एक्स्प्लोर

Elephanta Boat Accident : मोठी बातमी! मुंबई बोट अपघातात तीन नव्हे तर 13 जणांचा मृत्यू; नवीन इंजिनची टेस्टिंग सुरू असताना नेव्हीची बोट आदळली

Neelkamal Boat Accident : नौदलाने दिलेली मृतांच्या आकडेवारीची माहिती ही संध्याकाळ 7.30 पर्यंत होती. त्यामध्ये अंतिम आकडेवारी ही गुरुवारी सकाळी येणार असल्याचं सांगितलं आहे. 

मुंबई : एलिफंटाकडे जाणाऱ्या बोटीच्या दुर्घटनेसंबंधी एक मोठी माहिती समोर आली आहे. या अपघातात तीन नव्हे तर 13 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती नौदलाने दिल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. मृतांमध्ये 10 जण प्रवाशी आणि तीन नेव्हीचे कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. या अपघातात दोन गंभीर जखमींवर नौदलाच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ही आकडेवारी अंतिम नसून, यामध्ये अद्याप कुणी बेपत्ता असेल किंवा मृत असेल त्याची माहिती गुरुवारी सकाळपर्यंत मिळेल अशी माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली. या प्रकरणाची चौकशी आता मुंबई पोलिस आणि नौदलाकडून करण्यात येणार आहे.

ज्या 13 जणांचा मृत्यू झाला आहे त्यांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी 5 लाखांची मदत ही मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून करण्यात येणार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं. 

नेव्हीच्या बोटीच्या इंजिनचे टेस्टिंग सुरू होतं

नेव्हीच्या ज्या बोटीने नीलकमल या बोटीला धडक दिली तिच्या संबंधी मोठी माहिती समोर आली आहे. या बोटीच्या नवीन इंजिनचे टेस्टिंग सुरू होते. त्यामुळे ही बोट समुद्रात आठ या आकारात फिरत होती. त्याचवेळी एक राऊंड मारून आलेल्या या बोटीने समोरून नीलकमल या बोटीला धडक मारली.

नवीन इंजिनमध्ये काहीतरी तांत्रिक बिघाड झाल्यानंतर या बोटीवरचे नियंत्रण सुटले आणि तिने नीलकमल या बोटीला समोरून धडक दिल्याची माहिती नेव्हीने दिली आहे. 

सकाळी मृतांची अंतिम आकडेवारी समोर येणार

मुंबईच्या गेट वे ऑफ इंडियातून एलिफंटाकडे जाणाऱ्या प्रवाशी नीलकमल बोटीला नौदलाच्या वेगवान स्पीड बोटीची धडक बसली आणि प्रवाशांची बोट उलटली. अपघातावेळी बोटीमध्ये शंभरहून अधिक प्रवासी आणि 5 बोटीचे सदस्य होते. समुद्रात आजूबाजूला असलेल्या इतर बोटींनी मदतीसाठी वेळीच धाव घेतल्यामुळे 110 प्रवाशांचे प्राण वाचवण्यात यश आलं आहे.

या घटनेत 13 जणांचा मृत्यू झाला आहे. रात्र झाल्यामुळे शोधकार्य थांबवलं आहे. त्यामुळे या घटनेत अजून किती लोक बेपत्ता आहेत किंवा आणखी कुणाचा जीव गेला आहे का याची माहिती गुरुवारी सकाळी समोर येणार आहे.  

या बोट धडकेनंतर बोट बुडत असताना, प्रवासी जीवाच्या आकांताने ओरडत होते. त्यावेळी त्यांच्या मदतीला दोन सीआयएसफ जवानांची 'शेरा 1' पेट्रोलिंग बोट मदतीसाठी धावली. नेव्हीच्या स्पीड बोटीचं नियंत्रण सुटल्याने हा अपघात घडल्याचं सांगण्यात येतंय.

