एक्स्प्लोर

Mhada Lottery 2023 : म्हाडाच्या 4082 घरांसाठी 1.45 लाख अर्ज; 17 जुलैला सोडत

Mhada Lottery 2023 : म्हाडाच्या 4082 घरांसाठी 1.45 लाख अर्ज आले आहेत. 17 जुलै 2023 रोजी दुपारी 3 वाजता सोडतीसाठी प्राप्त झालेल्या अर्जांची प्रारूप यादी म्हाडाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केली जाणार आहे.

MHADA Lottery 2023 : म्हाडाच्या (Maharashtra Housing and Area Development Authority) मुंबई गृहनिर्माण आणि क्षेत्र विकास मंडळातर्फे जाहीर करण्यात आलेल्या 4082 घरांच्या विक्रीच्या ऑनलाईन सोडत प्रक्रियेला अर्जदारांनी भरभरून प्रतिसाद दिला आहे. 1,45,849 अर्ज ऑनलाईन सोडत प्रक्रियेमध्ये प्राप्त झाले आहेत. यापैकी 1,19,278  अर्जदारांनी अद्यापपर्यंत अनामत रकमेचा भरणा करून सोडत प्रक्रिया पूर्ण केली आहे.

मुंबई मंडळातर्फे अर्ज भरणा करण्याची मुदत 11 जुलै रोजी संपली, तसेच RTGS / NEFT द्वारे अनामत रकमेचा भरणा अर्जदार 12 जुलै, 2023 रोजी संबंधित बँकेच्या कार्यालयीन वेळेपर्यंत करू शकतील. 17 जुलै 2023 रोजी दुपारी 3 वाजता सोडतीसाठी प्राप्त झालेल्या अर्जांची प्रारूप यादी म्हाडाच्या https://housing.mhada.gov.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध केली जाणार आहे. 19 जुलै, 2023 रोजी दुपारी 3 वाजेपर्यंत प्रारूप यादी प्रसिद्ध झाल्यापासून ऑनलाईन दावे-हरकती दाखल करता येणार आहेत. 24 जुलै, 2023 रोजी दुपारी तीन वाजता सोडतीसाठी स्विकृत अर्जांची अंतिम यादी म्हाडाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केली जाणार आहे. 

मुंबईतील विविध गृहनिर्माण प्रकल्पांतर्गत 4082 सदनिकांच्या विक्रीसाठी 22 मे, 2023 रोजी दुपारी 3 वाजेपासून ऑनलाईन अर्ज नोंदणी आणि स्वीकृती प्रक्रियेला सुरुवात झाली. ऑनलाईन अशा IHLMS 2.0 याद्वारे ही सोडत प्रक्रिया राबविण्यात आली आहे. सोडतीमधील अत्यल्प उत्पन्न गटात पहाडी गोरेगाव पश्चिम येथील प्रधानमंत्री आवास योजनेतील सदनिका तसेच अॅअन्टॉप हिल आणि विक्रोळीच्या कन्नमवार नगरमधील सदनिकांचा समावेश आहे. अल्प उत्पन्न गटकरता पहाडी  गोरेगाव, लोकमान्य नगर दादर, अँटॉप हिल वडाळा, सिद्धार्थनगर - गोरेगाव पश्चिम, डीएन नगर-अंधेरी, पंत नगर-घाटकोपर, कन्नमवार नगर विक्रोळी, चारकोप कांदिवली, महावीर नगर कांदिवली,  जुने मागाठाणे बोरिवली, गव्हाणपाडा मुलुंड, पीएमजीपी मानखुर्द, मालवणी मालाड आदी ठिकाणी सदनिका उपलब्ध आहेत. तसेच, उन्नतनगर गोरेगाव पश्चिम, महावीर नगर कांदिवली, जुहू, अंधेरी पश्चिम, अंधेरी पूर्व, सहकार नगर चेंबुर, लोकमान्य नगर दादर, अँटॉप हिल वडाळा, भायखळा, टिळकनगर चेंबुर, चांदिवली पवई, गायकवाड नगर मालाड, प्रतीक्षा नगर सायन, चारकोप कांदिवली येथील गृहप्रकल्पांतर्गत मध्यम उत्पन्न गटातील सदनिकांचा समावेश आहे. उच्च उत्पन्नमध्ये जुहू-अंधेरी पश्चिम, वडाळा पश्चिम, ताडदेव, लोअर परळ, शिंपोली कांदिवली, तुंगा पवई, चारकोप कांदिवली, सायन पूर्व येथील सदनिकांचा समावेश आहे.

