एक्स्प्लोर

MHADA : म्हाडाची गिरणी कामगार सोडत, बॉम्बे डाईंग आणि श्रीनिवास मिलमधील 142 जणांना सदनिकांच्या चाव्यांचे वाटप

MHADA Mill Worker Lottery : आतापर्यंत 2501 यशस्वी पात्र गिरणी कामगार आणि त्यांच्या वारसांना सदनिकांच्या चाव्यांचे वाटप   करण्यात आलं आहे. 

मुंबई : म्हाडाच्या (MHADA) मुंबई मंडळातर्फे सन 2020 मध्ये बॉम्बे डाईंग मिल आणि श्रीनिवास मिलमधील (Bombay Dyeing and Srinivas Mills) गिरणी कामगारांसाठी जाहीर सोडतीतील  142 यशस्वी पात्र गिरणी कामगार / वारस यांना बाराव्या टप्प्यांतर्गत सदनिकांच्या चाव्यांचे वाटप गिरणी कामगार घर संनियंत्रण समितीचे अध्यक्ष आणि आमदार सुनील राणे, आमदार कालिदास कोळंबकर यांच्या हस्ते आज करण्यात आले. 
         
वांद्रे पूर्व येथील  म्हाडा मुख्यालयात महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरण (म्हाडा) व गिरणी कामगार घर संनियंत्रण समिती यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कार्यक्रमाप्रसंगी बोलताना राणे यांनी संगितले की आजवर सुमारे 2501 पात्र गिरणी कामगार/ वारसांना हक्काचा निवारा मिळवून देण्याकामी आम्ही खारीचा वाटा उचलला आहे.  परंतु 2016 रोजीच्या पनवेलमधील मौजे कोन येथील गृहप्रकल्पातील सोडतीतील 585 सदनिकांचे लाभर्थ्यांना वितरण करण्यात यश मिळाले आहे याचे अधिक समाधान होत आहे.  

आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आचारसंहिता जाहीर होण्यापूर्वी  एमएमआरडीएच्या अखत्यारीतील रांजनोळी येथील गृहप्रकल्पातील सदनिकांची सोडत  गिरणी कामगार व त्यांच्या वारसांकरिता जाहीर करण्यासाठी  गिरणी कामगार घर संनियंत्रण समिती आग्रही आणि प्रयत्नशील आहे,  अशी भूमिका त्यांनी यावेळी मांडली. तसेच ते पुढे म्हणाले की, गिरणी कामगार  व त्यांच्या वारसांना हक्काचा निवारा मिळवून देऊन त्यांच्या जीवनमानाचा दर्जा उंचाविण्याकरिता राज्य शासन कटिबद्ध आहे.

बृहन्मुंबईतील 58 बंद/आजारी गिरण्यांमधील यापूर्वी झालेल्या सोडतीमध्ये यशस्वी न झालेल्या एकूण 1,50,484 गिरणी कामगार व त्यांच्या वारसांची पात्रता निश्चिती करण्याकरिता कालबद्ध विशेष अभियान सुरू आहे.  या अभियानाला गिरणी कामगार / वारसांचा वाढता प्रतिसाद बघता ,  15  मार्च , 2024 पर्यंत मंडळातर्फे मुदतवाढ देण्यात आली आहे. गेल्या आठ महिन्यांपासून सुरू असलेल्या या विशेष अभियानात गिरणी कामगार व त्यांच्या वारसांकडून ऑफलाइन व ऑनलाइन पद्धतीने एकूण 01,06,851  अर्ज प्राप्त झाले आहेत. त्यापैकी 87,695 अर्जदार पात्र ठरले असून उर्वरित अर्जांची छाननी करून पात्र/ अपात्र निश्चितीची कार्यवाही सुरू असल्याचे सुनील राणे यांनी सांगितले.  
      
