एक्स्प्लोर

एसटीचा प्रवास विना पास मग खासगी वाहनाला पास बंधनकारक का? खासगी वाहनांसाठी ई-पास रद्द करण्याची मागणी

राज्यात एसटीने प्रवास करण्यासाठी ई-पासची आवश्यकता नाही मग खाजगी वाहनांना हा पास अनिवार्य का आहे, असा सवाल संतप्त प्रवाशांकडून केला जातोय.

देशभरात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या लॉकडाऊनमध्ये राज्याची एसटी सेवा देखील बंद होती. 18 मार्च पासून टप्याटप्याने एसटी वाहतूक सेवा बंद करण्यात आली. मध्यंतरी जिल्हांतर्गत एसटी सेवा सुरु करण्यात आली होती, मात्र पुरेसे प्रवासी उपलब्ध न झाल्याने बहुतांश फेऱ्या रद्द करण्याची वेळ महामंडळावर येत होती. मात्र गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा संपूर्ण राज्यात एसटी वाहतूक सुरू करण्यात आली आहे. आजपासून ही वाहतूक अखेर सुरू झाली आहे, ठिकठिकाणी उत्साहाच्या वातावरणात तर काही ठिकाणी मर्यादित प्रवासीसंख्या असताना देखील एसटी सुरू झालीय.
मात्र अशातच सोशल मीडियावर एक मेसेज सध्या चांगलाच वायरल होतोय, "अनोळखी लोकांसोबत एसटी बस मधून प्रवास करताना E pass लागणार नाही, पण तुम्ही तुमच्या गाडीत तुमच्या कुटुंबातील सदस्यांसोबत प्रवास करत असाल तर मात्र E pass ? ?"  हा मेसेज व्हॉट्सअॅपवर सध्या चांगलाच वायरल होतोय. एसटीमध्ये प्रवास करण्यासाठी नियम आणि अटी घालण्यात आल्या आहेत. मात्र प्रवासासाठी ई-पासची आवश्यकता नाहीय. तर खासगी वाहनातून प्रवास करण्यासाठी ई-पास बंधनकारक आहे. त्यामुळे खासगी वाहनातून प्रवास करण्यासाठी देखील हा ई-पास रद्द करण्याची मागणी नागरिकांमधून होताना दिसत आहे.
राज्यातील सर्व सीमांवर सध्या नाकाबंदी करण्यात आली आहे. जिल्ह्यात येणाऱ्या प्रत्येक वाहनाची कसून तपासणी या नाक्यांवर केली जातेय. सोलापूर-पुणे राष्ट्रीय महामार्गावर देखील अशाच पद्धतीने नाकाबंदी करण्यात आली आहे. एबीपी माझाच्या प्रतिनिंधीनी काही नागरिकांशी संवाद साधला असता एसटीला पास नाही आणि खासगी वाहनांना मात्र पास बंधनकारक असल्यावरुन काही जणांनी नाराजगी व्यक्त केली.
"एसटी महामंडाळाच्या गाडीतून प्रवास करणारे हे सुरक्षित आणि खासगी गाडीतून प्रवास करणारे असुरक्षित असं असू शकत नाही. कोरोना कोणालाही होऊ शकतो. त्यामुळे सर्वांनाच पास बंधनकारक करावे अन्यथा कोणालाच पासची सक्ती करु नये" म्हणत अनेक प्रवाशांनी सरकारच्या या भूमिकेवरुन नाराजी व्यक्त केली. ई पास बाबत घेतलेला निर्णय हा विरोधाभासी असल्याचं मत प्रवाशांनी व्यक्त केलं.
ई-पास काढण्यासाठी नागरिकांना अनेक तांत्रिक अडचणींना सामोरं जावं लागतंय. राज्यात सर्व काही पूर्वपदावर येत असल्याने अशा पद्धतीने पासची सक्ती करण्यात येऊ नये अशी प्रवाशांची भावना आहे. दरम्यान ई-पास बंधनकारक केल्यामुळे काही जण याचा गैरफायदा घेत असल्याचे दिसून येत आहे. राज्यातील काही ठिकाणी बोगस पास बनवणारी टोळी कार्यरत आहे. ज्यांना वेळेवर पास मिळत नाही अशा प्रवाशांना ही टोळी बोगस पास मिळवण्यात मदत करत असल्याचा आरोप प्रहार संघटनेचे सोलापूर शहर संपर्क प्रमुख जमीर यांनी केला आहे. राज्यभरातून या प्रकरणी अनेक तक्रारी करण्यात आल्या आणि अनेकांना या कृत्यामुळे अटकही झाली.
दरम्यान नाकाबंदीवेळी कित्येक प्रवासी अत्यावश्यक कारणांसाठी प्रवास करत असतात. मात्र अशावेळी त्यांच्याकडे पास असेलच अशी परिस्थिती नसते. त्यावेळी त्यांना पास नसल्यास देखील प्रवेश द्यावा लागतो. तर काही वेळेस पास नसणारे काही लोक सुसाट गाडी चालवत, नाकाबंदीला लावण्यात आलेले बॅरिकेडसुद्धा तोडून पळून जातात. रात्रीच्यावेळी नाकाबंदी करत असताना अशा लोकांमुळे इतर प्रवाशांना धोका निर्माण होत असल्याची भावना नाकाबंदीवर ड्युटी करत असलेल्या एका पोलिस कर्मचाऱ्याने व्यक्त केली.  त्यामुळे ई-पास केवळ सोपस्कार म्हणून किंवा कर्मकांडापुरतेच मर्यादित राहिल्याची स्थिती दिसून येत आहे.
संबंधित बातम्या

मुंबई विद्यापीठातून पत्रकारितेचे शिक्षण घेतलेलं असून एबीपी माझामध्ये मागील 9 वर्षांपासून कार्यरत आहे. मुंबईत assistant प्रोड्यूसर म्हणून काम केल्यानंतर मागील 7 वर्षांपासून सोलापूर जिल्हा प्रतिनिधी पदावर कार्यरत.

