(Source: ECI/ABP News/ABP Majha)
हार्बर रेल्वेवर मेगाब्लॉक, मध्य, पश्चिम रेल्वेवरील प्रवाशांना दिलासा
सीएसएमटी ते चुनाभट्टी/वांद्रे स्थानकांदरम्यान मेगाब्लॉक असणार आहे. मध्य रेल्वे सीएसएमटी ते कल्याण मार्गावर मेगाब्लॉक नसल्याने प्रवाशांना दिलासा मिळाला आहे. तर पश्चिम रेल्वेवर सांताक्रुझ ते गोरेगाव स्थानकादरम्यान ब्लॉक काळातील कामे करण्यात येणार आहेत.
मुंबई : आज मध्य रेल्वे आणि पश्चिम रेल्वेवर कोणताही मेगाब्लॉग घेण्यात येणार नाही. मात्र मध्य रेल्वेच्या मार्गावरील दुरुस्ती कामांसाठी हार्बर रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे.
सीएसएमटी ते चुनाभट्टी/वांद्रे स्थानकांदरम्यान मेगाब्लॉक असणार आहे. मध्य रेल्वे सीएसएमटी ते कल्याण मार्गावर मेगाब्लॉक नसल्याने प्रवाशांना दिलासा मिळाला आहे. तर पश्चिम रेल्वेवर सांताक्रुझ ते गोरेगाव स्थानकादरम्यान ब्लॉक काळातील कामे करण्यात येणार आहेत.
हार्बर रेल्वे मार्गावर सीएसएमटी ते चुनाभट्टी, वांद्रे डाऊन हार्बर मार्गावर सकाळी 11.40 वाजल्यापासून दुपारी 4.10 वाजेपर्यंत लोकलसेवा बंद राहणार आहे. तर चुनाभट्टी आणि वांद्रे ते सीएसएमटी अप हार्बर मार्गावरील लोकलसेवा सकाळी 11.10 वाजेपासून दुपारी 3.40 पर्यंत बंद राहणार आहे.
मध्य रेल्वेवर काही एक्स्प्रेस गाड्या रद्द
कल्याण आणि टिटवाळा रेल्वे स्थानकाजवळील रेल्वे पुलाच्या कामाकरिता रविवारी सकाळी 10 वाजेपासून 2.15 वाजेपर्यंत ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक घेण्यात आला आहे. त्यामुळे दादर ते जालना, जालना ते दादर जनशताब्दी एक्स्प्रेस रद्द करण्यात आली आहे.