एक्स्प्लोर
Advertisement
चक्क सुप्रिया सुळेंशी टॅक्सी चालकाचे गैरवर्तन!
राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांना आज मुंबईत दादर स्टेशनमध्ये टॅक्सीचालकाच्या मुजोरीचा अनुभव आला. टॅक्सी नाकारूनही या टॅक्सीचालकानं सुळेंशी हुज्जत घातली आणि वर त्यांच्यासोबत फोटो काढण्याचाही प्रयत्न केला. सुळे यांनी हा प्रकार ट्विट केलाय.
मुंबई: टॅक्सी चालकांची मुजोरी, अरेरावी मुंबईकरांना काही नवी नाही. मात्र, आज चक्क राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे यांनाच टॅक्सी चालकाच्या मुजोरीचा अनुभव आला. दादर स्टेशन परिसरात आलेल्या या अनुभवाबद्दल त्यांनी ट्विट करून माहिती दिलीये. औरंगाबादहून मुंबईत दादरला रेल्वे स्थानकावर उतरताना सुप्रिया सुळेंसोबत हा प्रकार घडला.
सुप्रिया सुळे या ट्विटमध्ये म्हणतात की, दादर स्टेशनवर आज एक विचित्र अनुभव आला. कुलजित सिंग मल्होत्रा नावाचा एक माणूस ट्रेनमध्ये येऊन टॅक्सी घेण्यासाठी विचारू लागला. मात्र, त्याला दोनदा नकार देऊनही त्यानंं माझी वाट अडवली, मला त्रास दिला आणि निर्लज्जपणे फोटोही घेऊ लागला.
Witnessed a strange experience at Dadar Station. A man by the name of Kuljit Singh Malhotra entered the train and was touting for Taxi service. Despite a refusal twice he blocked my path, harassed me and shamelessly even posed for the photo. (1/3)
— Supriya Sule (@supriya_sule) September 12, 2019
सुळे यांनी हा सगळा प्रकार आपल्या पुढच्या ट्विटमध्ये रेल्वे मंत्रालयाच्या निदर्शनास आणलाय. घडल्या प्रकारात रेल्वे मंत्रालयानं लक्ष घालावं जेणेकरून प्रवाशांना अशा अनुभवांचा सामना करावा लागणार नाही. टॅक्सीचालकांना टॅक्सीसेवेसाठी प्रवाशांना विचारणं कायदेशीर असेल, मात्र रेल्वे स्थानकं, विमानतळ इथं अशी परवानगी न देता फक्त ठराविक टॅक्सी तळांवरच देण्यात यावी. असं या ट्विटमध्ये सुळे यांनी म्हटलंय. याशिवाय, सुळे यांनी रेल्वे पोलिसांत लिखित तक्रारही दाखल केली. "अशा प्रकारे प्रवाशांना टॅक्सी घेण्यासाठी त्रास देणं, त्यांच्या मागे लागणं ही छळवणूक आहे. महिलेच्या जवळ जाऊन असं वागणं चुकीचं आहे", असंही सुप्रिया सुळे 'एबीपी माझा'शी फोनवर प्रतिक्रिया देताना म्हणाल्या.
सुप्रिया सुळेंच्या या संतापाची दखल घेत रेल सुरक्षा दलाच्या पोलिसांकडून संबंधित टॅक्सी चालकावर कारवाई करण्यात आली. दरम्यान, जवळचं भाडं, वेगळ्या रूटचं भाडं न घेण्याचा किंवा सार्वजनिक वाहतूक व्यवस्था कोलमडल्यास टॅक्सी चालकांच्या छळवणुकीचा सामान्यांना येणारा अनुभव खासदारांनाही आल्यानं ही प्रवृत्ती किती फोफावली आहे तेही दिसून येत आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
भारत
निवडणूक
निवडणूक
Advertisement