Mhada Lottery 2024 : म्हाडा मुंबईतील घरांच्या लॉटरीबाबत मोठा निर्णय घेण्याची शक्यता, मुदतवाढ मिळणार? आतापर्यंत किती अर्ज दाखल, जाणून घ्या
Mhada Lottery 2024 : म्हाडाकडून मुंबईतील 2030 घरांच्या लॉटरीसाठी 4 सप्टेंबरपर्यंत अर्ज मागवण्यात आले होते. यंदा म्हाडाकडे आतापर्यंत 14839 अर्ज अनामत रकमेसह दाखल झाल्याची माहिती आहे.
![Mhada Lottery 2024 : म्हाडा मुंबईतील घरांच्या लॉटरीबाबत मोठा निर्णय घेण्याची शक्यता, मुदतवाढ मिळणार? आतापर्यंत किती अर्ज दाखल, जाणून घ्या Mhada Lottery 2024 application dates may be extended by 15 days check here reason marathi news Mhada Lottery 2024 : म्हाडा मुंबईतील घरांच्या लॉटरीबाबत मोठा निर्णय घेण्याची शक्यता, मुदतवाढ मिळणार? आतापर्यंत किती अर्ज दाखल, जाणून घ्या](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/08/27/8b7be77b9fc4febb5d96329b2e0d017d1724729459583989_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
मुंबई : महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाचा (म्हाडा) विभागीय घटक असलेल्या मुंबई मंडळातर्फे मुंबईतील 2030 घरांसाठी सोडत जाहीर करण्यात आली होती. या घरांसाठी नोंदणी आणि अर्ज भरण्याची अंतिम मुदत 4 सप्टेंबर निश्चित करण्यात आली होती. मात्र, यंदाच्या म्हाडाच्या लॉटरीला अपेक्षेप्रमाणं प्रतिसाद मिळाला नसल्याचं चित्र आहे. आतापर्यंत म्हाडाकडे 2030 घरांसाठी 14839 जणांनी अर्ज सादर करुन त्याची अनामत रक्कम जमा केली आहे. अर्ज कमी प्रमाणात आल्यानं म्हाडाकडून मुदतवाढ देण्यासंदर्भात विचार केला जाऊ शकतो.
मुंबईतील पहाडी गोरेगाव, अँटॉप हिल-वडाळा, कोपरी पवई, कन्नमवार नगर-विक्रोळी, शिवधाम कॉम्प्लेक्स-मालाड गृहनिर्माण प्रकल्पामध्ये विविध उत्पन्न गटातील 2030 घरं सोडतीसाठी उपलब्ध करण्यात आली होती. 9 ऑगस्टला नोंदणी आणि अर्ज सादर करण्यासाठी सुरुवात झाल्यानंतर 17 दिवसात 14839 अर्ज दाखल झाले आहेत. तर, 22 हजार अर्ज दाखल झाले आहेत. त्यामुळं म्हाडाकडून घरांच्या नोंदणीसाठी 15 दिवसांची मुदतवाढ दिली जाऊ शकते, अशी माहिती आहे.
सोडत लांबणीवर जाणार?
म्हाडानं 2030 घरांसाठी अर्ज मागवले होते. आतापर्यंत 17 दिवसात 14839 अर्ज म्हाडाकडे संगणकीय प्रणालीद्वारे दाखल झाले होते. म्हाडाच्या निर्णयानुसार अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत 4 सप्टेंबर आहे. याला मुदतवाढ देण्यात आल्यास सोडत देखील लांबणीवर जाऊ शकते. 13 सप्टेंबर रोजी सोडत काढण्याचं निश्चित करण्यात आलं होतं.
म्हाडाच्या अपेक्षेप्रमाणं यावेळी सोडतीला मुंबईकरांचा प्रतिसाद मिळाला नसल्याचं चित्र आहे. म्हाडाकडे 22400 अर्ज दाखल करण्यात आले असून त्यापैकी 14839 अर्जदारांनी अनामत रक्कम जमा केली आहे. आगामी 9 दिवसांचा कालावधी 50 हजारांचा टप्पा पार होणं अवघड आहे.
म्हाडानं यापूर्वी घरांच्या किमती कमी करण्याचे संकेत दिले होते. आता, म्हाडा घरांच्या सोडतीसाठी नोंदणी करण्यास मुदतवाढ देणार का हे पाहावं लागणार आहे.
म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या सन 2024 च्या सोडतीत अत्यल्प उत्पन्न गटासाठी (Economically Weaker Section) 359 सदनिका, अल्प उत्पन्न गटासाठी (Lower Income Group) 627 सदनिका, मध्यम उत्पन्न गटासाठी (Middle Income Group) 768 सदनिका, उच्च उत्पन्न गटासाठी (Higher Income Group) 276 सदनिका विक्रीसाठी उपलब्ध आहेत. या सोडतीत म्हाडाच्या मुंबई मंडळाने बांधलेल्या 1327 सदनिका, विकास नियंत्रण नियमावली 33 (5), 33 (7) व 58 अंतर्गत पुनर्विकास प्रकल्पातून विकासकांकडून गृहसाठा (Housing Stock) म्हणून म्हाडाला प्राप्त 370 सदनिका (नवीन व मागील सोडतीतील सदनिका) व मागील सोडतीतील विविध वसाहतीतील विखुरलेल्या 333 सदनिकांचा समावेश आहे.
संबंधित बातम्या :
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)