एक्स्प्लोर

Mumbai Air Pollution : मुंबईची हवा पुन्हा बिघडली, मागील 48 तासात हवेच्या गुणवत्तेत घसरण

Mumbai Air Pollution : मुंबईच्या हवेच्या गुणवत्तेमध्ये गेल्या 48 तासांत घसरण झाल्याचं पाहायला मिळत आहे. तसेच मुंबईसोबतच नवी मुंबईच्या हवेची देखील गुणवत्ता खालावत चालल्याचं पाहायला मिळत आहे.

मुंबई : मुंबईच्या (Mumbai) हवेच्या गुणवतत्ता (Pollution) श्रेणीत मागील 48 तासात घसरण झाल्याची माहिती समोर आलीये. मागील 24 तासांत मुंबईतील मागील 24 तासांत हवेच्या गुणवत्ता निर्देशांकाची सरासरी ही 189 वर होती. तसेच गुरुवार 21 डिसेंबर रोजी मुंबईतील हवेचा गुणवत्ता निर्देशांक हा 157 वर पोहचला होता. मागील अनेक दिवसांपासून मुंबईच्या हवेची गुणवत्ता खालावत चालल्याचं चित्र आहे. परिणामी त्याचा विपरित परिणाम मुंबईकरांच्या आरोग्यावर होतोय. 

दरम्यान मुंबईसोबतच नवी मुंबईच्या हवेची देखील गुणवत्ता खालावत चालल्याचं पाहायला मिळत आहे. कारण नवी मुंबईतील हवेचा एक्युआय मागील चोवीस तासांत 201 वर जात वाईट श्रेणीत गेलाय. मुंबईसह पुण्याच्या हवेतही बिघाड झाल्याची माहिती समोर आलीये. कारण पुण्याच्या प्रदुषणात देखील वाढ झाल्याचं पाहायला मिळालं आहे. पुण्याच्या हवेचा गुणवत्ता निर्देशांक हा 211 वर पोहचला आहे. ओ3 आणि पीएम 2.5 पोल्युटंटचे प्रमाण अधिक असल्याचं समोर आलंय. 

मुंबईची हवा बिघडली

वाढत्या प्रदूषणामुळे मुंबईतील हवेची गुणवत्ता बिघडली असून त्याचा आरोग्यावर देखील परिणाम दिसू लागलं आहे.  राज्य सरकार आणि पालिकेकडून मार्गदर्शक नियमावली काढण्यात आली होती. मात्र, नियमावली धाब्यावर बसवल्या जात असल्याचं चित्र पाहायला मिळालं. अशातच, मुंबईत शेकोटीवर देखील बंदी घालण्यात आली असून पालिकेकडून प्रदूषणासंदर्भात कठोर पाऊलं उचलण्यात येणार असल्याचं सांगण्यात येत होतं. तसेच त्यासाठी सुधारित नियमावली जाहीर केली गेली होती. 

अशी होती पालिकेची नियमावली

मुंबईत बांधकाम सुरु असलेल्या ठिकणी 15 दिवसांत प्रिंक्लर आणि महिनाभरात स्मॉग गन लावण्याचे आदेश पालिकेकडून देण्यात आले होते. जर या नियमांचं पालन केलं नाही तर  जागच्या जागी 'स्टॉप वर्क' नोटीस देण्याचे निर्देश देखील दिले होते. तसेच रस्त्यावर राहणाऱ्या बेघरांना हिवाळ्यात सुविधा देण्याचे प्रयत्न करण्यात येतील. एक एकर किंवा त्यापेक्षा अधिक क्षेत्रात बांधकाम असलेल्या जागेच्या अवतीभोवती किमान 35 फूट उंचीचे लोखंडी / पत्र्यांचे आच्छादन असावे. त्याशिवाय, संपूर्ण बांधकाम क्षेत्र ज्यूट किंवा हिरव्या कपडय़ाने झाकलेले असावे.  

धूळ उडू नये यासाठी दिवसातून किमान 4-5 वेळा पाण्याची फवारणी करावी.  रस्त्यांवरील धुळीचे प्रमाण कमी करण्यासाठी अॅण्टी स्मॉग मशीन लावाव्या लागतील. प्रत्येक बांधकामाच्या ठिकाणी स्वतंत्र वायू गुणवत्ता निर्देशांक मोजणारी यंत्रणा बसवावी. सर्व 24 वॉर्डमध्ये सहाय्यक आयुक्तांच्या निर्देशानुसार दोन वॉर्ड अभियंता, एक पोलीस, एक मार्शल आणि एक वाहन अशा स्कॉडच्या माध्यमातून गस्त घालण्यात येईल. 

पण हे नियम देऊनही मुंबईच्या हवेत पुन्हा एकदा बिघाड झाला आहे. दरम्यान जर या नियमांचे पालन केले नाही, तर दंडात्मक कारवाई करण्याचे निर्देश देखील देण्यात आले होते. त्यामुळे आता पालिका कोणती कठोर पावलं उचलणार हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. 

