Mumbai Corona Update : मुंबईत सोमवारी 1062 रुग्णांची नोंद, 1305 कोरोनामुक्त
Mumbai Corona Update : बीएमसीने दिलेल्या आकडेवारीनुसार, सोमवारी मुंबईत 1062 नव्या रुग्णांची भर पडली आहे.
Mumbai Coronavirus Cases : मुंबईमध्ये मागील काही दिवसांत कोरोना (Corona) रुग्णसंख्येत चढ-उतार पाहायला मिळत आहे. कोरोना रुग्णांचा स्फोट मुंबईसह महाराष्ट्रात होत आहे. आज मुंबईत 1062 रुग्णांची नोंद झाली आहे. वाढत्या आकडेवारीमुळे प्रशासनासह (Mumbai BMC) नागरिकांची चिंता वाढली आहे. मागील काही दिवसांपासून रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे.
मुंबई महानगरपालिकेने दिलेल्या आकडेवारीनुसार, मुंबईत सोमवारी 1305 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. ज्यामुळे मुंबईत कोरोनावर मात केलेल्या रुग्णांची संख्या 10 लाख 76 हजार 350 वर पोहोचली आहे. त्यामुळे मुंबईचा रिकव्हरी रेट 97 टक्के इतका झाला आहे. तर मागील 24 तासांत पाच रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असून कोरोनामुळे मृत्यू पावलेल्यांची संख्या 19 हजार 604 झाली आहे. सध्या मुंबईत 12,479 रुग्ण आहेत. दरम्यान मुंबईत आढळलेल्या नव्या 1062 रुग्णांमध्ये 994 रुग्णांना अधिक लक्षणं नसल्याने काहीसा दिलासा मुंबईकरांना मिळाला आहे. रुग्ण दुपटीचा दर आणि सक्रिय रुग्णसंख्यादेखील वेगाने वाढत आहे. रुग्ण दुपटीचा दर 433 दिवसांवर गेला आहे.
#CoronavirusUpdates
— माझी Mumbai, आपली BMC (@mybmc) June 27, 2022
२७ जून, संध्या. ६:०० वाजता
२४ तासात बाधित रुग्णौ- १०६२
२४ तासात बरे झालेले रुग्ण-१३०५
बरे झालेले एकूण - १०७६३५०
बरे झालेल्या रुग्णांचा दर-९७%
एकूण सक्रिय रुग्ण- १२४७९
दुप्पटीचा दर- ४३३ दिवस
कोविड वाढीचा दर (२० जून- २६ जून)-०.१५१%#NaToCorona
सर्वाधिक सक्रिय रुग्ण मुंबईत
राज्यात सर्वाधिक सक्रिय रुग्ण मुंबईममध्ये आहेत. मुंबईमध्ये 12479 सक्रिय रुग्ण आहेत. तर ठाण्यात 5871 सक्रिय रुग्ण आहेत. त्यानंतर पुण्यात 3163 सक्रिय रुग्ण आहेत. पालघर 795, रायगड 1401, रत्नागिरी 97, सिंधुदुर्ग 81, सातारा 53, सांगली 51, कोल्हापूर 50, सोलापूर 71, नाशिक 229, अहमदनगर 76, जळगाव 62, धुळे 17, औरंगाबाद 110, जालना 21, लातूर 90, परभणी 12, हिंगोली 16, नांदेड 27, उस्मानाबाद 54, अमरावती 24, अकोला 25, वाशिम 78, बुलढाणा 55, यवतमाळ 38, नागपूर 366, वर्धा 16, भंडारा 27, गडचिरोली 35 आणि चंद्रपूरमध्ये 50 सक्रीय रुग्ण आहेत. इतर ठिकाणी सक्रिय रुग्णांची संख्या 10 पेक्षा कमी आहे. राज्यात एकूण 25570 सक्रिय रुग्ण आहेत.
राज्यात आज 2369 कोरोनाच्या नव्या रुग्णांची भर पडली आहे. तर आज दिवसभरात एकूण 1402 रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. आज नोंद झालेल्या रुग्णांपैकी सर्वाधिक रुग्ण हे मुंबईतील आहे. मुंबईत आज सर्वाधिक म्हणजे 1062 रुग्णांची भर पडली आहे.
संबंधित बातम्या