एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

Mumbai News : घाटकोपरमध्ये ओला चालकाची रिक्षा, टेम्पो, बाईकला धडक; आठ जण जखमी, विद्यार्थ्यांचाही समावेश

Mumbai News : मुंबईतील घाटकोपर ओला चालकाने तीन रिक्षा, एक टेम्पो आणि दोन बाईकला धडक दिली. या अपघातात आठ जण जखमी झाले आहेत. जखमींमध्ये विद्यार्थ्याचा समावेश आहे.

Mumbai News : मुंबईतील (Mumbai) घाटकोपर धक्कादायक घटना घडली. एका ओला चालकाने (Ola Driver) आठ जणांना उडवलं. घाटकोपरच्या (Ghatkopar) सुधा पार्क परिसरात हा भीषण अपघात घडला. ओला चालकाने तीन रिक्षा, एक टेम्पो आणि दोन बाईकला धडक दिली. या अपघातात आठ जण जखमी झाले आहेत. जखमींमध्ये तीन विद्यार्थ्यांचाही समावेश आहे. त्यांना उपचारांसाठी राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

अपघात नेमका कसा घडला?
घाटकोपरमध्ये दुपारी एकच्या सुमारास हा अपघात घडला. हा ओला चालक हा घाटकोपरमधील कामराजनगरमध्ये राहतो, अशी माहिती मिळाली आहे. राजू यादव असं या ओला चालकाचं नाव आहे. आज दुपारी सुधा पार्क परिसरात गाडी चालवत असताना अचानकपणे गाडीने वेग घेतला. यावेळी रस्त्यावर जी जी वाहनं होती त्यांना उडवत तो हायवेच्या दिशेने गेला. धडक दिली त्यावेळी रस्त्यावर विद्यार्थी देखील होते. यावेळी ओला चालकाने रिक्षा, टेम्पो आणि दुचाकींना धडक दिली. या अपघातात आठ जण जखमी झाले आहेत, ज्यात तीन विद्यार्थ्यांचाही समावेश आहे. 

पोलिसांनी अपघातानंतर तातडीने ओला चालक राजू यादवला ताब्यात घेतलं आहे. राजावाडी रुग्णालयात आतापर्यंत आठ जणांना उपचारांसाठी दाखल करण्यात आलं आहे. तर झोन पाचचे उपायुक्त प्रशांत कदम हे स्वत: जखमींची विचारपूस करण्यासाठी रुग्णालयात पोहोचले आहेत. 

जखमींचा आकडा वाढण्याची शक्यता
नेमकी काय घटना घडली हे अद्याप समजू शकलेलं नाही. चालकाचं नियंत्रण सुटलं की गाडीमध्ये तांत्रिक बिघाड झाला अथवा तो नशेच्या अंमलात होता की आणखी काही वेगळं कारण आहे याबाबतची माहिती अद्याप समोर आलेली नाही. यासंदर्भात माहिती घेण्यासाठी पोलीस दाखल झाले आहेत. पोलिसांनी चालकाची चौकशी सुरु केली आहे. रुग्णालयात आणखी काही जण दाखल होत आहेत. त्यामुळे अपघातातील जखमींची संख्या आणखी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. परंतु या संपूर्ण घटनेमुळे घाटकोपरमध्ये खळबळ उडाली आहे.

