह्यात एका व्यक्तिचा काल कोरोनामुळं मृत्यू झाला असल्याची माहिती सरकारी आकडेवारीतून समोर आली आहे.