एक्स्प्लोर

नवा झेंडा, नवा अजेंडा; राज ठाकरेंकडून मनसेच्या नव्या ध्वजाचं अनावरण

मनसेचा नवा झेंडा हा संपूर्णपणे भगवा असेल. झेंड्यात दुसरा कोणताही रंग नाही. या नव्या झेंड्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची राजमुद्रा आहे.

मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने अखेर आपला ध्वज बदलला आहे. मुंबईत गोरेगावमधील नेस्को मैदानात मनसेचं पहिलं राज्यव्यापी अधिवेशन सुरु आहे. या अधिवेशनाचं उद्घाटन झाल्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नव्या ध्वजाचं अनावरण केलं. मनसेच्या नव्या झेंड्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांची राजमुद्रा आहे. तसंच झेंड्यात पूर्णपणे भगव्या रंगाला स्थान देण्यात आलं आहे. स्थापनेनंतर तब्बल 14 वर्षांनी मनसेच्या ध्वजाचा रंग आणि राजकारण दोन्हीही बदललं आहे. दरम्यान राज ठाकरे आज संध्याकाळी पक्षाचा अजेंडाही स्पष्ट करणार आहेत. मनसेच्या जुन्या झेंड्यामध्ये चार रंग होते. या झेंड्याच्या मध्यभागी भगवा (अधिक प्रमाणात) तर वरच्या बाजूला निळा तर खालील बाजूला हिरवा रंग आहे. पण मनसे आता राजकारणात कुस बदलणार हे स्पष्ट झालं आहे. विशेष म्हणजे यावेळी मनसेच्या व्यासपीठावर स्वातंत्र्यवीर सावरकर यांचीही प्रतिमा आहे. त्यामुळे मनसे प्रखर हिंदुत्वादाकडे वाटचाल करणार हे स्पष्ट आहे. ध्वजाचं अनावरण करताना राज ठाकरे म्हणाले की, "हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त त्यांना अभिवादन करतो. माझं भाषण संध्याकाळी होणार आहे. मनसेचं पहिलं अधिवेशन आपल्या सर्वांच्या साक्षीने संपन्न होत आहे. सगळ्यांचं मन:पूर्वक स्वागत करतो. गेले काही दिवस ज्या गोष्टीची चर्चा सुरु होती, तो पक्षाचा नवा ध्वज मी आपल्यासमोर सादर करतो, धन्यवाद." राज ठाकरे यांच्या हस्ते नव्या ध्वजाचं अनावरण होताच कार्यक्रमस्थळी ढोल-ताशांच्या गजरात एकच जल्लोष झाला. यानंतर व्यासपीठावर सांस्कृतिक कार्यक्रमांना सुरुवात झाली. मनसे हा पक्ष स्थापन होऊन आता 14 वर्ष झाली आहेत. परंतु या 14 वर्षांमध्ये मनसेच्या वाट्याला यशापेक्षा अपयशाचे झेंडेच हाती घ्यावे लागले आहेत. 2009 साली पहिल्याच विधानसभा निवडणुकीत मनसेने 13 आमदार निवडून आणले. नाशिक, ठाणे, पुणे, मुंबई महापालिकांमध्येही मनसेला मोठं यश मिळालं. नाशिक महापालिकेवर मनसेचा झेंडा फडकला. परंतु त्यानंतरच्या सर्वच निवडणुकांमध्ये मनसेच्या उमेदवारांचे दारुण पराभव झाले. 2014 च्या लोकसभा निवडणुकीनंतर मनसेची आणखीच अधोगती झाली. विधानसभेत एकच आमदार निवडून आला. विविध महापालिका निवडणुकीतही फारसं यश मिळालं नाही. सततच्या अपयशामुळे मनसेच्या विचारधारेमध्ये फोकस नसल्याचं चित्र निर्माण झालं आहे. मनसेच्या झेंड्याच्या रंगांमध्ये पक्षाची सर्वसमावेशकता दडली होती. पण सध्याच्या ध्रुवीकरणाच्या राजकारणात एकगठ्ठा मतदानाला जास्त महत्त्व प्राप्त झालं आहे. शिवसेना ही आघाडीच्या वळचणीला गेल्याने कट्टर हिंदुत्ववादी मतदारांना पर्याय हवा आहे. तोच पर्याय बनण्याचा प्रयत्न राज ठाकरे करत असल्याचं चित्र आहे. संबंधित बातम्या मनसेचा प्रस्तावित नवा झेंडा, भगव्या रंगातून बदलत्या राजकारणाची दिशा मनसेच्या राजकारणाची दिशा बदलणार, पक्षाचा झेंडा भगव्या रंगात रंगणार?
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