इतर महत्त्वाच्या बातम्या

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Mohan Bhagwat: प्रत्येक जोडप्याला किमान तीन मुलं हवीत, लोकसंख्या शास्त्राचा हवाला देत डॉ. मोहन भागवतांचे मोठे विधान
प्रत्येक जोडप्याला किमान तीन मुलं हवीत, लोकसंख्या शास्त्राचा हवाला देत डॉ. मोहन भागवतांचे मोठे विधान
Alka Yagnik : अलका याज्ञिक तब्बल 28 वर्षांहून अधिक काळ पतीपासून विभक्त आणि अजूनही प्रेमात! नेमकं कारण आहे तरी काय?
अलका याज्ञिक तब्बल 28 वर्षांहून अधिक काळ पतीपासून विभक्त आणि अजूनही प्रेमात! नेमकं कारण आहे तरी काय?
विधानसभेच्या पुण्यात भरलेल्या महाराष्ट्राच्या पहिल्या अधिवेशनाला आलं होतं जाहीरसभेचं स्वरुप..
विधानसभेच्या पुण्यात भरलेल्या महाराष्ट्राच्या पहिल्या अधिवेशनाला आलं होतं जाहीरसभेचं स्वरुप..
पाहुण्यासारखा आला अन् 30 तोळं सोनं चोरुन गेला, साखरपुड्याच्या कार्यक्रमात चोरट्याचा प्रताप, घटना CCTV कॅमेऱ्यात कैद
पाहुण्यासारखा आला अन् 30 तोळं सोनं चोरुन गेला, साखरपुड्याच्या कार्यक्रमात चोरट्याचा प्रताप, घटना CCTV कॅमेऱ्यात कैद
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Raosaheb Danve on CM Maharashtra :  मुख्यमंत्री कोण होणार हे जनतेला ठावूक आहे - रावसाहेब दानवेYugendra Pawar : महाराष्ट्रात संशयाचं वातावरण म्हणून पडताळणीसाठी अर्ज- युगेंद्र पवारABP Majha Headlines :  12 PM : 1 डिसेंबर 2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सCity 60 : सिटी सिक्स्टी : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा :11 AM :1 डिसेंबर 2024 :  ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mohan Bhagwat: प्रत्येक जोडप्याला किमान तीन मुलं हवीत, लोकसंख्या शास्त्राचा हवाला देत डॉ. मोहन भागवतांचे मोठे विधान
प्रत्येक जोडप्याला किमान तीन मुलं हवीत, लोकसंख्या शास्त्राचा हवाला देत डॉ. मोहन भागवतांचे मोठे विधान
Alka Yagnik : अलका याज्ञिक तब्बल 28 वर्षांहून अधिक काळ पतीपासून विभक्त आणि अजूनही प्रेमात! नेमकं कारण आहे तरी काय?
अलका याज्ञिक तब्बल 28 वर्षांहून अधिक काळ पतीपासून विभक्त आणि अजूनही प्रेमात! नेमकं कारण आहे तरी काय?
विधानसभेच्या पुण्यात भरलेल्या महाराष्ट्राच्या पहिल्या अधिवेशनाला आलं होतं जाहीरसभेचं स्वरुप..
विधानसभेच्या पुण्यात भरलेल्या महाराष्ट्राच्या पहिल्या अधिवेशनाला आलं होतं जाहीरसभेचं स्वरुप..
पाहुण्यासारखा आला अन् 30 तोळं सोनं चोरुन गेला, साखरपुड्याच्या कार्यक्रमात चोरट्याचा प्रताप, घटना CCTV कॅमेऱ्यात कैद
पाहुण्यासारखा आला अन् 30 तोळं सोनं चोरुन गेला, साखरपुड्याच्या कार्यक्रमात चोरट्याचा प्रताप, घटना CCTV कॅमेऱ्यात कैद
Raosaheb Danve : नाव ठरलंय, महाराष्ट्राचा नेता कोण असावा, याची स्क्रिप्ट तयार; रावसाहेब दानवेंच्या वक्तव्याने भुवया उंचावल्या
नाव ठरलंय, महाराष्ट्राचा नेता कोण असावा, याची स्क्रिप्ट तयार; रावसाहेब दानवेंच्या वक्तव्याने भुवया उंचावल्या
Allu Arjun Video : जेव्हा पुष्पाराज अल्लू अर्जुन मुंबईमध्ये येताच मराठीमध्ये बोलतो! व्हिडिओ सोशल मीडियात तुफान व्हायरल
Video : जेव्हा पुष्पाराज अल्लू अर्जुन मुंबईमध्ये येताच मराठीमध्ये बोलतो! व्हिडिओ सोशल मीडियात तुफान व्हायरल
Maharashtra CM: देवेंद्र फडणवीस नव्हे तर मुख्यमंत्रीपदी त्यांच्या निकटवर्तीयाची वर्णी? खुद्द रवींद्र चव्हाण यांनीच सस्पेन्स संपवला, म्हणाले मी...
देवेंद्र फडणवीस नव्हे तर मुख्यमंत्रीपदी त्यांच्या निकटवर्तीयाची वर्णी? खुद्द रवींद्र चव्हाण यांनीच सस्पेन्स संपवला, म्हणाले मी...
Gautam Adani : प्रत्येक आव्हान आम्हाला मजबूत बनवते; अमेरिकेतील आरोपांवर गौतम अदानी पहिल्यांदाच बोलले
प्रत्येक आव्हान आम्हाला मजबूत बनवते; अमेरिकेतील आरोपांवर गौतम अदानी पहिल्यांदाच बोलले
Embed widget