एक्स्प्लोर
अप्रेंटिस उमेदवारांच्या मागण्यांसाठी मनसे थेट दिल्लीत!
मुंबईत अप्रेंटिस उमेदवारांनी एल्गार पुकारल्यानंतर आज मनसेच्या शिष्टमंडळाने रेल्वेमंत्र्यांची भेट घेण्यासाठी थेट दिल्ली गाठली.

मुंबई : मुंबईत अप्रेंटिस उमेदवारांनी एल्गार पुकारल्यानंतर आज मनसेच्या शिष्टमंडळाने रेल्वेमंत्र्यांची भेट घेण्यासाठी थेट दिल्ली गाठली. अप्रेंटिस उमेदवारांच्या मागण्यांचा पाठपुरावा मनसेच्या शिष्टमंडळाने रेल्वेमंत्र्यांकडे केला. यावेळी शिष्टमंडळात मनसेचे नेते बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई, संदीप देशपांडे, मनोज चव्हाण यांचा समावेश आहे. आपल्या विविध मागण्यासाठी आंदोलकांनी काल मुंबईत साडेतीन तास रेल्वेरोको केला होता. त्यानंतर मनसेनं विद्यार्थ्यांसाठी पुढाकार घेतला आहे.. दरम्यान, भाजपच्या शिष्टमंडळानेही आज दिल्ली गाठली होती. मात्र, रेल्वेमंत्र्यांशी त्यांची भेट होऊ शकली नाही.
आणखी वाचा























