Raosaheb Danve on CM Maharashtra : मुख्यमंत्री कोण होणार हे जनतेला ठावूक आहे - रावसाहेब दानवे
Raosaheb Danve on CM Maharashtra : मुख्यमंत्री कोण होणार हे जनतेला ठावूक आहे - रावसाहेब दानवे
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत (Maharashtra Vidhan Sabha Election 2024) महायुतीला (Mahayuti) मोठे यश मिळाले तर महाविकास आघाडीचा (Mahavikas Aghadi) लाजीरवाणा पराभव झाला. यानंतर महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री (Maharashtra CM) कोण होणार? याची संपूर्ण राज्याला उत्सुकता लागली आहे. देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) हे मुख्यमंत्री होतील, असे बोलले जात असले तरी अद्याप भाजपकडून मुख्यमंत्रीपदाचे अधिकृत नाव घोषित करण्यात आलेले नाही. आता भाजप नेते रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) यांनी केलेल्या वक्तव्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. नेमकं काय म्हणाले रावसाहेब दानवे? रावसाहेब दानवे म्हणाले की, भाजपची काम करण्याची पद्धत आहे. त्याप्रमाणे काम सुरू आहे. पक्षाने नवनिर्वाचित आमदारांची बैठक बोलवून नेता निवडला जाईल. महाराष्ट्र राज्याचा नेता कोण असावा, याची स्क्रिप्ट तयार आहे. महाराष्ट्राच्या निवडणुकांचा निकाल विचार करून स्क्रिप्ट लिहून ठेवली आहे. आता त्यावर सही होणार आणि मग नाव बाहेर येणार अर्थात नाव ठरवलेलं आहे. राज्याला माहिती आहे की, मुख्यमंत्री कोण होणार आहे. जनता संभ्रमात नाही. जनता तो पर्यंत बोलत नाही, तोपर्यंत आमचे वरिष्ठ नेते बोलत नाही, असे त्यांनी म्हटले आहे.