एक्स्प्लोर
कारवाईचा राग, दुचाकीस्वाराने पोलिसाच्या डोळ्यात मिरची पूड टाकली
यानंतर सहकाऱ्यांनी समीउल्ला भालदार यांना तातडीने रुग्णालयात दाखल केलं. डोळ्यात मिरची पूड गेल्याने भालदार यांच्या डोळ्यांना इजा झाली आहे.
मुंबई : मुंबई पोलिसांवरील हल्ल्याच्या घटनांमध्ये सातत्याने वाढच होत आहे. नियम मोडणाऱ्या दुचाकीस्वारावर कारवाई करणाऱ्या वाहतूक पोलिसाच्या डोळ्यात मिरची पूड टाकल्याची घटना साकीनाका इथे घडली. पोलिसांनी या प्रकरणी दोघांना अटक केली आहे.
साकीनाका टेलिफोन एक्स्चेंज नाक्याजवळ ड्यूटीवर असलेले समीउल्ला भालदार यांनी वाहतूक नियम मोडणाऱ्या दुचाकीस्वारांना अडवलं. दुचारीवर तिघे बसले होते. कारवाईसाठी थांबवल्याने दुचाकीस्वारांना त्याचा राग आला. त्यानंतर एकाने त्याच्याकडील मिरचीपूड भालदार यांच्या डोळ्यात फेकून तिघेही पसार झाले.
यानंतर सहकाऱ्यांनी समीउल्ला भालदार यांना तातडीने रुग्णालयात दाखल केलं. डोळ्यात मिरची पूड गेल्याने भालदार यांच्या डोळ्यांना इजा झाली आहे.
साकीनाका टेलिफोन एक्स्चेंजजवळ सीसीटीव्ही कॅमेरा नसल्याने आणि अंधार असल्याने आरोपींचा शोध घेणे कठीण जात होतं. मात्र आरोपींच्या हातातील लाल रंगाच्या रुमालावरुन आणि गुप्त बातमीदाराच्या सहाय्याने अब्दुल शेख, सद्दाम शेख या दोघांना अटक केली असून पोलिस अधिक तपास करत आहेत.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
जळगाव
महाराष्ट्र
बातम्या
जळगाव
Advertisement