एक्स्प्लोर
कॅन्सरशी झुंज सुरु असलेल्या 4 वर्षीय मुलीचा लोकलमधून पडल्याने मृत्यू
नेहावर केमोथेरपी आणि अन्य उपचार सुरु होते. परंतु तिचा असा दुर्दवी मृत्यूने हळहळ व्यक्त केली जात आहे.

मुंबई : मुंबईत लोकलमधून पडून रोज कोणी मृत्यूमुखी पडतं तर कोणी जखमी होतं. याच लोकलमधून कॅन्सरशी झुंज देणाऱ्या एका चार वर्षाच्या मुलीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना गेल्या आठवड्यात चेंबूर स्टेशनवर घडली. नेहा ढगे असं मृत मुलीचं नाव आहे. मूळची विदर्भाची असणारी नेहा कॅन्सरवरील उपचारासाठी आपल्या आईसोबत चेंबूर स्टेशनवर आली होती. तिची आई तिला घेऊन प्रवाशांनी खच्चून भरलेल्या ट्रेनमध्ये प्रवेश करण्याचा प्रयत्न करत असताना, गर्दीच्या रेट्यामुळे दोघीही प्लॅटफॉर्मवर पडल्या. प्लॅटफॉर्मवर पडल्यानंतर नेहाच्या तोंडातून आणि कानातून रक्तस्त्राव सुरु झाला. तिच्या हातांना आणि पायालाही मार लागला. तिच्या आईच्या डोळ्यांना मार लागला होता. रेल्वे पोलिस लगेच दोघींना राजावाडी रुग्णालयात घेऊन गेले. नेहाची प्रकृती गंभीर असल्यामुळे तिला केईएम रुग्णालयात हलवले. आयसीयूमध्ये असताना 9 सप्टेंबरला नेहाचा मृत्यू झाला. ढगे कुटुंब पाच महिन्यांपासून नेहाच्या उपचारासाठी मुंबईत होते. नेहावर केमोथेरपी आणि अन्य उपचार सुरु होते.परंतु तिचा असा दुर्दवी मृत्यूने हळहळ व्यक्त केली जात आहे.
आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
व्यापार-उद्योग
निवडणूक
राजकारण























