एक्स्प्लोर

जमील शेख हत्या प्रकरण | मला अडकवण्याचा प्रयत्न केला जातोय; राष्ट्रवादीच्या ज्येष्ठ नगरसेवकांचा दावा

मनसेचे राबोडी प्रभाग अध्यक्ष जमील शेख हत्येप्रकरणी उत्तर प्रदेश एसटीएफने मोठा खुलासा केला.

मुंबई : मनसेचे राबोडी प्रभाग अध्यक्ष जमील शेख हत्येप्रकरणी उत्तर प्रदेश एसटीएफने मोठा खुलासा केला. एक पत्रकार परिषद घेऊन एसटीएफने मनसे नेते जमील शेख यांच्या हत्येप्रकरणी लखनौमधून एकाला अटक केल्याचे सांगितले. 

युपी पोलिसांनी दिलेल्या प्रेस नोट मध्ये ठाण्यातील राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नगरसेवक नजीब मुल्ला यांचे नाव आहे. पण, नजीब यांच्याशी फोन वर संपर्क साधला. "माझे या प्रकरणाशी काहीही संबंध नाही, मला अडकवण्याचा प्रयत्न केला जातोय, महाराष्ट्र पोलिसांच्या चौकशीत सत्य समोर येईल", असे त्यांनी सांगितले. 

दरम्यान, या हत्येप्रकरणी अटक करण्यात आलेला हा आरोपी गोरखपूरमधील रहिवासी असून इरफान सोनू शेख मंसूरी उर्फ राजधनिया असे त्याचे नाव आहे. जवळपास पाच महिने तो फरार होता. युपी एस टी एफ ने दिलेल्या माहितीनुसार, विभूती खंड पोलिस स्टेशन परिसरातील कठौता तलावाजवळ एसटीएफने इरफानला पकडले. 

जमील यांची 23 नोव्हेंबर 2020 मध्ये राबोडी मध्येच गोळी मारून हत्या करण्यात आली होती. हत्येची संपूर्ण घटना परिसरात असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली होती. जमील शेख हे बाइकवरुन निघाले होते. त्यावेळी पाठीमागून बाइकवर आलेल्या दोन जणांपैकी मागे बसलेल्या एकाने जमील यांच्यावर गोळी झाडली. डोक्याच्या मागे गोळी लागल्याने  जमील यांची अवस्था गंभीर होती, त्यातच हॉस्पिटलच्या वाटेवर त्यांचा मृत्यू झाला. जमील अहमद शेख यांच्या हत्येनंतर ठाणे क्राईम ब्रांच पोलिस पाच महिने आरोपीच्या शोधात होते.

ठाण्यातील मनसे नेत्याची हत्या करणाऱ्या शूटरला लखनौमध्ये युपी पोलिसांची अटक

सदर गुह्याच्या तपासासाठी मागिल अनेक महिन्या पासून ठाणे गुन्हे शाखेचे अधिकारी उत्तर प्रदेश मधे ठान मांडून बसले आहेत. आता अटक केलेल्या आरोपीला ताब्यात घेवून ठाण्यात आल्यावर आणाखी पुढे तपास होणार आहे. दरम्यान युपी पोलिसांनी केलेल्या कारवाईची माहिती मिळाल्यानंतर ठाण्यातील राबोडी परिसरात मोठा तणाव निर्माण झाला होता. त्यामुळे पोलिसांनी दंगल नियंत्रक पथक तैनात केले होते. काही वेळाने हा तणाव शांत झाला. 

 

गेल्या 7 वर्षांपासून एबीपी माझाशी नाळ बांधली आहे. रेल्वे आणि रस्ते वाहतुकीचे वार्तांकन करताना, ठाणे जिल्ह्याची जबाबदारी देखील सांभाळत आहेत. यासोबतच राजकीय बातम्या विशेषतः शिंदे गटाची जबाबदारी यांच्याकडे आहे. याआधी मी मराठी, जय महाराष्ट्र सारख्या वृत्त वाहिन्यात आणि वृत्तपत्रात कामाचा अनुभव आहे