हेही वाचा : 

Infrastructure Project In Mumbai : मुंबईकरांचा प्रवास वेगवान आणि सुखकर होणार; नवीन वर्षाच्या सुरुवातीला महामुंबईत प्रकल्प लोकार्पणाचा धडाका

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Amit Shah Darshan Shani Shingnapur | केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी घेतले शनि देवाचे दर्शन
Amit Shah Darshan Shani Shingnapur | केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी घेतले शनि देवाचे दर्शन
मंत्रिमंडळातून डावलल्यानंतर छगन भुजबळांची समता परिषद ऍक्टिव्ह मोडवर; आगामी निवडणुका स्वबळावर लढण्याची तयारी 
मंत्रिमंडळातून डावलल्यानंतर छगन भुजबळांची समता परिषद ऍक्टिव्ह मोडवर; आगामी निवडणुकांसाठी मोर्चेबांधणी
Amit Shah : शरद पवारांकडून दगा-फटक्याचे राजकारण, ठाकरेंचा द्रोह, अमित शाहांचा भाजप महाअधिवेशनात प्रहार; म्हणाले, खरी राष्ट्रवादी अन् शिवसेना...
शरद पवारांकडून दगा-फटक्याचे राजकारण, ठाकरेंचा द्रोह, अमित शाहांचा भाजप महाअधिवेशनात प्रहार; म्हणाले, खरी राष्ट्रवादी अन् शिवसेना...
Devendra Fadnavis Speech Shirdi | कार्यकर्त्यांमुळं विधानसभेत विजय, पुन्हा ताकदीनं मैदानात उतरा
Devendra Fadnavis Speech Shirdi | कार्यकर्त्यांमुळं विधानसभेत विजय, पुन्हा ताकदीनं मैदानात उतरा
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Amit Shah Darshan Shani Shingnapur | केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी घेतले शनि देवाचे दर्शनSantosh Deshmukh Case | आरोपींना जर सोडलं तर माझा खून करतील, मी स्वत: संपवून घेतो- धनंजय देशमुख100 Headlines | 100 हेडलाईन्स बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट एका क्लिकवर ABP MajhaDevendra Fadnavis Speech Shirdi | कार्यकर्त्यांमुळं विधानसभेत विजय, पुन्हा ताकदीनं मैदानात उतरा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Amit Shah Darshan Shani Shingnapur | केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी घेतले शनि देवाचे दर्शन
Amit Shah Darshan Shani Shingnapur | केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी घेतले शनि देवाचे दर्शन
मंत्रिमंडळातून डावलल्यानंतर छगन भुजबळांची समता परिषद ऍक्टिव्ह मोडवर; आगामी निवडणुका स्वबळावर लढण्याची तयारी 
मंत्रिमंडळातून डावलल्यानंतर छगन भुजबळांची समता परिषद ऍक्टिव्ह मोडवर; आगामी निवडणुकांसाठी मोर्चेबांधणी
Amit Shah : शरद पवारांकडून दगा-फटक्याचे राजकारण, ठाकरेंचा द्रोह, अमित शाहांचा भाजप महाअधिवेशनात प्रहार; म्हणाले, खरी राष्ट्रवादी अन् शिवसेना...
शरद पवारांकडून दगा-फटक्याचे राजकारण, ठाकरेंचा द्रोह, अमित शाहांचा भाजप महाअधिवेशनात प्रहार; म्हणाले, खरी राष्ट्रवादी अन् शिवसेना...
Devendra Fadnavis Speech Shirdi | कार्यकर्त्यांमुळं विधानसभेत विजय, पुन्हा ताकदीनं मैदानात उतरा
Devendra Fadnavis Speech Shirdi | कार्यकर्त्यांमुळं विधानसभेत विजय, पुन्हा ताकदीनं मैदानात उतरा
IND vs ENG : ऑस्ट्रेलियात दणका बसूनही बीसीसीआयची गुगली! शमी परतला, विराट अन् रोहितला वेळ मिळाला; पण टीम निवडताच लक्षात न आलेलं 5 मोठे मुद्दे
ऑस्ट्रेलियात दणका बसूनही बीसीसीआयची गुगली! शमी परतला, विराट अन् रोहितला वेळ मिळाला; पण टीम निवडताच लक्षात न आलेले 5 मोठे मुद्दे
भुजबळांचा सल्ला घेण्याची गरज वाटली नाही, कृषीमंत्री माणिकराव कोकाटेंनी पुन्हा डिवचलं  
भुजबळांचा सल्ला घेण्याची गरज वाटली नाही, कृषीमंत्री माणिकराव कोकाटेंनी पुन्हा डिवचलं  
Food Poisoning : धक्कादायक! अमरावतीच्या गोल्डन फायबर कंपनीत विषबाधा; शेकडो कामगारांची प्रकृती बघडली
धक्कादायक! अमरावतीच्या गोल्डन फायबर कंपनीत विषबाधा; शेकडो कामगारांची प्रकृती बघडली
Police Custody : पोलीस कोठडीत सर्वाधिक मृत्यू होण्याचं प्रमाण कोणत्या राज्यात? देशातील धक्कादायक आकडेवारी
पोलीस कोठडीत सर्वाधिक मृत्यू होण्याचं प्रमाण कोणत्या राज्यात? देशातील धक्कादायक आकडेवारी
Embed widget