एक्स्प्लोर

Mhada Lottery : मुंबईकरांसाठी गुड न्यूज, म्हाडा आगामी काळात वर्षातून दोनवेळा लॉटरी काढणार, पाच वर्षांसाठी मेगा प्लॅनिंग

MHADA Lottery 2024 : म्हाडानं मुंबईतील 2030 घरांसाठी लॉटरी जाहीर केली आहे. या लॉटरीसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया सुरु आहे.

मुंबई : म्हाडानं मुंबईतील विविध भागातील एकूण 2030 घरांसाठी लॉटरी जाहीर केली आहे. या मध्ये विविध उत्पन्न गटांसाठी घरं उपलब्ध करुन देण्यात आली आहे. म्हाडाच्या लॉटरीसाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत 4 सप्टेंबर निश्चित करण्यात आलेली आहे. म्हाडाकडून संगणकीय प्रणालीद्वारे सोडतीसाठी अर्ज दाखल करुन घेतले जात आहेत. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाकडून पुढील पाच वर्षात मुंबईत 50 हजार घरांच्या निर्मितीचं नियोजन करण्यात आलं आहे. या घरांची विक्री आगामी काळात म्हाडाकडून सोडतीद्वारे केली जाईल. यासाठी प्रत्येक वर्षात दोनवेळा लॉटरी काढली जाईल, असं म्हाडाचे सीईओ आणि उपाध्यक्ष संजीव जयस्वाल यांनी हिंदुस्थान टाइम्स. कॉम सोबत बोलताना सांगितलं. 

म्हाडाकडून मुंबईसह राज्यातील विविध भागात गृहनिर्माण प्रकल्पांची उभारणी केली जाते. म्हाडाकडून दरवर्षी लॉटरी काढली जाते. आता म्हाडानं 2030 घरांसाठी अर्ज मागवले आहेत. या घरांसाठी नोंदणी करण्याची प्रक्रिया सुरु आहे. 

म्हाडाचं 50 घरांच्या बांधणीचं नियोजन

संजीव जयस्वाल पुढे म्हणाले क दरवर्षी मुंबईत तीन हजार ते चार घरांची निर्मिती विविध योजनांमधून करण्याचा प्रयत्न आहे. त्यामुळं मुंबईत क्लस्टर डेव्हलपमेंट योजना राबवण्याचा प्रयत्न असेल, असं ते म्हणाले. म्हाडाकडून क्लस्टर डेव्हलपमेंट योजना कामाठीपुरा, आदर्शनगर, बांद्र आणि इतर ठिकाणी सुरु असून पुढील पाच वर्षात मुंबईत 50 घरांची निर्मिती करण्याचा प्रयत्न असेल. ही घरं प्रत्येक उत्पन्न गटासाठी असतील. आर्थिक दृष्ट्या  दुर्बल, अत्यल्प, अल्प, मध्यम आणि उच्च उत्पन्न गटांसाठी ही घरं असतील. 

म्हाडानं निश्चित केलेले उत्पन्न गट

म्हाडाच्या नियमानुसार ज्या कुटुंबांचं उत्पन्न 6 लाखांपेक्षा कमी असेल त्यांना ईडब्ल्यूएस गटातून अर्ज दाखल करता येईल. ज्यांचं उत्पन्न 6 ते 9 लाख उत्पन्न असेल त्यांना अत्यल्प उत्पन्न गटातून अर्ज करता येतील.ज्या कुटुंबाचं उत्पन्न 9 ते 12 लाखांदरम्यान असेल त्यांचा समावेश मध्यम उत्पन्न गटात  होतील. ज्यांचं उत्पन्न 12 लाखांपेक्षा अधिक असेल त्यांचा समावेश उच्च उत्पन्न गटात असेल. 
 
म्हाडाकडून प्रत्येक शहरात वर्षातून दोनवेळा लॉटरी काढण्याचं नियोजन आहे. मात्र, मुंबईत म्हाडापुढं प्रमुख आव्हान हे जागेचं आहे. परवडणाऱ्या घरांची दरवर्षी निर्मिती करावी लागणार आहे.ज्या इमारती वाईट स्थितीत आहेत त्यांच्या पुनर्बांधणीसाठी आगामी 5-10 वर्षात प्रयत्न केले जाणार आहेत. 

दरम्यान, म्हाडाकडून यावेळी 2030 घरांसाठी लॉटरी काढलेली आहे. या घरांसाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत 4 सप्टेंबर इतकी आहे. 

इतर बातम्या : 

MHADA Lottery 2024: म्हाडा लॉटरीत मुंबईतील कोणत्या एरियात घरं, मिडलक्लास आणि हायक्लाससाठी कोणत्या एरियात घरं, उत्पन्नाची मर्यादा किती?

