विविध मागण्यांसाठी माथाडी कामगारांचे आंदोलन
आंदोलकांची छत्री बाजारातील अनोंदीत आस्थापनांची आणि कामगार यांची धातू आणि कागद बाजार माथाडी कामगार मंडळात नोंद ? करण्यात यावी आशी मागणी आहे.
मुंबई : मुंबईतील काळबादेवी परिसरात गुरूवारी (5 मार्च) महाराष्ट्र स्वाभिमानी माथाडी? आणि जनरल कामगार युनियन संघटनेच्या वतीने मोर्चा काढण्यात आला. परंतु मोर्चा सुरू होण्यापूर्वीच पोलिस प्रशासनाने संघटनेचे सरचिटणीस प्रताप मस्कर यांना कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित होऊ नये यासाठी 149 ची नोटीस बजावली. याबाबत बोलताना मस्कर यांनी पोलिस प्रशासन आंदोलन दाबण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप केला. तरीदेखील आंदोलकांनी पोलिसांचा विरोध झुगारून काळबादेवी परिसरात आंदोलन केलं आहे.
आंदोलकांची छत्री बाजारातील अनोंदीत आस्थापनांची आणि कामगार यांची धातू आणि कागद बाजार माथाडी कामगार मंडळात नोंद ? करण्यात यावी आशी मागणी आहे. जर नोंद झाली तर या माथाडी कामगारांना मंडळाकडून भविष्य निर्वाह निधी, मृत्यू फंड किंवा कोणत्याही बँकेकडून कर्ज मिळण्यास मदत होते, असं कामगारांचं म्हणणं आहे. हे कामगार मागील 30 ते 40 वर्षे काम करत आहे. यातील बहुतेक कामगार आता म्हातारपणाकडे टेकले आहेत. या संघटनेचे जवळपास 1100 सदस्य आहेत.
याबाबत बोलताना सुधीर कोळगे म्हणाले की, छत्री बाजार परिसरात काम करणारे माथाडी कामगार मागील 30 ते 40 वर्षापासून काम करत आहेत. मी स्वतः जवळपास 22 वर्षे याठिकाणी काम करत आहे. सध्याची परिस्थिती अशी आहे की, आत्ता जर काम करताना कोणाचा अपघात झाला किंवा कुटुंबातील कोणी आजारी पडलं तर हातात उपचारासाठी देखील पैसा नसतो. निदान धातू व कागद बाजार माथाडी कामगार मंडळात नोंद झाली तर आम्हांला भविष्य निर्वाह निधी तरी मिळेल. तसेच आरोग्यासाठीच्या विविध सवलती तरी मिळतील. आज आम्ही केवळ याठिकाणी काम बंद आंदोलन ठेवत मोर्चा काढला आहे. परंतू भविष्यात जर मागण्या मान्य झाल्या नाहीत तर तीव्र लढा देण्यात येणार आहे.
संघटनेच्या वतीने सरचिटणीस प्रताप मस्कर यांनी या प्रश्नाबाबत लवकरच आम्ही मंत्री बच्चू कडू यांची भेट घेऊन आमच्या मागण्या त्यांच्याकडे मांडणार असल्याचं म्हंटल आहे. आगामी काळात देखील भिवंडी, पालघर नवी मुंबई या भागात देखील आम्ही आंदोलन करणार असल्याचं मस्कर यांनी म्हंटल आहे.
Mathadi Worker | माथाडी कामगारांकडून एकदिवसीय बंद; बंदला मार्केटमध्ये संमिश्र प्रतिसाद संबंधित बातम्या : माथाडी कामगार संघटनेत फूट, नरेंद्र पाटील विरुद्ध शशिकांत शिंदे संघर्षाला सुरुवात