(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Railway Megablock | मध्य आणि हार्बर रेल्वेवर आज मेगाब्लॉक
मध्य रेल्वेवर माटुंगा ते मुलुंड डाऊन धीम्या मार्गावर आणि हार्बर रेल्वेवर पनवेल आणि वाशी दरम्यान दोन्ही मार्गांवर मेगाब्लॉक असणार आहे.
मुंबई : मध्य रेल्वे आणि हार्बर रेल्वेवर आज मेगाब्लॉक घेतला जाणार आहे. मध्य रेल्वेवर माटुंगा ते मुलुंड डाऊन धीम्या मार्गावर आणि हार्बर रेल्वेवर पनवेल आणि वाशी दरम्यान दोन्ही मार्गांवर मेगाब्लॉक असणार आहे. पश्चिम रेल्वेवर आज ब्लॉक घेण्यात येणार नाही, त्यामुळे या मार्गावरील प्रवाशांना काहीसा दिलासा मिळाला आहे.
मध्य रेल्वे
मध्य रेल्वेवर माटुंगा ते मुलुंड डाऊन धीम्या मार्गावर मेगाब्लॉक असणार आहे. सकाळी 11.20 ते दुपारी 3.50 वाजेपर्यंत हा मेगाब्लॉक असणार आहे. मेगाब्लॉकमुळे डाऊन धीम्या मार्गावरील लोकल माटुंगा ते मलुंड दरम्यान जलद मार्गावर धावतील. तर सायन, कुर्ला, घाटकोपर, विक्रोळी, भांडुप, मुलुंड या स्थानकांवरही लोकल गाड्या थांबतील. डाऊन धीम्या मार्गावर विद्याविहार, कांजुरमार्ग, नाहूर स्थानकात लोकल थांबणार नाहीत.
हार्बर मार्ग
हार्बर रेल्वेवर पनवेल ते वाशीदरम्यान जलद आणि धीम्या दोन्ही मार्गावर मेगाब्लॉक असणार आहे. सकाळी 11.30 ते संध्याकाळी 4 वाजेपर्यंत हा ब्लॉक असणार आहे. ब्लॉकमुळे सीएसएमटी ते पनवेल, बेलापूर आणि ठाणे ते पनवेल ट्रान्स हार्बर तसेच बेलापूर ते खारकोपर दरम्यानच्या लोकल फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. सीएसएमटी ते वाशी दरम्यान विशेष लोकल फेऱ्या सोडण्यात येतील. तर ट्रान्स हार्बरवरील ठाणे ते वाशी, नेरुळ लोकल फेऱ्या उपलब्ध असतील.