एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
...म्हणून अतिरिक्त सचिव मेधा गाडगीळ महिन्याभराच्या रजेवर
सेवाज्येष्ठतेचा क्रम नाकारुन राज्याच्या मुख्य सचिवपदी डी. के. जैन यांची मुख्यमंत्र्यांनी नियुक्ती केली. त्यानंतर आता अधिकाऱ्यांमध्ये नाराजीचा सूर उमटत आहे.
मुंबई : सेवाज्येष्ठतेचा क्रम नाकारुन राज्याच्या मुख्य सचिवपदी डी. के. जैन यांची मुख्यमंत्र्यांनी नियुक्ती केली. त्यानंतर आता अधिकाऱ्यांमध्ये नाराजीचा सूर उमटत आहे. त्यामुळे मदत आणि पुनर्वसन विभागाच्या अतिरिक्त सचिव मेधा गाडगीळ एका महिन्याच्या दीर्घ रजेवर गेल्या आहेत.
खरं तर डी. के. जैन यांच्या पेक्षा मेधा गाडगीळ आणि गृह विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव सुधीरकुमार श्रीवास्तव हे ज्येष्ठ अधिकारी होते. मात्र मुख्यमंत्र्यांनी या दोन्ही अधिकाऱ्यांना डावलून डी. के. जैन यांच्या नावाला पसंती दिली. त्यानंतर आता अधिकारी वर्गात नाराजी पसरली आहे.
मेधा गाडगीळ यांच्यापाठोपाठ सुधीरकुमारही चार दिवसांच्या रजेवर गेले आहेत. तेही नाराज असल्याची चर्चा आहे.
राज्यातील भारतीय प्रशासकीय सेवा 1983 च्या बॅचमधील ज्येष्ठतेनुसार मेधा गाडगीळ, सुधीरकुमार श्रीवास्तव, दिनेश कुमार जैन,यू.पी.एस. मदान, संजीवनी कुट्टे आणि सुनील पोरवाल यांचा समावेश आहे.
संबंधित बातम्या :
दोघांना ओव्हरटेक, डी के जैन यांची मुख्य सचिवपदी नियुक्ती!
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
सोलापूर
निवडणूक
राजकारण
Advertisement