एक्स्प्लोर

नवी मुंबईत लोकल पकडताना महिला पाय घसरुन रुळांवर पडली; अंगावरून ट्रेन गेली, जीव वाचला पण दोन्ही पाय गमावले

रेल्वे स्थानकात मोठ्या प्रमाणात गर्दी उसळली आहे. याच गर्दीमुळं एका महिला प्रवाशाचा गंभीर अपघात झाला आहे. या अपघातात तिला दोन्ही पाय गमवावे लागले आहे.

मुंबई :  मुंबईत रात्रीपासून पावसाची (Mumbai Rain)  संततधार सुरू आहे. अनेक सखल भागात पाणी साचले आहे. पावसाचा लोकलवरही (Mumbai Local)   परिणाम झाला आहे. मध्य रेल्वे, हार्बर रेल्वे रूळांवर पाणी साचल्याने ठप्प झाल्या आहेत. तर, पश्चिम रेल्वेही उशिराने धावत आहे. यामुळं प्रवाशांची तारांबळ उडाली आहे. रेल्वे स्थानकात मोठ्या प्रमाणात गर्दी उसळली आहे. याच गर्दीमुळं एका महिला प्रवाशाचा गंभीर अपघात झाला आहे. या अपघातात तिला दोन्ही पाय गमवावे लागले आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार,  पनवेलवरून ठाण्याकडे जाणारी लोकल सकाळी नऊच्या दरम्यान बेलापूर सीबीडी रेल्वे स्टेशन येताना एक महिला पाय घसरून रुळावर पडली. तिच्या अंगावर रेल्वेचा पहिला महिला डब्बा गेला. त्यामुळे प्रवाशी आणि रेल्वे प्रशासनाची तारांबळ उडाली. मात्र रेल्वे आणि पोलिस प्रशासनाने काही वेळात रेल्वे मागे घेऊन तिचा जीव वाचवला. पण महिलेचे दोन्ही पाय वाचू शकले नाही.

नागरिकांची कार्यालयात जाण्यासाठी धावपळ

रात्रभर झालेल्या मुसळधार पावसामुळे कुर्ला, चुनाभट्टी परिसरात पाणी साचले होते, त्यामुळे हार्बरवर अनेक रेल्वे उशिराने धावत होत्या तर काही ट्रेन रद्द करण्यात आल्या. त्यामुळे नागरिकांची कार्यालयात जाण्यासाठी धावपळ सुरू होती. यातच अनेक तासापासून बेलापूरवरून ठाण्याला जाण्यासाठी रेल्वे नसल्यामुळे प्रवाशांनी रेल्वे पकडण्यासाठी गर्दी केली होती. गर्दीत महिलेचा पाय घसरून रेल्वे रुळावर पडली आणि तिच्या अंगावरून रेल्वेचा पहिला डब्बा गेला. सततच्या पावसामुळे मुंबईच्या आकाशातील दृश्यमानता कमी झाली आहे. याचा परिणाम मुंबई विमानतळावरील हवाई वाहतुकीवरही झाला आहे. आतापर्यंत जवळपास 27 विमानांच्या दिशा बदलण्यात आल्या आहेत.

गरज असेल तरच बाहेर पडा, मुख्यमंत्र्यांचे जनतेला आवाहन

 मुंबईत सर्वत्र मुसळधार पाऊस झाल्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. रस्त्यावर वाहतूक कोंडी झाली असून रेल्वे मार्गावरील वाहतुकही बाधित झाली आहे. ट्रॅकवरील पाणी काढण्याचे काम रेल्वे प्रशासनाकडून सुरू असून लवकरच वाहतूक पूर्वपदावर आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. सर्व आपत्कालीन यंत्रणांना हाय अलर्टवर राहण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.  गरज असेल तरच नागरिकांनी घराबाहेर पडावे. तसेच मुंबई मनपा, पोलीस प्रशासन आणि आपत्कालीन यंत्रणेला सहकार्य करावे असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले आहे.  

हे ही वाचा : 

