एक्स्प्लोर
मराठमोळी अभिनेत्री उर्मिला मातोंडकर महाराष्ट्रासाठी पुढे सरसावली
कोरोना महामारीचा सामना करण्यासाठी मराठमोळी अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांनी मदतीचा हात दिला आहे. यासोबत इतर कलाकारांना पुढे येण्याचे आवाहन त्यांनी केलं आहे.
मुंबई : राज्य सरकार कोरोनासोबत आर्थिक संकंटाशीही लढत असताना अनेकांनी मदतीचे हात पुढे गेले, बॉलीवूड अभिनेता सोनू सूद पुढे आला, अनेक उद्योगपती, राजकारण्यांनी पुढे येऊन महाराष्ट्र सरकारला जमेल तेवढी मदत केली. मराठी अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांनीही राज्य सरकाला 20 लाखांची मदत केली आहे, एवढंच नाही तर कलाकारांनी पुढे येऊन राज्य सरकारला मदत करण्याचं आवाहन देखील केलं आहे.
राज्यात कोरोनाशी लढताना लागणारी साधनसामुग्री कोरोना योद्ध्यांचा खर्च यासाठी आर्थिक पाठबळ गरजेचं आहे. त्यासाठी मदत केल्याची भावना अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांनी व्यक्त केली आहे. महाराष्ट्राबद्दल आदर असल्यानं आपल्या लोकांसाठी काहीतरी करावं असं वाटतं. त्यामुळे ठाकरे सरकारला आर्थिक पाठबळ दिलं पाहिजे, या हेतूनं मातोंडकर यांनी मदत केली आहे.
कलाकारांसह सर्वांनी पुढे यावं
कोरोना तडाख्यामुळे जगभरात भीतीचे वातावरण आहे. लाखो लोकांना कोरोना व्हायरसचा फटका बसला आहे. प्रत्येक देश आपापल्या परीने या व्हायरसशी झुंज देत आहे. प्रत्येक राज्यात व देशात विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. डॉक्टर आणि रूग्णालयातील इतर सहकाऱ्यांच्या अथक परिश्रमामुळे जवळपास अनेक लोक कोरोनातून पूर्णपणे बरे होत आहे. योग्य ती काळजी आणि उपचार घेतल्यास हा आजार बरा होऊ शकतो, पण तेवढंच पाठबळ कोविड योद्ध्यांना देणं गरजेचं आहे. सुरुवातीला सर्वांचे हात पुढे आले. पण, हळूहळू पुर्वपदावर येत असताना सरकारसोबत तिकक्याच ताकदीनं पुढे यायला पाहिजे, असं मातोंडकर यांनी सांगितलं.
एसटीचा प्रवास विना पास मग खासगी वाहनाला पास बंधनकारक का? खासगी वाहनांसाठी ई-पास रद्द करण्याची मागणी
सांगली कोल्हापूरकरांना दिला होता मदतीचा हात
कोल्हापूर-सांगलीतील पूरग्रस्तांसाठी मराठमोळी अभिनेत्री उर्मिला मातोंडकर पूरग्रस्तांच्या मदतीसाठी धावून गेली आहे. उर्मिलाने सांगली-कोल्हापूर गाठत पूरग्रस्तांना दिलासा देण्याचा निर्णय घेतला होता अत्यावश्यक साधनसामुग्रीसह आर्थिक मदतीचा हात मातोंडकर यांनी दिला होता. लोकसभा निवडणुकीच्या वेळी उर्मिला मातोंडकर यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यांनी गोपाळ शेट्टींविरोधात लोकसभा निवडणूक लढवली होती पण निवडणुकीत पराभव झाला तेव्हापासून त्या नाराजच होत्या. एक प्रसिद्धीपत्रक काढून काँग्रेस पक्षातील अंतर्गत गट-तट आणि रजाकारण यांना कंटाळून आपण राजीनामा देत असल्याचं उर्मिला मातोंडकर यांनी म्हटलं होतं. उर्मिला मातोंडकर यांनी 27 मार्च रोजी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. त्याआधी त्यांनी राहुल गांधी यांचीही भेट घेतली होती.
CBI In Mumbai for SSR Case | सुशांतसिंह आत्महत्या प्रकरण तपासासाठी सीबीआयचं पथक मुंबईत दाखल
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
कोल्हापूर
महाराष्ट्र
विश्व
व्यापार-उद्योग
Advertisement