एक्स्प्लोर

ज्येष्ठ रंगकर्मी आणि साहित्यिक रत्नाकर मतकरी यांचं निधन

मराठी साहित्य विश्वातील ज्येष्ठ साहित्यिक आणि नाटककार रत्नाकर मतकरी यांचं निधन झालं. त्यांच्या निधनाने नाट्य आणि साहित्य विश्वावर शोककळा पसरली आहे.

मुंबई : ज्येष्ठ रंगकर्मी आणि साहित्यिक रत्नाकर मतकरी यांचं रविवारी रात्री (17 मे) निधन झालं. वयाच्या 81 व्या वर्षी मुंबईत त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनामुळे नाट्य आणि साहित्य सृष्टीवर शोककळा पसरली असून बहुआयामी व्यक्तिमत्त्व हरपल्याची भावना व्यक्त होत आहे.

राष्ट्रीय पुरस्कार विजेते रत्नाकर मतकरी यांना गेल्या काही दिवसांपासून थकवा जाणवत होता. चार दिवसांपूर्वी गोदरेज रुग्णालयात तपासणीसाठी दाखल झाले असता त्यांची कोरोना चाचणी करण्यात आली. चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने उपचारांसाठी त्यांना सेवन हिल्स रुग्णालयात हलवण्यात आलं होतं. मात्र तिथे उपचारादरम्यान रविवारी रात्री साडे अकराच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली.

रत्नाकर मतकरी यांनी 1955 मध्ये वयाच्या अवघ्या सोळाव्या वर्षी 'वेडी माणसं' या एकांकिकेपासून लेखनाची सुरुवात केली. ही एकांकिका आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरुन प्रसारित झाली होती. वयाच्या सोळाव्या वर्षी सुरु झालेला लेखनाचा प्रवास 81 व्या वर्षापर्यंत अव्याहतपणे सुरु होता. दररोज दोन तास ते लेखन करायचे.

नाटक, एकांकिका, बालनाट्य, कथा, गूढकथा, कादंबरी, ललित लेख अशा अनेक साहित्य प्रकारात त्यांनी लेखन केलं. इतकंच नाही तर बालरंगभूमीची मुहूर्तमेढ रोवून अनेक बालनाट्यांची निर्मितीही केली होती. अलीकडेच 'अलबत्या गलबत्या' आणि 'निम्मा, शिम्मा राक्षस' या मुलांच्या, तसंच महाभारतातल्या अंतिम पर्वावर आधारित 'आरण्यक' ही नाटकं रंगभूमी अतिशय गाजली.

'लोककथा ७८, दुभंग, अश्वमेध, माझं काय चुकलं?, जावई माझा भला, चार दिवस प्रेमाचे, घर तिघांचं हवं, खोल खोल पाणी, इंदिरा यासह काही अन्य नाटकांनी प्रेक्षकांच्या मनात घर केलं. तर गूढकथा हा कथाप्रकारही त्यांनी वाचकांपर्यंत पोहोचवला.

गहीरे पाणी, अश्वमेध, बेरीज वजाबाकी या मालिका, तसंच सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपटाचा राष्ट्रीय पुरस्कार मिळालेला चित्रपट इन्वेस्टमेन्ट, अशी त्यांची इतर माध्यमामधली कामंही रसिकांच्या पसंतीस उतरली.