Read More

महत्त्वाच्या बातम्या

उपचाराच्या नावाखाली तंत्र-मंत्र करत मौलवीचा महिलेवर अत्याचार; युपीला पळून जाण्याच्या तयारीत, पोलिसांनी उचलला
उपचाराच्या नावाखाली तंत्र-मंत्र करत मौलवीचा महिलेवर अत्याचार; युपीला पळून जाण्याच्या तयारीत, पोलिसांनी उचलला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 ऑगस्ट 2026 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 ऑगस्ट 2026 | रविवार
धक्कादायक! शिवसेना शिंदे गटाच्या माजी नगरसेवकाकडून विमानतळावरच गोळीबार, दोन जण जखमी, नेमकं प्रकरण काय?
धक्कादायक! शिवसेना शिंदे गटाच्या माजी नगरसेवकाकडून विमानतळावरच गोळीबार, दोन जण जखमी, नेमकं प्रकरण काय?
Manoj Jarange Patil: 'मराठ्यांपुढे सत्तेचं शहाणपण जमत नाहीत, आता आमच्या बाया चपला काढतील'; मनोज जरांगेंचा इशारा
'मराठ्यांपुढे सत्तेचं शहाणपण जमत नाहीत, आता आमच्या बाया चपला काढतील'; मनोज जरांगेंचा इशारा

व्हिडीओ

Nandurbar electricity issue : स्वातंत्र्यदिनाचा लखलखाट मनीबेली आजही अंधारात Special Report
Abhijeet Dipke Hingoli PC : नवीन पीएम हाऊस बांधण्यापेक्षा शाळा बांधा; अभिजीत दीपके आक्रमक!
Dhananjay Munde Speech : बहिणीचे आभार मानू कसे, पंकजा मुंडेंसाठी धनूभाऊंचे भाषण
Sunil Kendrekar Majha Katta : आएएस अधिकारी सुनील केंद्रेकर शेतीकडे कसे वळवले?
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
FPI : गुड न्यूज, विदेशी गुंतवणूकदारांनी ऑगस्टमध्ये ट्रेंड सुरुच ठेवला, भारतीय शेअर बाजारात 16621 कोटींची गुंतवणूक, जोरदार खरेदी
गुड न्यूज, विदेशी गुंतवणूकदारांनी ऑगस्टमध्ये ट्रेंड कायम ठेवला, भारतीय शेअर बाजारात 16621 कोटींची गुंतवणूक
वीजचोरांना महावितरणचा दणका! 30 कोटी 36 लाख रुपयांची चोरी उघड, कोणत्या विभागात किती वीजचोऱ्या?
वीजचोरांना महावितरणचा दणका! 30 कोटी 36 लाख रुपयांची चोरी उघड, कोणत्या विभागात किती वीजचोऱ्या?
रस्ते दुरुस्ती, घनकचरा ते पाणीपुरवठा, चाकण MIDC बाबत मंत्री उदय सामंतांचे मोठे निर्णय, कंत्राटदारांनाही दिला इशारा
रस्ते दुरुस्ती, घनकचरा ते पाणीपुरवठा, चाकण MIDC बाबत मंत्री उदय सामंतांचे मोठे निर्णय, कंत्राटदारांनाही दिला इशारा
Rohit Pawar : उद्योजकांनी प्रेस घेतल्यावर गडबड झाली, उद्योगमंत्री रविवारी चाकणमध्ये गेलेत, एवढ्या दिवसात काय गोट्या खेळत होते का? : रोहित पवार
उदय सामंतांची चाकण एमआयडीसीत रविवारी बैठक, एवढ्या दिवसात काय गोट्या खेळत होते का? : रोहित पवार
Prashant Kishor : आता सरकारनं कायदा केलाय, ...तर भाजपनं भाषणबाजी करण्याऐवजी सोनिया गांधी यांच्यावर केस करावी, प्रशांत किशोर यांची वंदे मातरमच्या वादावर भूमिका  
सरकारनं कायदा केलाय, ...तर भाजपनं भाषणबाजी करण्याऐवजी सोनिया गांधी यांच्या केस करावी : प्रशांत किशोर
अमित ठाकरेंच्या भेटीनंतर मुंबईतील फ्लॅट एजंट भावेश कावरेची माफी; म्हणाला, मला शब्दाला शब्द वाढवायचा नाही
अमित ठाकरेंच्या भेटीनंतर मुंबईतील फ्लॅट एजंट भावेश कावरेची माफी; म्हणाला, मला शब्दाला शब्द वाढवायचा नाही
चार वर्षांपासून गर्लफ्रेंड, घरात लग्नाची बोलणी सुरु असतानाच दोस्ताच्या कारमध्ये दिसली; बाॅयफ्रेंड थांबवण्यासाठी धावत्या कारच्या बोनेटवर चढला अन् 200 मीटरवर चिरडून जीवानिशी गेला
चार वर्षांपासून गर्लफ्रेंड, घरात लग्नाची बोलणी सुरु असतानाच दोस्ताच्या कारमध्ये दिसली; बाॅयफ्रेंड थांबवण्यासाठी धावत्या कारच्या बोनेटवर चढला अन् 200 मीटरवर चिरडून जीवानिशी गेला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 ऑगस्ट 2026 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 ऑगस्ट 2026 | रविवार
Embed widget