Mhada News: म्हाडाचे उपाध्यक्ष संजीव जैस्वालांवर निवृत्त पोलीस कर्मचाऱ्याला मारहाणीचा आरोप, पण म्हाडाची काऊंटर ॲक्शन, नेमकं काय घडलं?
Mhada news: म्हाडाच्या कर्मचाऱ्यांकडून सोमवारी लेखणी बंद आंदोलन केले जाणार आहे. निवृत्त पोलीस अधिकारी आणि म्हाडाचे उपाध्यक्ष संजीव जैस्वाल यांच्यात वाद.
मुंबई: महाराष्ट्र राज्य गृहनिर्माण मंडळ अर्थात म्हाडाचे उपाध्यक्ष संजीव जैस्वाल यांनी एका निवृत्त पोलीस उपनिरीक्षकाला मारहाण करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. याप्रकरणी वादाला तोंड फुटले असून दोन्ही बाजूंनी आरोप-प्रत्यारोप केले जात आहेत. संजीव जैस्वाल यांनी त्यांच्या दालनाबाहेरच संबंधित मारहाणीचा निवृत्त पोलीस उपनिरीक्षकाला मारहाण (Attack on Police) केल्याचा दावा केला जात आहे. निवृत्त पोलिस उपनिरीक्षक विजय चाळके यांनी दिलेल्या तक्रारीनुसार म्हाडाचे उपाध्यक्ष संजीव जैस्वाल (Sanjeev Jaiswal) यांच्याह 10 ते 12 जणांवर खेरवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर म्हाडाच्या (MHADA) अधिकाऱ्यांनीही विजय चाळके यांच्याविरोधात खेरवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. या तक्रारीत विजय चाळके यांनी म्हाडाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना धक्काबुक्की केल्याचे म्हटले आहे. म्हाडाचे उपाध्यक्ष संजीव जयस्वाल, मुंबईचे मुख्य अधिकारी मिलिंद बोरीकर आणि महिला वरीष्ठ अधिकाऱ्यांसोबत गैरवर्तन केल्याचेही तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
तर दुसरीकडे विजय चाळके यांनी संजीव जैस्वाल यांच्यावर दोषारोप केले आहेत. पुर्नविकासात गेलेल्या घराचे भाडे न मिळाल्याने निवृत्त पोलिस उपनिराक्षक व 12 इतर व्यक्ती 26 डिसेंबर रोजी म्हाडा कार्यालयात जैस्वाल यांच्या भेटीला गेले असताना हा प्रकार घडल्याचे समजते. यावेळी जैस्वाल यांच्यासह सुरक्षा रक्षकांनी निवृत्त पोलिस उपनिरीक्षकाला मारहाण करत शिवीगाळ केल्याचा आरोप विजय चाळके यांनी केला. विजय जैस्वाल यांनी मुंबईच्या पोलीस आयुक्तांना सांगून तुझा एन्काऊंटर करेन आणि पेन्शन बंद करेन, अशी धमकीही दिल्याचा आरोप चाळके यांनी केला. आपल्याला मारहाण करताना जैस्वाल यांनी माझ्या गळ्यातील चेन आणि हेडफोन तोडल्याचाही आरोप चाळके यांनी केला. या प्रकरणी चाळके यांनी खेरवाडी पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार खेडवाडी पोलिसांनी म्हाडाचे उपाध्यक्ष जैस्वाल व इतर 10 ते 12 जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी खेरवाडी पोलिस अधिक तपास करत आहेत.
म्हाडाच्या कर्मचाऱ्यांकडून लेखणी बंद आंदोलन
म्हाडाच्या कर्मचाऱ्यांकडून सोमवारी लेखणी बंद आंदोलन करण्यात येणार आहे. निवृत्त पोलीस अधिकारी विजय चाळके आणि म्हाडाचे उपाध्यक्ष संजीव जैस्वाल यांच्यातील वादानंतर हा निर्णय घेण्यात आला. विजय चाळके यांच्या या कृतीविरोधात लेखणी बंद आंदोलन करुन निषेध व्यक्त केला जात आहे. याशिवाय, आज सकाळी 10 वाजता सर्व कर्मचारी वांद्रेतील मुख्य म्हाडा कार्यालयात धरणे आंदोलन करण्यात येईल.
आणखी वाचा
गुड न्यूज, म्हाडा मुंबईत पुढील 5 वर्षात अडीच लाख घरं बांधणार, घरांच्या किंमतीबाबत मोठी अपडेट