एक्स्प्लोर
मुंबईतील महापालिका रुग्णालयांना होणारा औषधपुरवठा उद्यापासून बंद, रुग्णांचे हाल होणार
बीएमसी अंतर्गत येणाऱ्या 17 मोठी हॉस्पिटल्स, 33 मॅटर्निटी, 178 डिस्पेंसरी यांना उद्यापासून औषधे मिळणार नाहीत.
मुंबई : ऑल फूड अॅन्ड लायसन्स होल्डर फाऊंडेशनने बीएमसी रुग्णालयांना औषध पुरवठा न करण्याचा निर्धार केला आहे. त्यामुळे उद्यापासून मुंबईतील पालिकेच्या रुग्णालयांना होणारा औषधपुरवठा बंद होणार आहे.
बीएमसीकडून काही दिवसांपूर्वी औषध पुरवठादारांना काळ्या यादीत टाकण्यात आलं होतं. त्यापैकी मेडिको प्रा.लि. या औषध पुरवठादार कंपनीने औषधांचा पुरवठा उशीर केला. त्याबदल्यात 15 लाख रुपयांचा दंडही भरला. मात्र, तरीही पुरवठादारांना ब्लॅकलिस्ट करण्यात आलं. टेंडरचे सर्व नियम पाळूनही औषध पुरवठादारांना बीएमसीकडून ब्लॅकलिस्ट केलं जातं असा ऑल फूड अॅन्ड लायसन्स होल्डर फाऊंडेशनचा आरोप आहे.
आज यासंदर्भात फाऊंडेशनच्या प्रतिनिधींनी आयुक्तांची भेटही घेतली. मात्र, औषध पुरवठादारांना काळ्या यादीत टाकण्याच्या निर्णयावर आयुक्त ठाम राहिले. त्यामुळे, उद्यापासून 44 औषध पुरवठादार कंपन्या बीएमसी रुग्णालयांना औषधे पुरवणार नाहीत.
बीएमसी अंतर्गत येणाऱ्या 17 मोठी हॉस्पिटल्स, 33 मॅटर्निटी, 178 डिस्पेंसरी यांना उद्यापासून औषधे मिळणार नाहीत.
कोणकोणत्या औषधांच्या पुरवठ्यावर परिणाम?
मलेरिया--टॉक्सिटायलीन
डेंग्यू-- सिप्क्झीन
पॅरेसिटेमोल
रॅमेटीडीन
हार्ट-- इकोस्प्रिन
डायबेटीक-- मेकफॉर्मिन
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
पुणे
विश्व
Advertisement