सलमान खानला धमक्या देणाऱ्या गँगस्टर लॉरेन्स बिष्णोईचा भाऊ अनमोल बिष्णोईच्या मुसक्या आवळल्या; कॅलिफोर्नियामध्ये अटक, चौकशी सुरू
सलमान खानला धमक्या देणाऱ्या गँगस्टर लॉरेन्स बिष्णोईचा भाऊ अनमोल बिष्णोईच्या मुसक्या आवळल्या; कॅलिफोर्नियामध्ये अटक, चौकशी सुरू
Anil Deshmukh VIDEO : अनिल देशमुखांच्या गाडीवर दगडफेक, डोक्याला गंभीर जखम, घळाघळा रक्त बाहेर
Anil Deshmukh VIDEO : अनिल देशमुखांच्या गाडीवर दगडफेक, डोक्याला गंभीर जखम, घळाघळा रक्त बाहेर
Sharad Pawar: एज इज जस्ट अ नंबर! 69 सभा, 3 प्रेस कॉन्फरन्स; म्हातारं पायाला भिंगरी लावून फिरलं, आता चांगभलं हुणार का?
69 सभा, 3 प्रेस कॉन्फरन्स; म्हातारं पायाला भिंगरी लावून फिरलं, आता चांगभलं हुणार का?
मोठी बातमी! ईडीची कारवाई, 622 कोटींच्या मालमत्तेवर टाच; लॉटरी किंग्जच्या 22 ठिकाणी छापे
मोठी बातमी! ईडीची कारवाई, 622 कोटींच्या मालमत्तेवर टाच; लॉटरी किंग्जच्या 22 ठिकाणी छापे
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Majha Gaon Majha Jilha : माझं गाव माझा जिल्हा:  8 AM :  19 नोव्हेंबर  2024 : ABP MajhaSalil Deshmukh Nagpur Katol : वडिलांवर हल्ला , मुलाचा फडणवीसांवर निशाणाTOP 70 : सकाळच्या 7 च्या 70 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 70 न्यूज :19 नोव्हेंबर  2024 : ABP MajhaRaj Thackeray vs Uddhav Thackeray : राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंना ठरवलं गद्दार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
सलमान खानला धमक्या देणाऱ्या गँगस्टर लॉरेन्स बिष्णोईचा भाऊ अनमोल बिष्णोईच्या मुसक्या आवळल्या; कॅलिफोर्नियामध्ये अटक, चौकशी सुरू
सलमान खानला धमक्या देणाऱ्या गँगस्टर लॉरेन्स बिष्णोईचा भाऊ अनमोल बिष्णोईच्या मुसक्या आवळल्या; कॅलिफोर्नियामध्ये अटक, चौकशी सुरू
Anil Deshmukh VIDEO : अनिल देशमुखांच्या गाडीवर दगडफेक, डोक्याला गंभीर जखम, घळाघळा रक्त बाहेर
Anil Deshmukh VIDEO : अनिल देशमुखांच्या गाडीवर दगडफेक, डोक्याला गंभीर जखम, घळाघळा रक्त बाहेर
Sharad Pawar: एज इज जस्ट अ नंबर! 69 सभा, 3 प्रेस कॉन्फरन्स; म्हातारं पायाला भिंगरी लावून फिरलं, आता चांगभलं हुणार का?
69 सभा, 3 प्रेस कॉन्फरन्स; म्हातारं पायाला भिंगरी लावून फिरलं, आता चांगभलं हुणार का?
मोठी बातमी! ईडीची कारवाई, 622 कोटींच्या मालमत्तेवर टाच; लॉटरी किंग्जच्या 22 ठिकाणी छापे
मोठी बातमी! ईडीची कारवाई, 622 कोटींच्या मालमत्तेवर टाच; लॉटरी किंग्जच्या 22 ठिकाणी छापे
भाजप नेत्यांनी उडवला प्रचाराचा धुरळा, मोदींच्या 10 सभा तर शाहांच्या 15; कोणी किती सभा घेतल्या?
भाजप नेत्यांनी उडवला प्रचाराचा धुरळा, मोदींच्या 10 सभा तर शाहांच्या 15; कोणी किती सभा घेतल्या?
Photos : बारामतीत एकवटलं पवार कुटुंब, युगेंद्रांच्या गालावरुन प्रतिभाआजीने फिरवला हात
Photos : बारामतीत एकवटलं पवार कुटुंब, युगेंद्रांच्या गालावरुन प्रतिभाआजीने फिरवला हात
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 नोव्हेंबर 2024 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 नोव्हेंबर 2024 | सोमवार
Manda Mhatre Cried : एकनाथ शिंदेंचं 'ते' वाक्य...मंदा म्हात्रेंच्या डोळ्यात पाणी!Belapur VidhanSabha
Manda Mhatre Cried : एकनाथ शिंदेंचं 'ते' वाक्य...मंदा म्हात्रेंच्या डोळ्यात पाणी!Belapur VidhanSabha
Embed widget