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Amravati News : भर रस्त्यात वीजेचा खांब, खांबावर खाट टाकला, ऐटीत बसून आंदोलन, मागणी नेमकी काय?
भर रस्त्यात वीजेचा खांब, खांबावर खाट टाकला, ऐटीत बसून आंदोलन, मागणी नेमकी काय?
पोलिसांना अर्वाच्य शिवीगाळ करणाऱ्या माजोरड्या बिल्डरला अद्दल घडली, कुणाल बाकलीवाल विरोधात छ. संभाजीनगरध्ये गुन्हा दाखल
पोलिसांना अर्वाच्य शिवीगाळ करणाऱ्या माजोरड्या बिल्डरला अद्दल घडली, कुणाल बाकलीवाल विरोधात छ. संभाजीनगरध्ये गुन्हा दाखल
Kolhapur News : हाच खरा प्रजासत्ताक!, विधवांनाही विवाहित आणि सौभाग्यवतींप्रमाणेच सन्मान, कोल्हापुरातील ग्रामपंचायतीचा एकमुखी ठराव
हाच खरा प्रजासत्ताक!, विधवांनाही विवाहित आणि सौभाग्यवतींप्रमाणेच सन्मान, कोल्हापुरातील ग्रामपंचायतीचा एकमुखी ठराव
Nashik Crime : पंचवटी हादरली! 20 वर्षीय महिलेला शेतात नेऊन सामूहिक अत्याचार, अत्याचार करणारा नातेवाईकच
पंचवटी हादरली! 20 वर्षीय महिलेला शेतात नेऊन सामूहिक अत्याचार, अत्याचार करणारा नातेवाईकच
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 12PM TOP Headlines 12 PM 27 January 2025 दुपारी १२ च्या हेडलाईन्सChhaava Movie : Raj Thackeray भेटीनंतर Laxman Utekar यांचा निर्णय; 'छावा'तील तो सीन डिलीट करणार!Anil Deshmukh : Akshay Shinde व  Walmik karad प्रकरणात मुख्य आरोपीला वाचवण्याचे काम सुरुयAkash Kanaujiya On Mumbai Police : पोलिसांच्या चुकीमुळं माझं आयुष्य उद्ध्वस्त झालं, कनौजियाचा आरोप

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Amravati News : भर रस्त्यात वीजेचा खांब, खांबावर खाट टाकला, ऐटीत बसून आंदोलन, मागणी नेमकी काय?
भर रस्त्यात वीजेचा खांब, खांबावर खाट टाकला, ऐटीत बसून आंदोलन, मागणी नेमकी काय?
पोलिसांना अर्वाच्य शिवीगाळ करणाऱ्या माजोरड्या बिल्डरला अद्दल घडली, कुणाल बाकलीवाल विरोधात छ. संभाजीनगरध्ये गुन्हा दाखल
पोलिसांना अर्वाच्य शिवीगाळ करणाऱ्या माजोरड्या बिल्डरला अद्दल घडली, कुणाल बाकलीवाल विरोधात छ. संभाजीनगरध्ये गुन्हा दाखल
Kolhapur News : हाच खरा प्रजासत्ताक!, विधवांनाही विवाहित आणि सौभाग्यवतींप्रमाणेच सन्मान, कोल्हापुरातील ग्रामपंचायतीचा एकमुखी ठराव
हाच खरा प्रजासत्ताक!, विधवांनाही विवाहित आणि सौभाग्यवतींप्रमाणेच सन्मान, कोल्हापुरातील ग्रामपंचायतीचा एकमुखी ठराव
Nashik Crime : पंचवटी हादरली! 20 वर्षीय महिलेला शेतात नेऊन सामूहिक अत्याचार, अत्याचार करणारा नातेवाईकच
पंचवटी हादरली! 20 वर्षीय महिलेला शेतात नेऊन सामूहिक अत्याचार, अत्याचार करणारा नातेवाईकच
Baburao Chandere : बिल्डरला उचलून रस्त्यावर आदळले, तरी बाबुराव चांदेरेंना अटक करणं बंधनकारक नाही! पुणे पोलिसांकडून वाचवण्याचा प्रयत्न?
बिल्डरला उचलून रस्त्यावर आदळले, तरी बाबुराव चांदेरेंना अटक करणं बंधनकारक नाही! पुणे पोलिसांकडून वाचवण्याचा प्रयत्न?
Chandrapur News: 19 वाघांची शिकार करणाऱ्या बहेलिया टोळीच्या म्होरक्याला अटक, चंद्रपुरात सापडल्याने वनखात्याचं टेन्शन वाढलं
19 वाघांची शिकार करणाऱ्या बहेलिया टोळीच्या म्होरक्याला अटक, चंद्रपुरात सापडल्याने वनखात्याचं टेन्शन वाढलं
Baburao Chandere : अजितदादांचे पुण्यातील विश्वासू बाबूराव चांदेरेंची दिवसाढवळ्या मोगलाई; दोन दिवसांपूर्वी गुन्हा दाखल होऊनही पोलिसांना अटकेचा मुहूर्त सापडेना
अजितदादांचे पुण्यातील विश्वासू बाबूराव चांदेरेंची दिवसाढवळ्या मोगलाई; दोन दिवसांपूर्वी गुन्हा दाखल होऊनही पोलिसांना अटकेचा मुहूर्त सापडेना
Samruddhi Mahamarg : समृद्धी महामार्गावर प्रशासनाच्या नाकावर टिच्चून दारू विक्री, वाहनांच्या लांबच लांब रांगा, अपघाताचा धोका वाढला
समृद्धी महामार्गावर प्रशासनाच्या नाकावर टिच्चून दारू विक्री, वाहनांच्या लांबच लांब रांगा, अपघाताचा धोका वाढला
Embed widget