एक्स्प्लोर
मुंबईत एअर होस्टेस विमानातून पडली!
हर्षा लोबो असं या 53 वर्षीय एअर होस्टेसचं नाव असून या घटनेत त्यांच्या पाठीच्या कण्याला फ्रॅक्चर झालं आहे.
मुंबई : मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर एक एअर होस्टेस उड्डाणापूर्वी विमानातून खाली पडल्याने जबर जखमी झाली आहे. एअर इंडियाचं दिल्लीला जाणाऱ्या एआय 864 या विमानाचा दरवाजा बंद करत असताना आज (15 ऑक्टोबर) सकाळी 6 वाजून 10 मिनिटांनी ही घटना घडली.
हर्षा लोबो असं या 53 वर्षीय एअर होस्टेसचं नाव असून या घटनेत त्यांच्या पाठीच्या कण्याला फ्रॅक्चर झालं आहे. याशिवाय त्यांच्या उजव्या पायालाही दुखापत झाली आहे. त्यांना विलेपार्ले इथल्या नानावटी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
एल5 हा दरवाजा बंद करताना विमान आणि पायऱ्यांमधील गॅपमुळे हर्षा लोबो घसरुन पडल्या. यानंतर त्या बेशुद्ध पडल्या आणि त्यांना जबर दुखापतही झाली आहे. तर ही दुर्दैवी घटना असून चौकशी सुरु आहे, असं एअर इंडियाने सांगितलं आहे.
"हर्षा लोबो यांच्या अनेक चाचण्या केल्या जात आहेत. सगळ्या चाचण्या झाल्यानंतर त्यांच्यावर नेमके कोणते उपचार करायचे हे स्पष्ट होईल. त्या आमच्या इमर्जन्सी वॉर्डमध्ये आहेत," असं नानावटी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलच्या वतीने सांगण्यात आलं आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
पुणे
विश्व
Advertisement