Mumbai Rain: मुंबईसाठी पुढील तीन-चार तास अत्यंत महत्त्वाचे, दुपारी समुद्राला उधाण येणार, रेल्वे अजूनही विस्कळीतच 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sanjay Raut on Narayan Rane : ...तेव्हा राणेंच्या कुटुंबीयांनीच उद्धव ठाकरेंना फोन केला होता; नारायण राणेंच्या दाव्याची राऊतांकडून चिरफाड
...तेव्हा राणेंच्या कुटुंबीयांनीच उद्धव ठाकरेंना फोन केला होता; नारायण राणेंच्या दाव्याची राऊतांकडून चिरफाड
Gopichand Padalkar on Jayant Patil : जयंत पाटील म्हणजे कासेला मोठी पण दूध चोरणारी म्हैस, सत्तेशिवाय राहू शकत नाही, लाचार होण्याची तयारी; गोपीचंद पडळकरांची टीका
जयंत पाटील म्हणजे कासेला मोठी पण दूध चोरणारी म्हैस, सत्तेशिवाय राहू शकत नाही, लाचार होण्याची तयारी; गोपीचंद पडळकरांची टीका
पाटणच्या लोकनेते बाळासाहेब देसाई साखर कारखान्यात आग, स्थापनेवेळी उभारलेलं कार्यालय आगीत भस्मसात, पाहा फोटो
पाटणच्या लोकनेते बाळासाहेब देसाई साखर कारखान्यात आग, स्थापनेवेळी उभारलेलं कार्यालय आगीत भस्मसात
Raigad Crime : रायगडमध्ये संतापजनक घटना, 80 वर्षांच्या थेरड्याचा अल्पवयीन मुलीवर अत्याचार, चॉकलेटचं आमिष दाखवून राक्षसी कृत्य
रायगडमध्ये संतापजनक घटना, 80 वर्षांच्या थेरड्याचा अल्पवयीन मुलीवर अत्याचार, चॉकलेटचं आमिष दाखवून राक्षसी कृत्य
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Sanjay raut on Narendra Modi | हिंदुत्ववाद्यांना तैमूर चालतो, संजय राऊतांची मोदींवर टीकाABP Majha Headlines : 10 AM : एबीपी माझा हेडलाईन्स : 22 March 2025 : Maharashtra NewsABP Majha Headlines : 09 AM : एबीपी माझा हेडलाईन्स : 22 March 2025 : Maharashtra NewsABP Majha Headlines : 08 AM : एबीपी माझा हेडलाईन्स : 22 March 2025 : Maharashtra News 23 March 2025

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sanjay Raut on Narayan Rane : ...तेव्हा राणेंच्या कुटुंबीयांनीच उद्धव ठाकरेंना फोन केला होता; नारायण राणेंच्या दाव्याची राऊतांकडून चिरफाड
...तेव्हा राणेंच्या कुटुंबीयांनीच उद्धव ठाकरेंना फोन केला होता; नारायण राणेंच्या दाव्याची राऊतांकडून चिरफाड
Gopichand Padalkar on Jayant Patil : जयंत पाटील म्हणजे कासेला मोठी पण दूध चोरणारी म्हैस, सत्तेशिवाय राहू शकत नाही, लाचार होण्याची तयारी; गोपीचंद पडळकरांची टीका
जयंत पाटील म्हणजे कासेला मोठी पण दूध चोरणारी म्हैस, सत्तेशिवाय राहू शकत नाही, लाचार होण्याची तयारी; गोपीचंद पडळकरांची टीका
पाटणच्या लोकनेते बाळासाहेब देसाई साखर कारखान्यात आग, स्थापनेवेळी उभारलेलं कार्यालय आगीत भस्मसात, पाहा फोटो
पाटणच्या लोकनेते बाळासाहेब देसाई साखर कारखान्यात आग, स्थापनेवेळी उभारलेलं कार्यालय आगीत भस्मसात
Raigad Crime : रायगडमध्ये संतापजनक घटना, 80 वर्षांच्या थेरड्याचा अल्पवयीन मुलीवर अत्याचार, चॉकलेटचं आमिष दाखवून राक्षसी कृत्य
रायगडमध्ये संतापजनक घटना, 80 वर्षांच्या थेरड्याचा अल्पवयीन मुलीवर अत्याचार, चॉकलेटचं आमिष दाखवून राक्षसी कृत्य
Europe NATO : डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीसत्रावर युरोपमधील शक्तीशाली देशांचा अमेरिकेवर पहिला सर्जिकल स्ट्राईक; ट्रम्प यांना प्रस्ताव सुद्धा देणार!
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीसत्रावर युरोपमधील शक्तीशाली देशांचा अमेरिकेवर पहिला सर्जिकल स्ट्राईक; ट्रम्प यांना प्रस्ताव सुद्धा देणार!
Devendra Fadnavis : पिवळ्या रंगांचे सोवळं अन् उपरणं घालून मुख्यमंत्री त्र्यंबकराजाच्या दरबारी, फडणवीसांचा खास लूक पाहिलात का?
पिवळ्या रंगांचे सोवळं अन् उपरणं घालून मुख्यमंत्री त्र्यंबकराजाच्या दरबारी, फडणवीसांचा खास लूक पाहिलात का?
Yashwant Varma : पहिल्यांदा न्यायमूर्तींच्या बंगल्यात पैसा सापडलाच नाही म्हणाले अन् मध्यरात्री सुप्रीम कोर्टाकडून पोतीच्या पोती भरून जळालेल्या पैशाचा व्हिडिओ मध्यरात्री शेअर!
पहिल्यांदा न्यायमूर्तींच्या बंगल्यात पैसा सापडलाच नाही म्हणाले अन् मध्यरात्री सुप्रीम कोर्टाकडून पोतीच्या पोती भरून जळालेल्या पैशाचा व्हिडिओ मध्यरात्री शेअर!
Sushant Singh Rajput Death: सुशांत सिंह राजपूतला विष दिलं की गळा दाबला, चॅटिंगमध्ये काय सापडलं? सीबीआय रिपोर्टमधील 10 महत्त्वाच्या गोष्टी
सुशांत सिंह राजपूतला विष दिलं की गळा दाबला, चॅटिंगमध्ये काय सापडलं? सीबीआय रिपोर्टमधील 10 महत्त्वाच्या गोष्टी
Embed widget