(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Measles Outbreak in Mumbai: मुंबईत 26 ऑक्टोबर पासून एकूण 7 गोवरचे संशयित मृत्यू, परिस्थिती नियंत्रणात असल्याचा पालिकेचा दावा
Measles Outbreak in Mumbai: मुंबईत 26 ऑक्टोबरपासून गोवरचे सात संशयित मृत्यू झाले असून परिस्थिती नियंत्रणात असल्याचा दावा मुंबई महापालिकेने केला आहे.
Measles Outbreak in Mumbai: मुंबईत जानेवारीपासून 142 गोवरचे(Measles) रुग्ण आढळले, तर सद्यस्थितीत 61 गोवरचे सक्रिय रुग्ण असल्याची माहिती मुंबई महापालिकेच्या (BMC) कार्यकारी आरोग्य अधिकारी मंगला गोमारे यांनी दिली. मुंबईत 26 ऑक्टोबरपासून आतापर्यंत सात गोवरचे संशियत मृत्यू झाले आहेत. परिस्थिती नियंत्रणात असल्याचा दावाही गोमारे यांनी केला आहे.
मुंबईत मागील काही दिवसांपासून गोवरचा प्रादुर्भाव वाढत आहे. त्या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेच्या आरोग्य विभागाने उपाययोजना आखण्यास सुरुवात केली आहे. कार्यकारी आरोग्य अधिकारी मंगला गोमारे यांनी सांगितले की, मुंबईतील 20 हजार लहान मुले (0 ते 2 वर्ष) असे समोर आलेत ज्यांना गोवरच्या पहिली किंवा दुसरी लस मिळाली नाहीत. त्यांचे लसीकरण करणे गरजेचे असून त्यांचे लसीकरण आधी प्राधान्याने करत आहोत. विविध विभागात सर्वेक्षण सुरू असून ताप, पुरळ आदी लक्षणे दिसणाऱ्या बालकांवर तातडीने उपचार करण्यात येत आहेत.
कस्तुरबाशिवाय इतर रुग्णालयात होणार उपचार
गोवरची लागण झालेल्या अथवा संशयित बालकांना आतापर्यंत उपचारासाठी कस्तुरबा रुग्णालयात पाठवले जात होते. आता गोवंडी शताब्दी रुग्णालय, राजावाडी रुग्णालय, शिवाजी नगर येथे आयसोलेशन वॉर्ड तयार करून गोवरवर उपचार सुरू करण्यात येणार असल्याची माहिती गोमारे यांनी दिली.
कोरोना काळात अनेकांच्या गोवरचे लसीकरण राहिले आहे. त्याशिवाय, कोरोनाची साथ आटोक्यात आल्यानंतही अनेकांनी टाळाटाळ केली. त्यामुळे त्यांचेदेखील लसीकरण केले जात असल्याची माहिती मंगला गोमारे यांनी दिली. लसीकरण झालेलेसुद्धा काही रुग्ण येत आहेत. मात्र त्यांना सौम्य लक्षण असल्याचे त्यांनी सांगितले.
मुंबईमध्ये 908 संशयित रुग्ण जानेवारीपासून आढळले आहेत. केंद्राचे पथक दोन-तीन दिवसांपासून आले असून ते सुद्धा अनेक ठिकाणी भेटी घेत असल्याची माहिती गोमारे यांनी दिली. संसर्ग आटोक्यात आणण्याच्या दृष्टीने त्यांनी काही मार्गदर्शक सूचना केल्याची माहिती त्यांनी दिली. संशयित लहान मुलांना 'व्हिटॅमिन ए' चे दोन डोस घरोघरी दिले जात असल्याची माहिती त्यांनी दिली.
मुंबईतील आठ वॉर्ड मध्ये गोवरचा प्रादुर्भाव
वॉर्ड बाधित रूग्ण संशयित रुग्ण
एम ईस्ट 05 44
एम वेस्ट 01 66
एच वॉर्ड 01 11
एल वॉर्ड 02 29
पी वॉर्ड 01 14
जी नॉर्थ 01 06
एफ नॉर्थ 01 12