Mumbai Corona Cases : मुंबईत सोमवारी 584 रुग्णांची नोंद 407 कोरोनामुक्त
Mumbai corona cases : राज्यात सर्वाधिक सक्रिय रुग्ण मुंबईमध्ये आहेत. मुंबईमध्ये 5218 सक्रिय रुग्ण आहेत.
Mumbai Corona Cases : मुंबईमध्ये मागील काही दिवसांत कोरोना (Corona) रुग्णसंख्येत चढ-उतार पाहायला मिळत आहे. आज मुंबईत 584 रुग्णांची नोंद झाली आहे. तर 407 कोरोनावर मात केली आहे.
मुंबईचा रिकव्हरी रेट 97.8 टक्के
मुंबई महानगरपालिकेने दिलेल्या आकडेवारीनुसार, मुंबईत सोमवारी 407 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. ज्यामुळे मुंबईत कोरोनावर मात केलेल्या रुग्णांची संख्या 11,08,290 वर पोहोचली आहे. त्यामुळे मुंबईचा रिकव्हरी रेट 97.8 टक्के इतका झाला आहे. तर मागील 24 तासांत शून्य रुग्णाचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. कोरोनामुळे मृत्यू पावलेल्यांची संख्या 19,664 झाली आहे. सध्या मुंबईत 5218 रुग्ण आहेत. दरम्यान मुंबईत आढळलेल्या नव्या 584 रुग्णांमध्ये 522 रुग्णांना अधिक लक्षणं नसल्याने काहीसा दिलासा मुंबईकरांना मिळाला आहे. रुग्ण दुपटीचा दर आणि सक्रिय रुग्णसंख्यादेखील वेगाने वाढत आहे. रुग्ण दुपटीचा दर 1101 दिवसांवर गेला आहे.
सर्वाधिक सक्रिय रुग्ण मुंबईत
राज्यात सर्वाधिक सक्रिय रुग्ण मुंबईमध्ये आहेत. मुंबईमध्ये 5218 सक्रिय रुग्ण आहेत. तर पुण्यात 1960 सक्रिय रुग्ण आहेत. त्यानंतर ठाण्यात 1662 सक्रिय रुग्ण आहेत. राज्यात एकूण 12148 सक्रिय रुग्ण आहेत.
#CoronavirusUpdates
— माझी Mumbai, आपली BMC (@mybmc) August 15, 2022
15th August, 6:00 pm
Positive Pts. (24 hrs) - 584
Discharged Pts. (24 hrs) - 407
Total Recovered Pts. - 11,08,290
Overall Recovery Rate - 97.8%
Total Active Pts. - 5218
Doubling Rate - 1101 Days
Growth Rate ( 8 August - 14 August )- 0.062%#NaToCorona
राज्यात सोमवारी 1189 कोरोना रुग्णांची नोंद
राज्यात आज 1189 कोरोनाच्या (Maharashtra Corona Update) नव्या रुग्णांची भर पडली आहे. तर आज दिवसभरात एकूण 1142 रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. राज्यात आज एका कोरोनाबाधित रुग्णाच्या मृत्यूची नोंद झाली आहे. राज्यातील मृत्यूदर हा 1.83 टक्के इतका झाला. तर आतापर्यंत राज्यामध्ये 79,13,209 कोरोनाबाधित बरे होऊन घरी परतले आहेत. त्यामुळे कोरोना रुग्ण बरे होण्याचं प्रमाण 98.01 टक्के इतकं झालं आहे. राज्यात एकूण 12148 सक्रिय रुग्ण संख्या आहे. त्यामध्ये मुंबईत सर्वाधिक म्हणजे 5218 इतके रुग्ण असून त्यानंतर पुण्यामध्ये 1960 सक्रिय रुग्ण आहेत.