एक्स्प्लोर
मुंबई लोकल : मध्य आणि हार्बर रेल्वेवर आज मेगाब्लॉक
पश्चिम रेल्वेवर मेगाब्लॉक घेण्यात येणार नसल्यानं पश्चिम रेल्वेच्या प्रवाशांना दिलासा मिळणार आहे.
![मुंबई लोकल : मध्य आणि हार्बर रेल्वेवर आज मेगाब्लॉक Megablock On Central And Harbour Railway In Mumbai Latest Updates मुंबई लोकल : मध्य आणि हार्बर रेल्वेवर आज मेगाब्लॉक](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2015/10/25095533/mumbai-local.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
प्रातिनिधिक फोटो
मुंबई : मध्य आणि हार्बर रेल्वेवर आज (10.09.2017) मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. तर पश्चिम रेल्वेवर मेगाब्लॉक घेण्यात येणार नसल्याने पश्चिम रेल्वेच्या प्रवाशांना दिलासा मिळणार आहे.
मध्य रेल्वेवर मुलुंड ते माटुंगा दरम्यान उद्या सकाळी साडेअकरा ते दुपारी साडेचार वाजेपर्यंत मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. तर ठाण्याहून सुटणाऱ्या अप स्लो मार्गावरील वाहतूक 11 ते दुपारी 4.30 वाजेपर्यंत अप फास्ट मार्गावरून चालवण्यात येणार आहे. तर सीएसएमटीहून सुटणाऱ्या डाऊन फास्ट लोकल्सना घाटकोपर, विक्रोळी, भांडुप, मुलुंड स्थानकांत थांबा देण्यात येणार आहे.
हार्बरवर कुर्ला ते वाशीदरम्यान अप आणि डाऊन दोन्ही मार्गांवर सकाळी 11 ते दुपारी 4.15 वाजेपर्यत दुरुस्तीची कामांसाठी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. ब्लॉक कालावधीत सीएसएमटी ते वाशी, बेलापूर, पनवेल अप-डाऊन लोकल खंडीत राहतील. मात्र, प्रवाशांच्या सोयीसाठी सीएसएमटी ते कुर्ला आणि वाशी ते पनवेल स्थानकांदरम्यान विशेष फेऱ्या चालविण्यात येणार आहेत.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नाशिक
राजकारण
राजकारण
क्रीडा
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)