एक्स्प्लोर
घसरलेला फोन पकडताना दीड वर्षांची लेक दहाव्या मजल्यावरुन पडली
दीड वर्षांच्या अऩूने एका हाताने रॉड पकडला होता, तर आईनेही मुलीला धरलं होतं. त्याचवेळी आरतीचा फोन हातातून घसरला. तो पकडण्याच्या प्रयत्नात अनूला धक्का लागला आणि ती खिडकीतून थेट खाली पडली.
मुंबई : हातातून घसरणारा फोन पकडण्याच्या नादात एका महिलेने आपली मुलगी गमावल्याची दुर्दैवी घटना मुंबईत समोर आली आहे. हातातून घसरणारा फोन पकडताना दुसऱ्या हातात धरलेली दीड वर्षांची मुलगी दहाव्या मजल्यावरुन खाली कोसळून मृत्युमुखी पडली.
हिंदुस्तान टाइम्स वृत्तपत्राने यासंदर्भात बातमी दिली आहे. 27 वर्षीय आरती यादव पती आणि दीड वर्षांची मुलगी अनूसह अंधेरी पूर्वेला असलेल्या रिहाब कनाकिया इमारतीत राहते. आरती मुलीला कडेवर धरुन इमारतीच्या दहाव्या मजल्यावरील खिडकीत उभी होती.
खिडकीला साडेतीन फूट उंच भिंत असून त्यावर दोन रॉड्स आहेत. दीड वर्षांची अनू खिडकीपाशी उभी होती. तिने एका हाताने रॉड धरला होता, तर आरतीनेही मुलीला पकडलं होतं. त्याचवेळी आरतीचा फोन हातातून घसरला. तो
पकडण्याच्या प्रयत्नात अनूला धक्का लागला आणि ती खिडकीतून थेट खाली पडली.
चिमुरडीला तात्काळ रुग्णालयात दाखल केलं, मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं. आरतीचे पती रिअल इस्टेट
व्यावसायिक असून यामागे घातपाताची शक्यता त्यांनी धुडकावून लावली आहे. घटनेचा तपास करणाऱ्या पोलिसांनीही हा दुर्दैवी अपघात असल्याचं म्हटलं आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
राजकारण
महाराष्ट्र
महाराष्ट्र
Advertisement