एक्स्प्लोर
(Source: Poll of Polls)
Elphinstone Bridge: एल्फिस्टन पूल 2 दिवस सुरु राहणार; 28 एप्रिलला बैठकीचं आयोजन, नागरिकांच्या आंदोलनानंतर MMRDA चा निर्णय
Elphinstone Bridge: एल्फिस्टन पूल बंद केल्यानंतर स्थानिक रहिवाशांनी काल (25 एप्रिल) रात्री आंदोलन केले.
Elphinstone Bridge
1/7

Elphinstone Bridge: तोडकामासाठी मुंबईतील एल्फिन्स्टन ब्रीज 25 एप्रिलपासून रात्री 9 पासून बंद करण्यात आला होता. मात्र आता एमएमआरडीएकडून एक महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे.
2/7

एल्फिस्टन पूल वाहतुकीसाठी पुन्हा खुला करण्यात आला आहे.
3/7

एल्फिस्टन पूल बंद केल्यानंतर स्थानिक रहिवाशांनी काल (25 एप्रिल) रात्री आंदोलन केले. यानंतर पुढील दोन दिवस एल्फिस्टन पूल वाहतुकीसाठी पुन्हा खुला करण्यात आला.
4/7

स्थानिक रहिवाश्यांच्या मागण्या पूर्ण केल्या जात नाही, त्यांचे पुनर्वसन केले जात नाही, त्यांना विश्वासात घेतले जात नाही तोपर्यंत पुल बंद करू नये यासाठी काल रात्री मोठे आंदोलन झाले.
5/7

स्थानिक नागरिकांच्या आंदोलनानंतर सोमवारी (28 एप्रिल) बैठक घेऊन पुढील निर्णय घेणार असल्याचे एमएमआरडीएने जाहीर केले आहे.
6/7

दरम्यान, वरळी-शिवडी कनेक्टरसाठी एल्फिन्स्टन पुलाची पुर्नबांधणी करण्यात येणार असून त्यासाठी हा पूल वाहतुकीसाठी दोन वर्षे बंद ठेवण्यात येणार आहे.
7/7

जुना ब्रिज तोडून त्या ठिकाणी डबल डेकर ब्रिजची निर्मिती एमएमआरडीएच्या माध्यमातून होणार आहे.
Published at : 26 Apr 2025 07:44 AM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement



