आतापर्यंत सन 2020 मध्ये गिरणी कामगारांसाठी काढण्यात आलेल्या सोडतीतील यशस्वी पात्र व सदनिकेच्या विक्री किंमतीचा, मुद्रांक शुल्काचा भरणा केलेल्या 1774 गिरणी कामगारांना 15 जुलै, 2023 पासून दहा टप्प्यांत सदनिकांच्या चावीचे वाटप करण्यात आले आहे.  दिनांक 15 फेब्रुवारी रोजी मौजे कोण (ता. पनवेल, जि . रायगड ) येथील सन 2016 मधील सोडतीतील एकूण 2417 सदनिकांपैकी 585 पात्र लाभार्थ्यांना  चाव्यांचे वाटप करण्यात आले. मुंबई मंडळ व कामगार विभाग यांच्यातर्फे सोडतीतील उर्वरित गिरणी कामगार/वारस यांची पात्रता निश्चित करण्याचे काम वेगात सुरू असल्याचे आमदार सुनील राणे यांनी सांगितले.
      
म्हाडाच्या मुंबई मंडळाने गिरणी कामगार/ वारसांना उपलब्ध करून दिलेल्या या संधीचा लाभ घेण्याचे आवाहन सुनील राणे यांनी यावेळी केले. या अभियानांतर्गत ऑफलाइन कागदपत्रे वांद्रे पूर्व येथील समाज मंदिर हॉल येथे जमा करायची आहेत. तसेच ऑनलाइन पद्धतीने www.millworkereligibility.mhada.gov.in या संकेतस्थळावर कागदपत्रे अपलोड करण्याची सुविधा विनामूल्य उपलब्ध असून ॲण्ड्रोइड व्हर्जनच्या मोबाईलमध्ये गूगल ड्राइव्हच्या प्ले स्टोअर आणि आयओएस व्हर्जन ॲप स्टोअरमध्ये mill workers eligibility या नावाने ॲप उपलब्ध करून देण्यात आले आहे. यापूर्वी ऑफलाइन अथवा ऑनलाईन पद्धतीने कागदपत्रे सादर केलेल्या गिरणी कामगार, वारसांना नव्याने कागदपत्रे सादर करण्याची आवश्यकता नसल्याचे मंडळातर्फे कळविण्यात आले आहे. कार्यक्रम यशस्वीतेसाठी उपमुख्य अधिकारी महाजन,  मिळकत व्यवस्थापक रामचंद्र भोसले आदींसह अधिकारी-कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