ही बातमी वाचा :

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Ramtek Bungalow : रामटेक बंगल्याचं 'ट्रॅक रेकॉर्ड' अपशकुनी? बावनकुळे की पंकजा मुंडे, मुक्कामासाठी कोण सज्ज होणार?
रामटेक बंगल्याचं 'ट्रॅक रेकॉर्ड' अपशकुनी? बावनकुळे की पंकजा मुंडे, मुक्कामासाठी कोण सज्ज होणार?
Kokan Refinary : कोकणात रिफायनरी होणार, पण बारसूत की नाणारमध्ये? मुख्यमंत्र्यांचा कौल कोणत्या ठिकाणाला? 
कोकणात रिफायनरी होणार, पण बारसूत की नाणारमध्ये? मुख्यमंत्र्यांचा कौल कोणत्या ठिकाणाला? 
शिर्डीत दर्शन घेऊन परतताना समृद्धी महामार्गावर पुन्हा अपघात, कारचा चेंदामेंदा; तीन ठार 3 जखमी
शिर्डीत दर्शन घेऊन परतताना समृद्धी महामार्गावर पुन्हा अपघात, कारचा चेंदामेंदा; तीन ठार 3 जखमी
बीडमध्ये पोलिसांची ॲक्शन सुरू... हवेत गोळीबार करणाऱ्या धनुभाऊंच्या कार्यकर्त्यावर गुन्हा; व्हिडिओ व्हायरल
बीडमध्ये पोलिसांची ॲक्शन सुरू... हवेत गोळीबार करणाऱ्या धनुभाऊंच्या कार्यकर्त्यावर गुन्हा; व्हिडिओ व्हायरल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 7AM TOP Headlines 7 AM 25 December 2024 सकाळी ७ च्या हेडलाईन्ससकाळी ६ वाजताच्या 100 हेडलाईन्स- Top 100 headlines at 6AM 25 December 2024  एबीपी माझा  SuperfastMajha Gaon Majha Jilha at 630AM 25 December 2024 माझा गाव, माझा जिल्हाABP Majha Marathi News Headlines 630AM TOP 630 AM 25 December 2024 सकाळी ६.३० च्या हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ramtek Bungalow : रामटेक बंगल्याचं 'ट्रॅक रेकॉर्ड' अपशकुनी? बावनकुळे की पंकजा मुंडे, मुक्कामासाठी कोण सज्ज होणार?
रामटेक बंगल्याचं 'ट्रॅक रेकॉर्ड' अपशकुनी? बावनकुळे की पंकजा मुंडे, मुक्कामासाठी कोण सज्ज होणार?
Kokan Refinary : कोकणात रिफायनरी होणार, पण बारसूत की नाणारमध्ये? मुख्यमंत्र्यांचा कौल कोणत्या ठिकाणाला? 
कोकणात रिफायनरी होणार, पण बारसूत की नाणारमध्ये? मुख्यमंत्र्यांचा कौल कोणत्या ठिकाणाला? 
शिर्डीत दर्शन घेऊन परतताना समृद्धी महामार्गावर पुन्हा अपघात, कारचा चेंदामेंदा; तीन ठार 3 जखमी
शिर्डीत दर्शन घेऊन परतताना समृद्धी महामार्गावर पुन्हा अपघात, कारचा चेंदामेंदा; तीन ठार 3 जखमी
बीडमध्ये पोलिसांची ॲक्शन सुरू... हवेत गोळीबार करणाऱ्या धनुभाऊंच्या कार्यकर्त्यावर गुन्हा; व्हिडिओ व्हायरल
बीडमध्ये पोलिसांची ॲक्शन सुरू... हवेत गोळीबार करणाऱ्या धनुभाऊंच्या कार्यकर्त्यावर गुन्हा; व्हिडिओ व्हायरल
मंत्रिपदाची शपथ घेतली, पदभार स्वीकारला; संजय सावकारेंनी दालनात येताच अगोदर पूजा घातली
मंत्रिपदाची शपथ घेतली, पदभार स्वीकारला; संजय सावकारेंनी दालनात येताच अगोदर पूजा घातली
IAS Transfer List : फडणवीस सरकारकडून राज्यातील वरिष्ठ IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या जाहीर, मुंबई बेस्टमध्ये खांदेपालट
फडणवीस सरकारकडून राज्यातील वरिष्ठ IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या जाहीर, मुंबई बेस्टमध्ये खांदेपालट
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स; 24 डिसेंबर 2024  मंगळवार; एका क्लिकवर सर्वच घडामोडी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स; 24 डिसेंबर 2024 मंगळवार; एका क्लिकवर सर्वच घडामोडी
दादर-पोरबंदर सौराष्ट्र एक्सप्रेसला अपघात, पटरीवरुन घसरला डब्बा; सुदैवाने मोठा अनर्थ टळला
दादर-पोरबंदर सौराष्ट्र एक्सप्रेसला अपघात, पटरीवरुन घसरला डब्बा; सुदैवाने मोठा अनर्थ टळला
Embed widget