(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Mufti Salman Azhari : गुजरातमध्ये आक्षेपार्ह वक्तव्य, सुन्नी धर्मगुरूंना घाटकोपरमध्ये अटक, समर्थकांच्या राड्यानंतर मुंबई पोलिसांचा लाठीचार्ज
इस्लामचे मार्गदर्शक मुफ्ती सलमान अजहरी (Mufti Salman Azhari) यांना गुजरात पोलिसांकडून घाटकोपरमधून अटक करण्यात आली आहे. त्यानंतर घोटकोपरमध्ये त्यांच्या समर्थकांनी मोठी गर्दी केली.
मुंबई: इस्लामचे मार्गदर्शक मुफ्ती सलमान अजहरी (Mufti Salman Azhari) यांना गुजरात पोलिसांनी घाटकोपरमधून अटक केल्यानंतर घाटकोपरमध्ये तणाव वाढल्याचं पहायला मिळालं. या ठिकाणी समर्थकांच्या मोठ्या जमावानंतर, त्यांनी बराच वेळ रास्ता रोको केल्यानंतर पोलीस अॅक्शन मोडमध्ये आले असून त्यांनी सौम्य लाठीचार्ज केला.
सलमान मुफ्ती अजहर यांना घोटकोपरमध्ये अटक केल्याची बातमी समजल्यानंतर त्या ठिकाणी त्यांच्या समर्थकांनी मोठी गर्दी केली. त्यानंतर परिस्थिती नियंत्रणाबाहेर जात असल्याची स्थिती निर्माण झाल्यानंतर मुफ्ती यांनी पोलीस ठाण्याच्या खिडकीतून सगळ्यांना शांत राहण्याचे आणि रस्ता मोकळा करण्याचं आवाहन केलं. पण तरीही त्यांच्या समर्थकांनी मोठी गर्दी केली आणि घोषणाबाजी सुरूच ठेवली.
जुनागढमध्ये केलेल्या वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी गुजरात एटीएसने मुफ्ती यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. 31 जानेवारीला जुनागड गुजरात ला एक भाषण मुफ्ती सलमान अझरी यांनी एक भाषण केले होत.त्यानंतर त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे. सममान मुफ्ती अजहर हे सुन्नी धर्मगुरू आहेत.
गुजरातमध्ये वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर मुफ्ती सलमान अजहरी यांच्यावर कलम 153 B अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर गुजरात एटीएसने मुफ्ती सलमान यांना घाटकोपर येथून ताब्यात घेतले.
समर्थकांच्या राड्यानंतर पोलीस आक्रमक
मुफ्ती सलमान अजहरी यांना गुजरात एटीएसने अटक केल्यानंतर त्यांच्या समर्थकांनी घाटकोपरमध्ये मोठी गर्दी केली आणि रास्ता रोको केला. त्यानंतर पोलिसांनी आवाहन करूनही समर्थकांनी मागे हटण्यास नकार दिला. त्यानंतर स्वतः डीसीपी हेमराज राजपूत हे रस्त्यावर उतरले आणि त्यांनी रस्ता मोकळा करण्यास सुरूवात केली.
समर्थकांच्या हुल्लडबाजीनंतर पोलीस अॅक्शन मोडमध्ये आले असून त्यांनी रास्ता रोको करणाऱ्या जमावावर सौम्य लाठीचार्ज केला.
घाटकोपरचा एलबीएस मार्ग हा अत्यंत महत्त्वाचा असून तो मुफ्ती यांच्या समर्थकांनी सकाळपासून रोखूुन धरला होता. त्यामुळे आता पोलिसांनी आक्रमक भूमिका घेतली असून रास्ता रोको करणाऱ्या समर्थकांवर लाठीचार्ज केला
जुनागडमध्ये मुफ्ती सलमान अजहरी यांनी भाषण देताना आक्षेपार्ह वक्तव्य केलं होतं. त्यांचं हे वक्तव्य सोशल मीडियावर चांगलंच व्हायरल होत आहे. त्यामुळे दोन समाजात तेढ निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेऊन गुजरात एटीएसने त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आणि त्यांना मुंबईतून अटक केली.
मुफ्ती सलमान यांना रात्री घाटकोपर पोलीस स्थानकात ठेवण्यात येणार असून सोमवारी सकाळी वरळी कोर्टात हजर करण्यात येणार असल्याची माहिती आहे.
ही बातमी वाचा :