Horoscope Today 30 December 2024 : आजचा सोमवार खास; सर्व 12 राशींसाठी कसा असणार दिवस? वाचा आजचे राशीभविष्य
Horoscope Today 30 December 2024 : सर्व राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस व्यवसाय, आरोग्य, नातेसंबंध आणि प्रेमासाठी किती खास असणार आहे? आजचे राशीभविष्य (Horoscope Today) जाणून घ्या...
Horoscope Today 30 December 2024 : पंचांगानुसार, आज 30 डिसेंबर 2024, सोमवारचा दिवस जवळपास सर्व राशीच्या लोकांसाठी लाभदायक ठरेल. या दिवशी ग्रहांच्या हालचाली पाहता आजचा दिवस फार महत्त्वाचा आहे, ज्याचा परिणाम सर्व 12 राशींच्या लोकांवर दिसून येईल. तुमचा आजचा दिवस कसा असेल? कोणासाठी दिवस फलदायी ठरेल? 12 राशींचे आजचे राशीभविष्य (Horoscope Today) जाणून घ्या.
मेष (Aries Horoscope Today)
आज सगळीकडे धडाडी दाखवाल आणि लोकांना मनाप्रमाणे वागवून घ्याल.
वृषभ (Taurus Horoscope Today)
कोणत्या वेळी काय करायला पाहिजे याची जाण येईल.
मिथुन (Gemini Horoscope Today)
पाहिजे तेथे बोलल्यामुळे कामावर परिणाम होऊन काम लवकर होईल.
कर्क (Cancer Horoscope Today)
चुका झाल्या तरी त्या दुरुस्त करता येतात हे लक्षात ठेवून काम करा.
सिंह (Leo Horoscope Today)
अंगी असलेल्या कौशल्याला प्रयत्नांची जोड दिल्यास यश तुमचेच आहे हे नक्की.
कन्या (Virgo Horoscope Today)
जिद्दीने कामात झोकून देण्याची तुमची सवय नवीन नाही, परंतु त्यामुळे विश्रांती अजिबात मिळणार नाही.
तूळ (Libra Horoscope Today)
आज महिलांनी संघर्ष टाळावेत. आर्थिक नियोजन चांगले कराल.
वृश्चिक (Scorpio Horoscope Today)
आज कोणतेही नियोजन ढासळल्यामुळे आर्थिक गणित चुकणार आहे.
धनु (Sagittarius Horoscope Today)
थोडा अस्वस्थपणा जाणवणार आहे. दूरच्या प्रवासाचे योग येतील.
मकर (Capricorn Horoscope Today)
गरज सरो आणि वैद्य मरो या म्हणीप्रमाणे वागून चालणार नाही.
कुंभ (Aquarius Horoscope Today)
ज्यांचे परदेशात व्यवहार आहेत, त्यांना तेथून चांगले संकेत मिळतील.
मीन (Pisces Horoscope Today)
सहलीचे बेत आखाल. कलाकार आणि खेळाडू प्रसिद्धीच्या झोतात येतील.
डॉ. शिल्पा अग्निहोत्री (ज्योतिषाचार्य)
संपर्क - 9823322117
हेही वाचा: