एक्स्प्लोर
विमानतळावर बॉम्ब असल्याची मस्करी मॉडेलला पडली महागात
मुंबई: एका बॅगेत बॉम्ब असल्याची खोटी अफवा उठवत गुरुवारी मुंबई विमानतळावर एका महिलेनं मोठा गोंधळ उडवून दिला. रात्री 8 वाजता कांचन ठाकूर या मॉडेलनं आपल्या मैत्रिणीची बॅगेत बॉम्ब असल्याचं सुरक्षारक्षकांना सांगितलं. यामुळे विमानतळावर एकच खळबळ उडाली आणि मोठा गोंधळ सुरु झाला.
या गोंधळामुळे सुरक्षारक्षकांची देखील मोठी धावपळ झाली होती. मात्र, हे सगळं सुरु असतानाच कांचन ठाकूरनं आपण जोक करत असल्याचं सांगितलं. यामुळे दिल्लीला जाणाऱ्या प्रवाशांचा जवळपास तासभर खोळंबा झाला. तसंच आपल्या मनोरंजनासाठी प्रवाशांना वेठीस धरणाऱ्या या माथेफिरु मॉडेलला 3 वर्षांचा तुरुंगवासही होऊ शकतो. मात्र, सध्या कांचन ठाकूर जामिनावर बाहेर आहे.
या गोंधळामुळे सुरक्षारक्षकांनी तात्काळ सीआयएसएफच्या जवानांना पाचारण केलं. त्यानंतर मॉडेलसह तिच्या तीन मित्रांना त्यांनी ताब्यात घेतलं. या सर्व प्रकारामुळे तब्बल एक तास उशीरा विमानानं उड्डाण केलं.
दरम्यान, सीआयएसएफनं जवानांना ताब्यात घेतल्यानंतर कांचननं त्यांच्याशी बराच वाद घाताल. त्यानंतर सीआयएसएफनं त्यांना पोलिसांच्या ताब्यात दिलं. याप्रकरणी मॉडेल कांचनवर कलम 505 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे तिला तीन वर्षाची शिक्षा भोगावी लागू शकते.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
पुणे
विश्व
छत्रपती संभाजी नगर
Advertisement