एक्स्प्लोर
शहीद कॉन्स्टेबल विलास शिंदे यांचं नाव वरळीतील चौकाला!
ऑगस्ट 2016 मध्ये खार रोड येथे कर्तव्य बजावताना वाहतुकीचे नियम मोडणार्या तरुणांना विलास शिंदे यांनी अडवून जाब विचारला. मात्र यावेळी संबधित समाजकंटकांनी शिंदे यांच्या डोक्यावर मागून वार केला. यामध्ये गंभीर जखमी झालेल्या शिंदे यांचे लीलावती रुग्णालयात उपचारादरम्यान निधन झाले.

मुंबई : वाहतुकीचे नियम मोडणार्या समाजकंटकांना अडवताना जिवाची बाजी लावलेल्या शहीद कॉन्स्टेबल विलास शिंदे यांना शिवसेनेने सलाम केला आहे. शिवसेनेच्या पाठपुराव्यामुळे वरळी दूरदर्शन समोरील चौकाचे नामकरण ‘शहीद विलास शिंदे चौक’ असे करण्यात आले. शिवसेना नेते, युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्या हस्ते आज या चौकाचे उद्घाटन करण्यात आले.
ऑगस्ट 2016 मध्ये खार रोड येथे कर्तव्य बजावताना वाहतुकीचे नियम मोडणार्या तरुणांना विलास शिंदे यांनी अडवून जाब विचारला. मात्र यावेळी संबधित समाजकंटकांनी शिंदे यांच्या डोक्यावर मागून वार केला. यामध्ये गंभीर जखमी झालेल्या शिंदे यांचे लीलावती रुग्णालयात उपचारादरम्यान निधन झाले.
सरकारने शिंदे यांच्या शौर्याचा गौरव करीत शहीद घोषित केले. या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या पाठपुराव्यातून याआधी लोअर परळ येथील एका उद्यानाला देखील शहीद विलास शिंदे यांचे नाव देण्यात आले आहे. आता वरळीच्या चौकालाही विलास शिंदे यांचे नाव देण्यात आले.
राज्यातील कायदा-सुव्यवस्था सुधारा - आदित्य ठाकरे
राज्यात सध्या सुरु असलेल्या घटना पाहता कायदा-सुव्यवस्था बिघडल्याचे चित्र आहे. त्यामुळे केवळ उद्याने, चौकांना शहीदांची नावे देऊन चालणार नाही, तर सरकारने राज्यात कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी ठोस उपाययोजना केली पाहिजे आणि याची अंमलबजावणी झाली पाहिजे, असे प्रतिपादन शिवसेना नेते युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी यावेळी केले.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
भारत
राजकारण
विश्व
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज