एक्स्प्लोर

...तेव्हा तुझा धर्म कुठे गेला होता कर्णा; मनसे नेते संदीप देशपांडेंची राऊत यांच्या 'रोखठोक'वर प्रतिक्रिया

शिवसेना नेते संजय राऊत यांनी कंगना रनौत प्रकरणात सामानाच्या रोखठोक या सदरातून मनसेला साद घातली आहे. त्यावर मनसे नेते संदीप देशपांडे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

मुंबई : अभिनेत्री कंगना रनौत आणि शिवसेना यांच्यातील वाकयुद्ध वाढतचं चाललं आहे. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आता याप्रकरणात राज ठाकरे यांनी साद घातली आहे. सामानाच्या रोखठोक या सदरातून राऊत यांनी महाराष्ट्रासाठी एकत्र येण्याचं आवाहन केलंय. यावर मनसे नेते यांनी आपलं वेगळं मत मांडलय. जेव्हा अभिमन्यू एकटा लढत होता. त्यावेळी तुझा धर्म कुठं होता कर्णा? अशी उपमा देत देशपांडे यांनी शिवसेनेवर टीका केली आहे.

सामनाच्या 'रोखठोख' या सदरातून शिवसेना खासदार संजय राऊत यांनी कंगना रनौत आणि भाजपवर जोरदार हल्लाबोल केला आहे. यावेळी त्यांनी महाराष्ट्रासाठी एकत्र येण्यासाठी राज ठाकरे यांना साद घातली आहे. राऊत यांनी लिहिलं आहे की, ‘ठाकरे’ हा महाराष्ट्राच्या स्वाभिमानाचा एक ब्रॅण्ड आहे. दुसरा महत्त्वाचा ‘ब्रॅण्ड’ पवार नावाने चालतो आहे. मुंबईतून या ब्रॅण्डनाच नष्ट करायचे व त्यानंतर मुंबईवर ताबा मिळवायचा हे कारस्थान पुन्हा उघडे पडले आहे. राज ठाकरे हेसुद्धा त्याच ‘ब्रॅण्ड’चे एक घटक आहेत व या सगळ्याचा फटका भविष्यात त्यांनाही बसणार आहे. शिवसेनेबरोबर त्यांचे मतभेद असू शकतात, पण शेवटी महाराष्ट्रात ‘ठाकरे’ ब्रॅण्डचा जोर असायला हवा. ज्या दिवशी ‘ठाकरे’ ब्रॅण्डचे पतन होईल त्या दिवसापासून मुंबईचे पतन व्हायला सुरुवात होईल, असं ठाकरे यांनी म्हटलं आहे.

शिवसेनेने आमच्याशी दगाफटका केलाय : मनसे नेते संदीप देशपाडे

2008 पासून महाराष्ट्रासाठी आणि मराठी बांधवांसाठी राज ठाकरे यांनी आंदोलन उभं केलं. त्यावेळी शिवसेनेचे खासदार दिल्लीत मूग गिळून गप्प बसले होते. पाकिस्तानी कलाकारांना या महाराष्ट्राबाहेर हाकलून द्यावं, अशी जेव्हा मनसेने भूमिका घेतली. त्यावेळी शिवसेनेचे नेते गप्पचं होते. 2014 आणि 2017 निवडणुकीवेळी राज ठाकरे यांनी शिवसेनेला साद घातली. त्यावेळी सेनेच्या नेत्यांनी आमच्यासोबत दगाफटका केला. रातोरात आमचे नगरसेवक पळून नेले. त्यामुळे जो प्रश्न कृष्णाने कर्णाने केला होता. तोच प्रश्न मला इथं विचारावा वाटतोय. कर्णाचं चाक रुतलं होतं, त्यावेळी कृष्ण कर्णाला म्हणाला.. अभिमन्यू एकटा लढत होता, त्यावेळी तुझा धर्म कुठं गेला होता कर्णा, अशी उपमा देत देशपांडे यांनी शिवसेनेवर टीका केली आहे.

मुंबईला ग्रहण लावणाऱ्या उपऱ्यांना घरभेद्यांकडून बळ, संजय राऊतांची 'रोखठोक' टीका 

या लेखात संजय राऊत म्हणतात की, मुंबईला पाकिस्तान म्हणणाऱ्या, मुंबईचा अपमान करणाऱ्या नटीच्या मागे भाजप उभा राहतो हे दुर्दैवी आहे. महाराष्ट्राची राजधानी मुंबईस ग्रहण लावण्याचे प्रयत्न पुन्हा सुरु झाले आहेत. हे ग्रहण उपरे लावत आहे. पण त्यांना बळ देण्यासाठी परंपरेप्रमाणेच आपल्यातलेच घरभेदी सरसावले आहेत. मधल्या काळात मुंबईस पाकिस्तान म्हटले गेले. मुंबईचा अपमान करणाऱ्या एका नटीच्या बेकायदेशीर बांधकामावर मुंबई महापालिकेने कारवाई केली तेव्हा महापालिकेचा उल्लेख बाबर असा करण्यात आला. मुंबईला आधी पाकिस्तान आणि नंतर बाबर म्हणणाऱ्यांमागे भारतीय जनता पक्ष उभा राहतो हे दुर्दैवच म्हणायला हवे, असं राऊत यांनी म्हटलं आहे.

...तेव्हा तुझा धर्म कुठे गेला होता कर्णा; मनसे नेते संदीप देशपांडेंची 'रोखठोक'वर प्रतिक्रिया

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

उपमुख्यमंत्री नाराज होऊन कोणत्या गावाला गेले ते शोधा, आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला
उपमुख्यमंत्री नाराज होऊन कोणत्या गावाला गेले ते शोधा, आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला
पंढरीच्या गर्दीचं नियोजन अन् नियंत्रणासाठी AI तंत्रज्ञानचा वापर; कोट्यवधी रुपयांचा प्रस्ताव सादर
पंढरीच्या गर्दीचं नियोजन अन् नियंत्रणासाठी AI तंत्रज्ञानचा वापर; कोट्यवधी रुपयांचा प्रस्ताव सादर
दोस्तीत कुस्ती... किरकोळ वादातून मित्रानेच केला मित्राचा खून; पोलिसांकडून फरार आरोपीचा शोध सुरू
दोस्तीत कुस्ती... किरकोळ वादातून मित्रानेच केला मित्राचा खून; पोलिसांकडून फरार आरोपीचा शोध सुरू
मुंबईत मॉलमधील महिलेचा फोटो काढून विनयभंग; मनसैनिकांनी चोप देताच मागितली कान धरुन माफी
मुंबईत मॉलमधील महिलेचा फोटो काढून विनयभंग; मनसैनिकांनी चोप देताच मागितली कान धरुन माफी
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 8PM TOP Headlines 08 PM 20 January 2025Nashik Crime News : 8 वर्षाच्या गतिमंद अल्पवयीन मुलावर अनैसर्गिक लैंगिक अत्याचार करुन हत्याABP Majha Marathi News Headlines 7PM TOP Headlines 07 PM 20 January 2025Aaditya Thackeray PC : जाळपोळ करुन पालकमंत्रिपद मिळात असेल तर चुकीचं : आदित्य ठाकरे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
उपमुख्यमंत्री नाराज होऊन कोणत्या गावाला गेले ते शोधा, आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला
उपमुख्यमंत्री नाराज होऊन कोणत्या गावाला गेले ते शोधा, आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला
पंढरीच्या गर्दीचं नियोजन अन् नियंत्रणासाठी AI तंत्रज्ञानचा वापर; कोट्यवधी रुपयांचा प्रस्ताव सादर
पंढरीच्या गर्दीचं नियोजन अन् नियंत्रणासाठी AI तंत्रज्ञानचा वापर; कोट्यवधी रुपयांचा प्रस्ताव सादर
दोस्तीत कुस्ती... किरकोळ वादातून मित्रानेच केला मित्राचा खून; पोलिसांकडून फरार आरोपीचा शोध सुरू
दोस्तीत कुस्ती... किरकोळ वादातून मित्रानेच केला मित्राचा खून; पोलिसांकडून फरार आरोपीचा शोध सुरू
मुंबईत मॉलमधील महिलेचा फोटो काढून विनयभंग; मनसैनिकांनी चोप देताच मागितली कान धरुन माफी
मुंबईत मॉलमधील महिलेचा फोटो काढून विनयभंग; मनसैनिकांनी चोप देताच मागितली कान धरुन माफी
Raigad And Nashik Guardian Minister : रायगड अन् नाशिकच्या पालकमंत्रिपदाला स्थगिती, पण झेंडावंदन अदिती तटकरे अन् गिरीश महाजनच करणार
रायगड अन् नाशिकच्या पालकमंत्रिपदाला स्थगिती, पण झेंडावंदन अदिती तटकरे अन् गिरीश महाजनच करणार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 20 जानेवारी 2025 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 20 जानेवारी 2025 | सोमवार
विधानसभा निवडणुकांचा गृहविक्रीवर परिणाम; तीन महिन्यांत 31 टक्के घट, पुण्यात किती घरांची विक्री?
विधानसभा निवडणुकांचा गृहविक्रीवर परिणाम; तीन महिन्यांत 31 टक्के घट, पुण्यात किती घरांची विक्री?
गोपीनाथ मुंडे आज असते तर धनंजय मुंडेंना जिल्ह्यातून लाथ मारुन हाकललं असतं; ठाकरेंचा आमदार संतापला
गोपीनाथ मुंडे आज असते तर धनंजय मुंडेंना जिल्ह्यातून लाथ मारुन हाकललं असतं; ठाकरेंचा आमदार संतापला
Embed widget