एक्स्प्लोर
मुंबईतल्या झोपडपट्ट्यांच्या पुनर्वसनासाठी दिल्लीत खलबतं
नवी दिल्ली : मुंबईतल्या झोपडपट्टींच्या पुनर्वसनासंदर्भात दिल्लीत खलबतं झाली. भाजपच्या खासदारांची केंद्रीय जहाज आणि रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी, रेल्वेमंत्री सुरेश प्रभू आणि पर्यावरणमंत्री प्रकाश जावडेकर यांच्यासोबत बैठक झाली. यावेळी बीपीटीच्या जागेवरच्या 47 हजार झोपडपट्ट्याचं पुनर्वसन व्हावं यासाठी पाठपुरावा करण्यात आला. तसंच रेल्वेच्या जागेवर झोपडपट्ट्यांचं पुनर्वसन करण्यासाठी रेल्वेनं स्वतंत्र योजना राबवावी, अशी मागणीही यावेळी करण्यात आली. संजय गांधी नॅशनल पार्कच्या परिसरातील इको सेन्सिटीव्ह बफर झोन कमी करुन 100 मीटरवर आणावा, अशी मागणी भाजप खासदारांनी जावडेकरांकडे केली आहे.
आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
सांगली
महाराष्ट्र
राजकारण
राजकारण























