एक्स्प्लोर
मुंबईत आज तिन्ही रेल्वेमार्गांवर मेगाब्लॉक
मुंबई : मुंबईत आज तिन्ही रेल्वेमार्गांवर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. पश्चिम, मध्य आणि हार्बर रेल्वेवर आज मेगाब्लॉक घेण्यात येईल.
मध्य रेल्वेवर मुलुंड ते माटुंगा दरम्यान अप स्लो मार्गावर सकाळी 11 वाजून 20 मिनिटांपासून दुपारी 4 वाजून 20 मिनिटांपर्यंत हा मेगाब्लॉक असेल.
पश्चिम रेल्वेवर चर्चगेट ते मुंबई सेंट्रल या दरम्यान सकाळी 10 वाजून 35 मिनिटांपासून दुपारी 3 वाजून 35 मिनिटांपर्यंत मेगाब्लॉक असेल.
हार्बर रेल्वेवर मुंबई सीएसटीपासून चुनाभट्टी/माहिम स्टेशनपर्यंत डाऊन मार्गावर सकाळी 11 वाजून 40 मिनिटांपासून दुपारी 4 वाजून 40 मिनिटांपर्यंत हा मेगाब्लॉक असणार आहे. तर चुनाभट्टी/माहिम स्टेशनपासून मुंबई सीएसटीपर्यंत अप मार्गावर सकाळी 11 वाजून 10 मिनिटांपासून दुपारी 4 वाजून 10 मिनिटांपर्यंत हा मेगाब्लॉक असणार आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
लातूर
क्राईम
करमणूक
महाराष्ट्र
Advertisement