संतापजनक! मीरा-भाईंदर रेल्वे स्थानकात गुजरातीत आरक्षण अर्ज, पण मराठीतही नाही, मनसेचा आंदोलनाचा इशारा
Mira Bhayandar: महाराष्ट्र राज्याच्या मराठी राजभाषेला रेल्वे प्रशासनाकडून हरताळ फासण्याचे काम सध्या भाईंदर व मिरारोड (Mira Bhayandar) रेल्वे स्थानकात सुरू आहे.
Mira Bhayandar: महाराष्ट्र राज्याच्या मराठी राजभाषेला रेल्वे प्रशासनाकडून हरताळ फासण्याचे काम सध्या भाईंदर व मिरारोड (Mira Bhayandar) रेल्वे स्थानकात सुरू आहे. केंद्र शासनाच्या त्रिभाषा सूत्रानुसार राज्यातील केंद्र शासनाच्या प्रत्येक कार्यालयात इंग्रजी व हिंदी बरोबरच मराठी भाषेचा वापर करणे बंधनकारक आहे. असे असताना देखील मीरारोड व भाईंदर रेल्वे (Mira Bhayandar) स्थानकात प्रवाशांना आपले तिकीट बुकिंग करण्यासाठी प्रवाशांना इंग्रजीसह गुजराती (Gujrati) भाषेतील आरक्षण अर्ज दिला जात आहे. यामुळे संतापलेल्या नागरिकांनी रेल्वे प्रशासनाला चांगलेच धारेवर धरत मनसेने मराठी भाषेत आरक्षण फॉर्म उपलब्ध करून देण्याची मागणी करत त्यामुळे मनसेने मराठी भाषेत देखील अर्ज उपलब्ध करून द्यावा अन्यथा मनसेकडून (MNS) रेल्वे प्रशासनाला आंदोलन करण्याचा इशारा देत आपला संताप व्यक्त केला आहे.
मीरा भाईंदर (Mira Bhayandar) शहराची लोकसंख्या दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्यामुळे मीरारोड व भाईंदर या रेल्वे स्थानकांमध्ये आरक्षण करण्यासाठी आरक्षण केंद्रांवर नागरिकांची गर्दी झालेली असते. यावेळी आरक्षणासाठी आलेल्या नागरिकांना तिकीट आरक्षणासाठी दिलेला अर्ज हा अनेकदा इंग्रजीत आणि गुजराती भाषेत असतो. त्यामळे मराठी भाषिक असणाऱ्या नागरिकांना तो अर्ज भरणे अवघड जाते. त्यामुळे मराठी भाषिक नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.
महाराष्ट्रात मराठी ही महाराष्ट्राची राजभाषा असून केंद्र शासनाच्या प्रत्येक कार्यालयात इंग्रजी व हिंदी बरोबरच मराठी भाषेचा वापर करणे बंधनकारक आहे. असे असताना देखील भाईंदर (Mira Bhayandar) रेल्वे स्थानकावरील रेल्वे आरक्षण फॉर्मवर मराठी भाषेऐवजी गुजराती भाषेचा पर्याय देण्यात आला आहे. ही बाब महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या निर्देशनास येताच केंद्रशासनाने दिलेल्या आदेशाचे पालन करण्यात येत नसून राज्यातील सर्वसामान्य जनतेस रेल्वे आरक्षण फॉर्म वरील माहिती समजण्यासाठी इंग्रजी व हिंदी बरोबरच मराठी भाषा द्यावी, अशी मागणी मनसे (MNS) मिरा-भाईंदर (Mira Bhayandar) शहर अध्यक्ष हेमंत सावंत यांनी रेल्वे प्रशासनाकडे निवेदनाद्वारे केली आहे. रेल्वे प्रशासनाने लवकरात लवकर नागरिकांना मराठी भाषेत अर्ज उपलब्ध करून दिले नाही, तर मनसेच्या वतीने आंदोलन करण्याचा इशारा मनसेने दिला आहे. यावेळी निवेदन देताना शहराध्यक्ष हेमंत सावंत, उपशहराध्यक्ष लीला खडसे, माथाडी कामगार सेनेचे चिटणीस चंद्रशेखर जाधव, माथाडी कामगार सेनेचे उपचिटणीस किशोर येवले, शाखाध्यक्ष दिनेश वाढवाल, उप शाखा प्रमुख लक्ष्मण चौगुले इत्यादी उपस्थित होते.