एक्स्प्लोर
काळ्या-पिवळ्या टॅक्सीचं घरबसल्या बुकिंग, लवकरच अॅप
मुंबई : मुंबईत ओला-उबरची गारेगार सेवा येण्यापूर्वी काळी-पिवळी टॅक्सी अनेकांचा आधार होती. आता हीच टॅक्सी तुम्हाला घरबसल्या बुक करता येणार आहे. काळी-पिवळी टॅक्सी आपलं 'आमची ड्राईव्ह' हे अॅप 1 जूनला लॉन्च करणार आहे.
या अॅपद्वारे तुम्ही मुंबईतील कोणतीही काळी-पिवळी टॅक्सी बुक करु शकाल. ओला-उबरच्या तुलनेने कमी दरात आपण या अॅपचा उपयोग करुन घरबसल्या टॅक्सी बुक करु शकणार आहात.
'आमची ड्राईव्ह' हे अॅप सन टेलिमॅटिक्स या कंपनीने तयार केलं असून विशेष म्हणजे मराठी, हिंदी, इंग्रजी या तिन्ही भाषेत ते उपलब्ध असेल. याबाबत काळी-पिवळी टॅक्सीच्या चालकांना ट्रेनिंग देण्यात येईल.
1 जूनपासून जवळपास 2 हजार टॅक्सी या अॅपद्वारे मुंबईकरांच्या सेवेत येणार आहेत. त्यामुळे पावसाळ्यात गारेगार ओला-उबरला नॉन एसी काळी पिवळी टॅक्सी टक्कर देऊ शकेल.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
जालना
भविष्य
भारत
कोल्हापूर
Advertisement