म्हाडा सोडतीच्या ऑनलाईन प्रणालीमध्ये उत्पन्न गटनिहाय अत्यल्प उत्पन्न गटातील 843 सदनिकांकरीता 35,231 अर्ज प्राप्त झाले आहेत, अल्प उत्पन्न गटातील 1034 सदनिकांकरीता 73,414 अर्ज प्राप्त झाले आहेत, मध्यम उत्पन्न गटातील 138 सदनिकांकरीता 10,500 अर्ज प्राप्त झाले आहेत आणि उच्च उत्पन्न गटातील 120 सदनिकांसाठी 2928 अर्जदारांनी अर्ज केले आहेत. तसेच, प्रधान मंत्री आवास योजने अंतर्गत 1947 सदनिकांसाठी 23776 अर्ज प्राप्त झाले आहेत. सदनिकांच्या वितरणाकरता प्राप्त अर्जांची ऑनलाईन सोडत वांद्रे पश्चिम येथील रंगशारदा नाट्यगृहात काढण्यात येणार असून सोडतीचा दिनांक आणि वेळ लवकरच जाहीर करण्यात येणार आहे.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sada Sarvankar: सदा सरवणकरांची प्रचारफेरी 'शिवसेना भवन'समोर येताच काय घडलं? श्रीकांत शिंदेही सहभागी!
सदा सरवणकरांची प्रचारफेरी 'शिवसेना भवन'समोर येताच काय घडलं? श्रीकांत शिंदेही सहभागी!
तब्बल 1 कोटी 11 लाखांचे सोन्याचे चेंडू घेऊन फिरत होता, पोलिसांनी हटकलं अन् धक्कादायक प्रकार आला समोर!
तब्बल 1 कोटी 11 लाखांचे सोन्याचे चेंडू घेऊन फिरत होता, पोलिसांनी हटकलं अन् धक्कादायक प्रकार आला समोर!
Devendra Fadnavis: काँग्रेसचा केंद्रातील बडा वलयांकित नेता देवेंद्र फडणवीसांविरोधात मैदानात उतरला, म्हणाला...
काँग्रेसचा केंद्रातील बडा वलयांकित नेता देवेंद्र फडणवीसांविरोधात मैदानात उतरला, म्हणाला...
Rohit Pawar: मोठ्या नेत्यांवर भुंकण्यासाठी देवेंद्र फडणवीस छोटे नेते पदरी बाळगतात, त्यांना बिस्किटं म्हणून पदं देतात: रोहित पवार
मविआ विधानसभा निवडणुकीत नेमक्या किती जागा जिंकणार? रोहित पवारांनी सांगितला आकडा
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Laxman Hake on Car attack : हाकेंच्या गाडीवर हल्ला; पोलीस ठाण्याला घेराव घालण्याचा इशाराTOP 70 : सकाळच्या 7 च्या 70 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 70 न्यूज : 8 नोव्हेंबर 2024 : ABP MajhaABP Majha Headlines :  7 AM : 8 नोव्हेंबर 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सMajha Gaon Majha Jilha : माझं गाव माझा जिल्हा: 7 AM :   8 नोव्हेंबर 2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sada Sarvankar: सदा सरवणकरांची प्रचारफेरी 'शिवसेना भवन'समोर येताच काय घडलं? श्रीकांत शिंदेही सहभागी!
सदा सरवणकरांची प्रचारफेरी 'शिवसेना भवन'समोर येताच काय घडलं? श्रीकांत शिंदेही सहभागी!
तब्बल 1 कोटी 11 लाखांचे सोन्याचे चेंडू घेऊन फिरत होता, पोलिसांनी हटकलं अन् धक्कादायक प्रकार आला समोर!
तब्बल 1 कोटी 11 लाखांचे सोन्याचे चेंडू घेऊन फिरत होता, पोलिसांनी हटकलं अन् धक्कादायक प्रकार आला समोर!
Devendra Fadnavis: काँग्रेसचा केंद्रातील बडा वलयांकित नेता देवेंद्र फडणवीसांविरोधात मैदानात उतरला, म्हणाला...
काँग्रेसचा केंद्रातील बडा वलयांकित नेता देवेंद्र फडणवीसांविरोधात मैदानात उतरला, म्हणाला...
Rohit Pawar: मोठ्या नेत्यांवर भुंकण्यासाठी देवेंद्र फडणवीस छोटे नेते पदरी बाळगतात, त्यांना बिस्किटं म्हणून पदं देतात: रोहित पवार
मविआ विधानसभा निवडणुकीत नेमक्या किती जागा जिंकणार? रोहित पवारांनी सांगितला आकडा
मुंडे भगिनींनी जमीन लाटल्याप्रकरणात नवा ट्विस्ट; महाजनांचे आरोप फेटाळले, मध्यस्थीच आला समोर
मुंडे भगिनींनी जमीन लाटल्याप्रकरणात नवा ट्विस्ट; महाजनांचे आरोप फेटाळले, मध्यस्थीच आला समोर
Video: तुम्ही माझ्या नादी लागू नका, फडणवीसांचं ऐकून ह्या लफड्यात पडू नका; जरांगेंचा राज ठाकरेंवर हल्लाबोल
Video: तुम्ही माझ्या नादी लागू नका, फडणवीसांचं ऐकून ह्या लफड्यात पडू नका; जरांगेंचा राज ठाकरेंवर हल्लाबोल
Singham Again Box Office Collection Day 7: आठवडा उलटूनही 200 कोटींचा टप्पा ओलांडू शकला नाही 'सिंघम अगेन'; भांडवलं तरी वसूल होणार?
आठवडा उलटूनही 200 कोटींचा टप्पा ओलांडू शकला नाही 'सिंघम अगेन'; भांडवलं तरी वसूल होणार?
पैजेचा विडा... अब्दुल सत्तारांच्या मतदारसंघात लागली शर्यत, 500 च्या बाँण्डवर लेखी; जिंकणाऱ्याला बुलेट मिळणार
पैजेचा विडा... अब्दुल सत्तारांच्या मतदारसंघात लागली शर्यत, 500 च्या बाँण्डवर लेखी; जिंकणाऱ्याला बुलेट मिळणार
Embed widget