Ratnakar Matkari passed away | ज्येष्ठ रंगकर्मी आणि साहित्यिक रत्नाकर मतकरी यांचं निधन
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Rohit Sharma : 2007  च्या वर्ल्डकप विजयावेळी सर्वात लहान खेळाडू होतास, आता कसं वाटतं, रोहित शर्माला नरेंद्र मोदींचा प्रश्न
2007 अन् 2024 चं विजेतेपद मिळवलंय, रोहित तुला कसं वाटतं, पंतप्रधानांचा प्रश्न, हिटमॅनचं उत्तर, म्हणाला...
ठाणे पालिकेच्या रुग्णालयात जून महिन्यात 21 नवजात बालकांचा मृत्यू, सहा महिन्यात 89 बालकं दगावली
ठाणे पालिकेच्या रुग्णालयात एका महिन्यात 21 नवजात बालकांचा मृत्यू, सहा महिन्यात 89 बालकं दगावली
''आता, तुम्ही नितीन गडकरींची गॅरंटी असं म्हणा''; CNG बाईक लाँचिंगप्रसंगी राजीव बजाज यांची 'ही' अपेक्षा
''आता, तुम्ही नितीन गडकरींची गॅरंटी असं म्हणा''; CNG बाईक लाँचिंगप्रसंगी राजीव बजाज यांची 'ही' अपेक्षा
रोहित, सूर्या, दुबे अन् यशस्वीचा एकनाथ शिंदेंकडून सत्कार, पाहा व्हिडीओ
रोहित, सूर्या, दुबे अन् यशस्वीचा एकनाथ शिंदेंकडून सत्कार, पाहा व्हिडीओ
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Rohit Sharma Marathi speech : सूर्याच्या हातात बॉल बसला,नाहीतर त्याला बसवला असता, रोहितचं मराठी भाषणTeam India Meet CM Shinde : मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विश्वविजेत्यांचा सत्कार, वर्षा निवासस्थानी भेटAditya Thackeray On Adani : मुंबई गिळायची नाही त्याला आमचा कडाडून विरोध, ठाकरेंचा संतापVijay Wadettiwar Mumbai : अदानीच्या सेवेसाठी सेवक काम करतात, सरकारवर गंभीर टीका

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rohit Sharma : 2007  च्या वर्ल्डकप विजयावेळी सर्वात लहान खेळाडू होतास, आता कसं वाटतं, रोहित शर्माला नरेंद्र मोदींचा प्रश्न
2007 अन् 2024 चं विजेतेपद मिळवलंय, रोहित तुला कसं वाटतं, पंतप्रधानांचा प्रश्न, हिटमॅनचं उत्तर, म्हणाला...
ठाणे पालिकेच्या रुग्णालयात जून महिन्यात 21 नवजात बालकांचा मृत्यू, सहा महिन्यात 89 बालकं दगावली
ठाणे पालिकेच्या रुग्णालयात एका महिन्यात 21 नवजात बालकांचा मृत्यू, सहा महिन्यात 89 बालकं दगावली
''आता, तुम्ही नितीन गडकरींची गॅरंटी असं म्हणा''; CNG बाईक लाँचिंगप्रसंगी राजीव बजाज यांची 'ही' अपेक्षा
''आता, तुम्ही नितीन गडकरींची गॅरंटी असं म्हणा''; CNG बाईक लाँचिंगप्रसंगी राजीव बजाज यांची 'ही' अपेक्षा
रोहित, सूर्या, दुबे अन् यशस्वीचा एकनाथ शिंदेंकडून सत्कार, पाहा व्हिडीओ
रोहित, सूर्या, दुबे अन् यशस्वीचा एकनाथ शिंदेंकडून सत्कार, पाहा व्हिडीओ
Maharashtra Legislative Council Election : विधान परिषदेला 12वा खेळाडू कोणाचे 'बारा' वाजवणार? मिलिंद नार्वेकरांची सर्वपक्षीय दोस्ती कामी येणार?
विधान परिषदेला 12वा खेळाडू कोणाचे 'बारा' वाजवणार? मिलिंद नार्वेकरांची सर्वपक्षीय दोस्ती कामी येणार?
सावधान! 'या' 3 जिल्ह्यांना पावसाचा ऑरेंज अलर्ट, तर राज्यातील इतर ठिकाणी कसा असणार पाऊस? हवामान विभागाचा अंदाज काय? 
सावधान! 'या' 3 जिल्ह्यांना पावसाचा ऑरेंज अलर्ट, तर राज्यातील इतर ठिकाणी कसा असणार पाऊस? हवामान विभागाचा अंदाज काय? 
''तुम्ही म्हणाल तिथं जयंतरावांना घेऊन जायला तयार''; अजित पवारांनी विधानसभेतूनच सांगितलं
''तुम्ही म्हणाल तिथं जयंतरावांना घेऊन जायला तयार''; अजित पवारांनी विधानसभेतूनच सांगितलं
राज्य सरकारचा मोठा निर्णय, EWS, SEBC आणि ओबीसी विद्यार्थिनींना शिक्षण आणि परीक्षा शुल्क परत मिळणार
राज्य सरकारचा मोठा निर्णय, EWS, SEBC आणि ओबीसी विद्यार्थिनींना शिक्षण आणि परीक्षा शुल्क परत मिळणार
Embed widget