ही बातमी वाचा: 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

विधानसभेची खडाजंगी: सोलापूर उत्तरमध्ये पुन्हा भाजपचं कमळ खुलणार की पवारांची तुतारी वाजणार, अपक्षाचा फटका कोणाला बसणार
विधानसभेची खडाजंगी: सोलापूर उत्तरमध्ये पुन्हा भाजपचं कमळ खुलणार की पवारांची तुतारी वाजणार, अपक्षाचा फटका कोणाला बसणार
Sangli Assembly Constituency : भाजपची हॅट्रिक की काँग्रेसची बाजी? वसंतदादा घराणं कमबॅक करणार का? सांगली विधानसभेचं गणित काय? 
भाजपची हॅट्रिक की काँग्रेसची बाजी? वसंतदादा घराणं कमबॅक करणार का? सांगली विधानसभेचं गणित काय? 
निवडणुकीच्या धामधुमीत नागपुरात 17 किलो सोने आणि 55 किलो चांदी सापडली, 14 कोटींचा मुद्देमाल जप्त
निवडणुकीच्या धामधुमीत नागपुरात 17 किलो सोने आणि 55 किलो चांदी सापडली, 14 कोटींचा मुद्देमाल जप्त
शरद पवारांना गरिबांची नावं अन् श्रीमंतांची कामं लक्षात राहतात; राज ठाकरेंचा भुजबळांवरही निशाणा
शरद पवारांना गरिबांची नावं अन् श्रीमंतांची कामं लक्षात राहतात; राज ठाकरेंचा भुजबळांवरही निशाणा
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Pawan Kalyan Solapur Road Show : पवन कल्याण यांचा सोलापुरात भव्य रोड शो; नागरिकांची तोबा गर्दीSpecial Report Sharad Pawar : 'पवार'फुल खेळीची इनसाईड स्टोरी! 2014 सालची रणनीती काय होती?Special Report Mahayuti CM  Post : महायुतीच्या गोटात नेमकं काय सुरुय? पुढील मुख्यमंत्री कोण होणार?Special Report Pawar VS Dilip Walse Patil : 'गुरू'चा कोप, शिष्य भावूक; पवारांच्या टीकेवर वळसे काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
विधानसभेची खडाजंगी: सोलापूर उत्तरमध्ये पुन्हा भाजपचं कमळ खुलणार की पवारांची तुतारी वाजणार, अपक्षाचा फटका कोणाला बसणार
विधानसभेची खडाजंगी: सोलापूर उत्तरमध्ये पुन्हा भाजपचं कमळ खुलणार की पवारांची तुतारी वाजणार, अपक्षाचा फटका कोणाला बसणार
Sangli Assembly Constituency : भाजपची हॅट्रिक की काँग्रेसची बाजी? वसंतदादा घराणं कमबॅक करणार का? सांगली विधानसभेचं गणित काय? 
भाजपची हॅट्रिक की काँग्रेसची बाजी? वसंतदादा घराणं कमबॅक करणार का? सांगली विधानसभेचं गणित काय? 
निवडणुकीच्या धामधुमीत नागपुरात 17 किलो सोने आणि 55 किलो चांदी सापडली, 14 कोटींचा मुद्देमाल जप्त
निवडणुकीच्या धामधुमीत नागपुरात 17 किलो सोने आणि 55 किलो चांदी सापडली, 14 कोटींचा मुद्देमाल जप्त
शरद पवारांना गरिबांची नावं अन् श्रीमंतांची कामं लक्षात राहतात; राज ठाकरेंचा भुजबळांवरही निशाणा
शरद पवारांना गरिबांची नावं अन् श्रीमंतांची कामं लक्षात राहतात; राज ठाकरेंचा भुजबळांवरही निशाणा
Raj Thackeray on Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंच्या जागी मी असतो, तर म्हटलो असतो मला नको मुख्यमंत्रीपद : राज ठाकरे
उद्धव ठाकरेंच्या जागी मी असतो, तर म्हटलो असतो मला नको मुख्यमंत्रीपद : राज ठाकरे
Priyanka Gandhi In Kohapur : महाराष्ट्रात सरकार खरेदी करण्याची नवीन परंपरा मोदींनी सुरु केली आणि हे संविधान, भ्रष्टाचारावर बोलणार? प्रियांका गांधींचा हल्लाबोल
महाराष्ट्रात सरकार खरेदी करण्याची नवीन परंपरा मोदींनी सुरु केली आणि हे संविधान, भ्रष्टाचारावर बोलणार? प्रियांका गांधींचा हल्लाबोल
निवडणुकीसाठी परराज्यात महाराष्ट्रात किती लोकं आले, पंकजा मुंडेंनी सांगितला आकडा; भुवया उंचावल्या
निवडणुकीसाठी परराज्यात महाराष्ट्रात किती लोकं आले, पंकजा मुंडेंनी सांगितला आकडा; भुवया उंचावल्या
मुंडेंच्या परळीत यंदा निवडणुकीचा धनुभाऊ पॅटर्न; शरद पवारांचे उमेदवार म्हणाले, ही निवडणूक अंडरकरंट
मुंडेंच्या परळीत यंदा निवडणुकीचा धनुभाऊ पॅटर्न; शरद पवारांचे उमेदवार म्हणाले, ही निवडणूक अंडरकरंट
×
Embed widget