Elephanta Boat Accident : नेव्हीच्या स्पीड बोट धडकेत नीलकमल बोट कशी बुडाली? नेमकं काय घडलं? एलिफंटा अपघाताचे पाच मोठे मुद्दे
Neelkamal Boat Accident : समोरून येणाऱ्या वेगवान स्पीड बोटीने धडक दिल्याने एलिफंटाकडे जाणारी स्पीड बोट समुद्रात बुडाली. त्यामध्ये तीन प्रवाशांचा मृत्यू झाला आहे.
मुंबई : एलिफंटाकडे जाणाऱ्या प्रवाशी बोटीला इंडियन नेव्हीच्या स्पीड बोटीने (Indian Navy Speed Boat Accidemt) धडक दिल्याने मोठा अपघात घडला. त्यामध्ये 13 प्रवाशांचा मृत्यू झाला तर 101 जणांना वाचवण्यात यश आलं. नीलकमल नावाच्या बोटमधून प्रवाशी एलिफंटाकडे जात होते. त्यावेळी उरण, कारंजाजवळ ही दुर्घटना घडली.
Elephanta Boat Accident : बोटीची दुर्घटना नेमकी कशी घडली?
प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या नीलकमल बोटीला इंडियन नेव्हीच्या वेगवान स्पीड बोटीने जोरदार धडक दिली. या स्पीड बोटीने आधी एक मोठा राऊंड मारला आणि नंतर तिने नीलकमल या बोटीला समोरून धडक दिली. या जोरदार धडकेत नीलकमल बोट बुडाली. अपघातावेळी बोटीमध्ये शंभरच्या वर प्रवासी आणि 5 बोटीचे सदस्य होते. नेव्हीच्या स्पीड बोटीचं नियंत्रण सुटल्याने हा अपघात घडल्याचं सांगण्यात येतंय. दुपारी 4 वाजण्याच्या सुमाराला हा अपघात घडला.
Mumbai Boat Accident : प्रत्यक्षदर्शीने काय सांगितलं?
या अपघातात वाचवण्यात आलेल्या प्रत्यक्षदर्शीने एबीपी माझाशी संवाद साधला. तो म्हणाला की, नीलकमल बोट जवळपास 10 किमी समुद्रात गेल्यांनंतर समोरून आलेल्या एका स्पीड बोटीने त्याला धडक दिली. नीलकमल बोटीमध्ये पाणी यायला सुरुवात झाली. त्यानंतर सर्व प्रवाशांना लाईफ जॅकेट घालायला सांगितलं. पण तोपर्यंत बोट पाण्यात बुडाली होती. मी जवळपास 15 मिनिटं पाण्यामध्ये पोहोत होतो. धडक दिलेल्या स्पीड बोटीमध्ये 8 ते 10 लोक होते.
Neelkamal Boat Accident : बोट मालकाने काय सांगितलं?
नीलकमल या बोटीच्या मालकाने सांगितलं की, इंडियन नेव्हीच्या समोरून आलेल्या स्पीड बोटीने आमच्या बोटीला धडक दिली आणि ही दुर्घटना घडली आहे. या बोटीमध्ये 80 प्रवासी प्रवास करत होते. क्षमतेपेक्षा कमी प्रवासी यामध्ये होते.
जयंत पाटील काय म्हणाले?
शेकापचे नेते आणि माजी आमदार जयंत पाटील या दुर्घटनेवर म्हणाले की, बोटीवरील प्रवाशांपैकी तिघांचा मृत्यू झाला आहे तर इतरांना वाचवण्यात यश मिळालं आहे. समोरून आलेली स्पीड बोट ही नेमकी इंडियन नेव्हीची होती की कोस्ट गार्डची होती हे अद्याप स्पष्ट झालं नाही. यासंदर्भातली अधिकृत माहिती समोर यायला हवी.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
या प्रकरणी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की, "इंडियन नेव्हीच्या स्पीड बोटीचा ताबा सुटल्याने हा अपघात झाला आहे. यामध्ये तीन प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. ज्यांना वाचवलं आहे त्यांच्यावर तात्काळ उपचार करण्यात येतील. तर मृतांच्या कुटुंबीयांसाठी राज्य सरकारकडून मदत दिली जाईल."
ही बातमी वाचा: