MegaBlock On Central Railway : 18, 24 नव्हे तर रविवारी 36 तासांचा जम्बो मेगाब्लॉक; सूत्रांची माहिती
MegaBlock On Central Railway : मध्य रेल्वेवर रविवारी पुन्हा जम्बो मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. यावेळी 18 आणि 24 नाही तर 36 तासांचा जम्बो मेगाब्लॉक असणार आहे.
MegaBlock On Central Railway : मध्य रेल्वेवर या रविवारी पुन्हा जम्बो मेगा ब्लॉक घेतला जाणार आहे. यावेळी 18 आणि 24 नाही तर तब्बल 36 तासांचा जम्बो मेगाब्लॉक असणार आहे. ठाणे ते दिवा या स्लो लाईनवर गाड्या उपलब्ध नसणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. आज (शुक्रवारी) मध्य रेल्वेकडून अधिकृत परिपत्रक जारी केलं जाणार आहे. ठाणे स्टेशनजवळ जुन्या मार्गिका नवीन मार्गिकांना जोडण्याचं महत्वपूर्ण काम करण्यासाठी मेगाब्लॉक लावण्याचा निर्णय प्रशासनाकडून घेण्यात आला आहे.
येत्या रविवारी मध्य रेल्वेवर 36 तासांचा जम्बो मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. पाचव्या आणि सहव्या मार्गिकेच्या कामासाठी हा ब्लॉक घेतला जाणार आहे. या ब्लॉक दरम्यान ठाणे ते दिवा स्थानकादरम्यान धिम्या लोकलची सेवा बंद राहणार आहे. दरम्यान, 2 जानेवारी रोजीही रेल्वेकडून जम्बो ब्लॉक घेण्यात आला होता.
2 जानेवारी रोजी रेल्वेकडून जम्बो ब्लॉक घेण्यात आला होता. ठाणे-दिवा मार्गावर 24 तासांचा मेगाब्लॉक घेण्यात आला होता. रविवारी मध्यरात्री 2 वाजल्यापासून ते सोमवारी मध्यरात्री दोन वाजेपर्यंत हा ब्लॉक घेण्यात आला होता. एक जानेवारीला रात्री 11.43 पासून ते दोन जानेवारीला रात्री 11.43 पर्यंत सीएसएमटीकडे जाणाऱ्या कल्याणहून सुटणाऱ्या अप आणि जलद गाड्या कल्याण आणि मुलुंड दरम्यान अप जलद मार्गावर वळवण्यात आल्या होत्या. या गाड्या ठाकुर्ली, कोपर, मुंब्रा आणि कळवा स्थानकावर थाबंणार नाहीत. पुढे मुलंड स्थानकावर अप धीम्याा मार्गावर पुन्हा वळवण्यात आल्या होत्या. त्यामुळे या सर्व लोकल नियोजित वेळेपेक्षा दहा मिनिटे उशीराने पोहोचतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून निघणाऱ्या डाऊन धीम्या, अर्ध जलद सेवा मुलुंडहून दोन जानेवारी रोजी 5.05 पासून ते 3 जानेवारी मध्यरात्री 1.15 पर्यंत मुलुंड आणि कल्याण स्थानकांदरम्यान डाऊन जलद मार्गावर धावतील, असं सांगितलं होतं. या लोकल कळवा, मुंब्रा, कोपर व ठाकुर्ली स्थानकावर थांबणार नाहीत, अशी माहिती मध्य रेल्वेने दिली होती.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
- चौथीच्या पुस्तकातील ईदगाह धड्याबाबत बालभारतीचे स्पष्टीकरण, सांगितले की...
- हवामानाच्या अचूक अंदाजासाठी 6 हजार ग्रामपंचायतींमध्ये स्वयंचलित हवामान केंद्रे उभारणार : दादाजी भुसे
- Sindhudurg District Bank Election : सिंधुदुर्ग जिल्हा बँक अध्यक्ष, उपाध्यक्ष निवड 13 जानेवारीला, अध्यक्ष कोण होणार?
दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा घेण्यासाठी एबीपी माझा लाईव्ह पाहा