एक्स्प्लोर
मुंबईत तीनही रेल्वेमार्गांवर आज विशेष मेगाब्लॉक
मुंबईतील तीनही उपनगरीय रेल्वे मार्गांवर आज विशेष मेगाब्लॉक घेण्यात येईल.
मुंबई : मुंबईतील तीनही उपनगरीय रेल्वे मार्गांवर आज विशेष मेगाब्लॉक घेण्यात येईल. मध्य रेल्वेवर कल्याण ते ठाणे दरम्यान अप स्लो मार्गावर सकाळी 11.15 ते दुपारी 4.15 मेगाब्लॉक घेण्यात येईल.
हार्बर रेल्वेमार्गावर नेरुळ ते मानखुर्ददरम्यान अप आणि डाऊन दोन्ही मार्गांवर सकाळी 11.20 ते दुपारी 4.20 वाजेपर्यंत मेगाब्लॉक घेण्यात येईल. पश्चिम रेल्वेवरही मरीन लाईन्स ते माहीम जंक्शन स्टेशन दरम्यान मेगाब्लॉक घेण्यात येईल.
मध्य रेल्वे
मध्य रेल्वेवर कल्याण ते ठाणे दरम्यान सकाळी 11.15 ते दुपारी 04.15 वाजेपर्यंत अप स्लो मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येईल. त्यामुळे कल्याणहून सुटणाऱ्या अप स्लो आणि सेमी फास्ट लोकल कल्याण ते मुलुंड स्थानकांदरम्यान अप फास्ट मार्गावरुन वळवण्यात येतील. मुंलुंडपासून पुन्हा अप स्लो मार्गावर या लोकल वळवण्यात येतील.
अप स्लो मार्गावरील लोकल ठाकुर्ली, कोपर, मुंब्रा आणि कळवा स्थानकांवर थांबणार नाहीत. त्यामुळे या स्थानकांनरुन प्रवास करणाऱ्या प्रवाशांना ठाणे, दिवा, डोंबिवली आणि कल्याण मार्गे प्रवास करण्याची मुभा देण्यात आली आहे.
सीएसएमटीवरुन सकाळी 10.08 ते दुपारी 02.42 वाजेपर्यंत सुटणाऱ्या सर्व डाऊन फास्ट लोकल्स घाटकोपर, विक्रोळी, भांडुप, मुलुंड आणि दिवा स्थानकांवर थांबतील आणि नियोजित वेळापत्रकापेक्षा 15 मिनिटे उशिराने धावतील.
तर कल्याणवरुन निघणाऱ्या उप फास्ट लोकल्स सकाळी 10.28 ते दुपारी 03.08 दरम्यान दिवा, मुलुंड, भांडुप, विक्रोळी, घाटकोपर आणि कुर्ला स्थानकांवर थांबतील आणि 15 मिनिटे उशिरानं धावतील.
हार्बर रेल्वे
हार्बर रेल्वेमार्गावर नेरुळ ते मानखुर्द स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन रेल्वे मार्गांवर सकाळी 11.20 ते 04.20 वाजेपर्यंत मेगाब्लॉक घेण्यात येईल.
त्यामुळे डाऊन मार्गावर सीएसएमटीवरुन सकाळी 10.18 ते दुपारी 3.39 वाजेपर्यंत सुटणाऱ्या पनवेल, बेलापूर आणि वाशीसाठीच्या लोकल्स रद्द करण्यात आल्या आहेत. तसंच अप मार्गावर सीएसएमटीसाठी सकाळी 10.52 ते दुपारी 04.12 वाजेपर्यंत निघणाऱ्या लोकल्सही रद्द करण्यात आल्या आहेत.
मेगाब्लॉकदरम्यान सीएसएमटी आणि मानखुर्द दरम्यान आणि ठाणे-पनवेल दरम्यान विशेष गाड्या चालवल्या जातील.
पश्चिम रेल्वे
पश्चिम रेल्वेवर मरीन लाईन्स ते माहीम जंक्शन स्टेशनदरम्यान सकाळी 10.35 ते दुपारी 15.35 वाजेपर्यंत मेगाब्लॉक घेण्यात येईल. त्यामुळे डाऊन स्लो मार्गावरील सर्व लोकल डाऊन फास्ट मार्गावरुन धावतील आणि महालक्ष्मी, एलफिन्स्टन रोड, माटुंगा रोड स्थानकांवर थांबणार नाहीत.
त्यामुळे प्रवाशांना वांद्रे आणि मुंबई सेंट्रलदरम्यान उलट मार्गाने प्रवास करण्याची मुभा देण्यात आली आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
पुणे
विश्व
Advertisement