चौथीच्या पुस्तकातील ईदगाह धड्याबाबत बालभारतीचे स्पष्टीकरण, सांगितले की...
BalBharati text book chapter on Eid : 'बालभारती'च्या मराठीतील चौथीच्या पुस्तकाबाबत सुरू असलेल्या वादावर बालभारतीने स्पष्टीकरण दिले आहे.
BalBharati text book chapter on Eid : 'बालभारती'च्या मराठीतील पाठ्यपुस्तकातील ईदगाह या धड्यावरून सोशल मीडियावर बरीच उलटसुलट चर्चा सुरू आहे. या धड्यावर सुरू असलेल्या वादावर बालभारतीने स्पष्टीकरण दिले आहे. कोणत्याही धर्माचा प्रचार करण्याचा हेतू नसल्याचे 'बालभारती'ने म्हटले आहे. त्यामुळे कोणीही कोणताही विपर्यास करू नये असे आवाहनही बालभारतीचे संचालक कृष्णकुमार पाटील यांनी म्हटले.
इयत्ता चौथीच्या मराठी पाठ्यपुस्तकात ‘ईदगाह’या धड्याचा समावेश करण्यात आला आहे. पाठ्यपुस्तकातील धड्यावरून सोशल मीडियात उलटसुलट चर्चाही सुरू झाल्या होत्या. त्यानंतर ब्राह्मण महासंघाने पाठ्यपुस्तकातून हा धडा वगळावा अशी मागणी केली होती. या वादावर बालभारतीने स्पष्टीकरण दिले आहे.
पाठ्यपुस्तकातून कोणत्याही धर्माचा प्रचार करण्याचा उद्देश नाही, असे बालभारतीनं स्पष्ट केले. या धड्याबाबत विविध समाजमाध्यमातून चुकीच्या पद्धतीनं प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत. पण या पाठातून कोणत्याही धर्माचा प्रसार आणि प्रचार करण्याचा उद्देश नाही. त्यामुळे कोणताही विपर्यास करू नये, असे बालभारतीचे संचालक कृष्णकुमार पाटील यांनी म्हटले आहे. बालभारतीच्या इयत्ता चौथीच्या मराठीचे पाठ्यपुस्तक गेल्या सात वर्षांपासून अभ्यासले जात आहे. परंतु पाठ्यपुस्तकातील ‘ईदगाह’ या धडाच्या अनुषंगाने यापूर्वी कोणताही प्रकारचे आक्षेप बालभारतीकडे प्राप्त झालेले नाहीत. राष्ट्रीय उद्दिष्टे व गाभा घटक यामध्ये ‘सर्वधर्मसमभाव’ हे मूल्य समाविष्ट असेही त्यांनी म्हटले.
सोशल मीडियावर सुरू असलेल्या वादात 'ईदगाह' हा धडा मुस्लिमाने लिहिला असल्याचे म्हटले. मात्र, 'ईदगाह' हा धडा प्रसिद्ध लेखक प्रेमचंद यांनी लिहिला असून त्याचा मराठी अनुवाद संजीवनी खेर यांनी केला आहे. या धड्यात आजी आणि नातवाच्या नात्याची संवेदनशील कथा आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या:
- विठ्ठल मंदिराला पुरातन दगडी फ्लोरिंग; 700 वर्षापूर्वीचे स्वरूप दिलं जाणार!
- इंधन दरवाढविरोधी आंदोलनाचा भडका, कझाकिस्तानमध्ये गृहयुद्धाची स्थिती; रशियन सैन्य दाखल, अमेरिकेचा इशारा
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha
Education Loan Information:
Calculate Education Loan EMI