Read More

महत्त्वाच्या बातम्या

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 9 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 9 ऑगस्ट 2026 | मंगळवार
कोणी हस्तक्षेप करुन कुणबी प्रमाणपत्र रद्द केली असतील तर त्यावर यंत्रणा बसवण्याचा विचार, जरांगेंच्या टीकेनंतर उदय सामंतांचं प्रत्युत्तर 
कोणी हस्तक्षेप करुन कुणबी प्रमाणपत्र रद्द केली असतील तर त्यावर यंत्रणा बसवण्याचा विचार, जरांगेंच्या टीकेनंतर उदय सामंतांचं प्रत्युत्तर 
धक्कादायक! तोल गेला हात निसटला, धावत्या लोकलमधून थेट खाली पडला, मुंबई फिरण्यासाठी गेलेल्या 17 वर्षीय युवकाचा  मृत्यू
धक्कादायक! तोल गेला हात निसटला, धावत्या लोकलमधून थेट खाली पडला, मुंबई फिरण्यासाठी गेलेल्या 17 वर्षीय युवकाचा  मृत्यू
Vasai News: हातात एक वर्षाची चिमुकली, स्कूटीवरून प्रवास; वाऱ्याने केस विस्कटले, आई केस बांधत असतानाच अनर्थ घडला, वसईतील काळीज पिळवटून टाकणारी घटना
हातात एक वर्षाची चिमुकली, स्कूटीवरून प्रवास; वाऱ्याने केस विस्कटले, आई केस बांधत असतानाच अनर्थ घडला, वसईतील काळीज पिळवटून टाकणारी घटना

व्हिडीओ

Raj Thackeray Special Report : मुंबई-गोवा महामार्गावरुन राज ठाकरेंचे सरकारला खडेसवाल : ABP Majha
Maharashtra Rain : महाराष्ट्रात पाऊस लय भारी... गाठली सरासरी Special Report
Sharad Pawar MP Will Meet Pm Modi : भेटीगाठींचा सिलसिला, पवारांचा काय फैसला? Special Report
Raj Thackeray PC : कोकणातले खड्डे, जमिनीची विक्री, कंत्राटदारते नितीन गडकरी, राज ठाकरेंची FULL PC
Prashant Damle Majha Katta : रंगभूमीवर महाविक्रम, कधीही न ऐकलेले किस्से, प्रशांत दामलेंचा ‘माझा कट्टा’

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Milk Alteration Racket : दूध भेसळ प्रकरणात आणखी दहा जण अटकेत, मंचर पोलिसांनी बेड्या ठोकल्या, अटकेचा आकडा 24 वर, राजकीय कनेक्शन असल्याची चर्चा!
दूध भेसळ प्रकरणात आणखी दहा जण अटकेत, मंचर पोलिसांनी बेड्या ठोकल्या, अटकेचा आकडा 24 वर
ED Chief Rahul Navin : ईडीचे प्रमुख राहुल नवीन यांचा कार्यकाळ एका वर्षानं वाढवला, मोदी सरकारचा मोठा निर्णय
ईडीचे प्रमुख राहुल नवीन यांचा कार्यकाळ एका वर्षानं वाढवला, मोदी सरकारचा मोठा निर्णय
मनोज जरांगे पाटलांची बावनकुळेंवर व्यंगात्मक टीका; म्हणाले, हडप्पा संस्कृती अन् अजंठा लेणीप्रमाणे दिसणारा प्राणी
मनोज जरांगे पाटलांची बावनकुळेंवर व्यंगात्मक टीका; म्हणाले, हडप्पा संस्कृती अन् अजंठा लेणीप्रमाणे दिसणारा प्राणी
Sarfaraz Khan: अखेर सरफराज खानसाठी टीम इंडियाची दारं पुन्हा उघडली, बीसीसीआयची मोठी घोषणा, साई सुदर्शनच्या जागी संधी
अखेर सरफराज खानसाठी टीम इंडियाची दारं पुन्हा उघडली, बीसीसीआयची मोठी घोषणा
IND vs SL XI : 6,6,6... सिराजचा सराव सामन्यात धमाका, विजयासाठी एका ओव्हरमध्ये 16 धावांची गरज असताना तीन षटकार मारले, श्रीलंकेच्या खेळाडूंनी थेट बॅट तपासली
6,6,6... सिराजचा सराव सामन्यात धमाका, विजयासाठी एका ओव्हरमध्ये 16 धावांची गरज असताना तीन षटकार मारले
जयंत पाटील अन् देवेंद्र फडणवीसांचा एकाच विमानातून प्रवास; काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया, हर्षवर्धन सपकाळ स्पष्टच बोलले
जयंत पाटील अन् देवेंद्र फडणवीसांचा एकाच विमानातून प्रवास; काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया, हर्षवर्धन सपकाळ स्पष्टच बोलले
नालासोपाऱ्यात कोयत्याने पिता-पुत्रावर जीवघेणा हल्ला; मुलाची प्रृकती गंभीर, वडिलही थोडक्यात बचावले रुग्णालयात उपचार
नालासोपाऱ्यात कोयत्याने पिता-पुत्रावर जीवघेणा हल्ला; मुलाची प्रृकती गंभीर, वडिलही थोडक्यात बचावले रुग्णालयात उपचार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 9 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 9 ऑगस्ट 2026 | मंगळवार
Embed widget